mrityunjaymahanews
अन्य

पोलिसी वृत्त

 

सिराज – खेडेकर पुन्हा मारामारी
दोघे जखमी : पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

महिनाभरापूर्वी झालेल्या वादातून पुन्हा एक वेळ सिराज व खेडेकर यांच्यामध्ये वादावादी होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये असिफ मोहम्मद इसाक सिराज, आरिफ महम्मद इसाक सिराज (रा. आमराई गल्ली, आजरा) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी राहील असलम खेडेकर, वसीम बशीर खेडेकर,बाक्या नीसार खेडेकर, मापीस असलम खेडेकर, मावेज हशम नालबंद (सर्व रा. आमराई गल्ली, आजरा ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

शुक्रवारी रात्री मॉर्निंग स्टार हॉटेल समोर जुन्या वादातून खेडेकर व सिराज यांच्या तरुणाईत वाद झाला. यावेळी पाच संशयितांनी दोघांना बेदम मारहाण केली. असे आफताब सिराज यांनी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कोयत्याने वार : दोन महिला जखमी

जाधेवाडी येथील एका विरोधात गुन्हा नोंद

आपली नाहक गावात बदनामी केली असून याचे पुरावे द्यावेत अन्यथा जिवंत सोडणार नाही असे सांगत जाधेवाडी (ता.आजरा) येथील भिकाजी भुजंग यांनी सौ.वंदना बाळू भुजंग यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. तर भिकाजी यांना विरोध करणाऱ्या सखुबाई भुजंग यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सौ. वंदना भुजंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिकाजी भुजंग यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सौ.वंदना व भिकाजी हे एकमेकांचे शेजारी राहावयास आहेत. त्यांच्यात वर्षभरापूर्वी भिकाजी हा वंदना यांच्या घरी गेल्याच्या कारणावरून वाद झाला होता. दरम्यान गुरुवारी भिकाजी हा यांच्या घरासमोर हातात कोयता घेऊन जिवे मारण्याचा उद्देशाने येऊन आपली सौ. वंदना यांनी आपली बदनामी केल्याचे पुरावे द्यावेत नाहीतर जिवंत सोडणार नाही. असे म्हणून सौ.वंदना यांच्या डोक्यात व खांद्यावर कोयत्याने वार केले. तर सदर वाद सोडवण्यासाठी आलेल्या सखुबाई भजन यांनाही मारहाण केली. यामध्ये सौ. वंदना या जखमी झाल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी भिकाजी भुजंग याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तीन महाविद्यालयीन तरुणींवर गव्याचा हल्ला.. दोघी जखमी .. आजरा तालुक्यातील घटना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पेद्रेवाडीत हत्ती…

mrityunjay mahanews

अभियंता अक्षयचा आकस्मिक मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!