mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  २८ जून २०२५              

तारओहोळ मध्ये पडून वृद्धेचा मृत्यू…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोळींद्रे ता. आजरा येथे भैरु घस्ती यांचे शेताजवळील धरणा शेजारील तारओहोळ नदीच्या पात्रात  पडून श्रीमती गंगुबाई सखोबा पाटील ( वय ९५ वर्षे रा. कोळींद्रे ता. आजरा ) यांचा शुक्रवार दिनांक २७ जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबतची वर्दी व महादेव सखोबा पाटील यांनी पोलिसात दिली आहे.

      मृत गंगुबाई यांची मानसिक स्थीती बिघडलेने व त्या लहरी असलेने लहरी मध्ये फिरत जात असताना त्यांचा तोल जावुन अगर पाय घसरुन पाण्यात पडुन बुडुन मृत्यु झाला.

     मयत गंगुबाई या जनता बँकेचे माजी संचालक एम. एस. पाटील यांच्या आई व तालुका खरेदी विक्री संघाच्या माजी संचालिका सौ. संजना पाटील यांच्या सासू होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

गुड न्यूज
पावसाचा जोर ओसरला…
सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      तालुक्यात काल पासून पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्ववत होत आहे. तालुक्यातील पाण्याखाली गेलेले बंधारेही वाहतुकीकरता खुले झाले आहेत. काल सकाळच्या सत्रामध्ये सूर्यदर्शन झाले. सायंकाळी मात्र पावसाच्या सरी कोसळत होत्या.

      सर्फनाला मध्यम प्रकल्प उभारणीपासून प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

प्रकल्पाची स्थिती…

पूर्ण संचय पातळी – ६९९.०८५ मी.
एकूण पाणीसाठा – १८.९८ द.ल.घ.मी
आजची पाणी पातळी – ६९९.०८५ मी.
आजचा एकूण पाणीसाठा – १८.९९ द.ल.घ.मी
टक्केवारी – १००%
मागील २४ तासातील पाऊस- ५५ मि.मी.
१ जून २०२५ पासून एकूण पाऊस – १९६२ मी.मी.
सांडवा विसर्ग-३७८ क्युसेक्स
सिंचन विमोचक विसर्ग- १७४ क्यूसेक्स. एकूण विसर्ग- ५५२ क्यूसेक्स

चित्री प्रकल्पामध्ये शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ७७.१७ % इतका पाणीसाठा झाला आहे.

घरांची पडझड सुरूच

      जोरदार पावसामुळे अनेक घरांची पडझड तालुक्यात सुरू आहे.मौजे हारूर येथील श्रीमती कमल शिवाजी तिप्पट यांच्या घराची भिंत व स्वच्छतागृह कोसळून पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मौजे रेडेवाडी येथे गोविंद विठोबा नारळकर यांचे शेतातील घर पडून शेती अवजारे व लागवड यांचे अंदाजे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

     महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.

गवसे उपसरपंच पदी यल्लाप्पा बागडी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ग्रुप ग्रामपंचायत गवसे-आल्याचीवाडी ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच पदी श्री. यल्लाप्पा श्रीपती बागडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 .    उपसरपंच पदासाठी बागडी यांचे नाव
श्री अविनाश धोंडिबा हेब्बाळकर यांनी सुचवले. यावेळी सरपंच सौ. रेखा रणजित पाटील, सौ. सोनाली महेश पाटील, सौ. सुषमा सागर मांडवकर, ग्रामसेवक विशाल दूंडगेकर
सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.

      माजी उपसरपंच अविनाश हेब्बाळकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते.

 युवा पिढीला देशोधडीला लावण्यासाठी काही यंत्रणा कार्यरत : युनूस सय्यद

  आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       सद्यस्थितीत देशामध्ये तरुण पिढी गांजा, चरस, तंबाखू अशा अंमली पदार्थांना बळी पडत चालली आहे. गुजरातच्या अहमदाबाद बंदरावर २५ हजार कोटीची अंमली पदार्थ पकडले गेले. काही दिवसासाठी बातमी आली आणि ती लुप्त झाली. याचा अर्थच असा होतो कि देशातील युवा पिढीला देशोधडीला लावण्यासाठी कांही यंत्रणा कार्यरत आहेत कि काय अशी शंका उपस्थित होते.

       अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत युनूस सय्यद यांनी आजरा महाविद्यालयाच्या युवकांशी संवाद साधून तरुणांमधील वाढत्या व्यसनाधिनते बद्दल चिंता व्यक्त केली.

      केवळ कुतूहलापोटी व्यसनांची सुरवात होते आणि पुढे जाऊन ती दीर्घकालीन सवय लागून संपूर्ण कुटुंब उध्वस्त करीत आयुष्याची राखरांगोळी करते. अशा परिस्थितीत तरुण पिढीने तंबाखू, गुटखा, दारू, अंमली पदार्थ सिगारेट अशा व्यसनापासून दूर राहून इतरांनासुद्धा त्यापासून परावृत्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत वातावरणातील होणाऱ्या अचानक बदलामुळे कीटकजन्य व जलजन्य आजारांची साथ पसरत आहे याबाबतही त्यांनी माहिती देऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व योजना बद्दल मार्गदर्शन केले.

      यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य दिलीप संकपाळ तसेच एन. एस. एस. प्रमुख राज वर्धन यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

छाया वृत्त 

      उत्तूर येथे मंत्री हसन मुश्रीफ यांनी बसस्थानक बांधकामाची पायाभरणी केली. यावेळी वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, गणपतराव सांगले, गंगाधर हराळे, प्रकाश तौकरी, महेश करंबळी ,सरपंच किरण आमणगी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, उपसरपंच सौ.समीक्षा देसाई, गंगाधर हराळे, प्रकाश तौकरी, संभाजी तांबेकर, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, आदी उपस्थित होते.

छाया वृत्त

      देऊळवाडी – सातेवाडी चे ग्रामसेवक रणजीत डोंगरे यांच्या बदलीनिमित्त त्यांचा सरपंच सौ. यशोदा पोवार व उपसरपंच संजयभाई सावंत यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी राजू पोतनीस,युवराज पोवार, संजयभाई सावंत, गोपाळ कदम, मंगेश पोटनीस,मनोहर सावंत, पुंडलिक पोवार उपस्थित होते.

निधन वार्ता
शामराव पाटील

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मडिलगे ता.आजरा गावचे रहिवासी नागरिक माजी ग्रामसेवक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष, व समीतीचे मार्गदर्शक श्री शामराव ईश्वरा पाटील ( वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

       रक्षा विसर्जन रविवार दि. २९ रोजी सकाळी. ९ वाजता आहे.

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ. अनिल देशपांडे यांचा एकसष्ठीपूर्ती कार्यक्रम उत्साहात

mrityunjay mahanews

रामतीर्थ जवळ मानवी कवटी सापडली

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू ; आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथील घटना…कोळींद्रे येथून एकजण बेपत्ता.

mrityunjay mahanews
error: Content is protected !!