उचंगी येथे हत्तीचा धुमाकूळ: पावर ट्रीलर केले पलटी तर भात, नाचणी पिकाचे प्रचंड नुकसान
आजरा: प्रतिनिधी
उचंगी (ता. आजरा) येथे गेले तीन दिवस हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला असून गुरुवारी रात्री येथील यशोदा गोविंद कळेकर यांच्या मालकीचा पावर ट्रीलर पलटी करत मळणीसाठी जमा केलेले भात पीक व मळणी करून ठेवलेले भात विस्कटून टाकत या परिसरामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला आहे . दररोजच्या पावसाच्या हजेरीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग भात पिकाच्या मळण्या आटोपून घेण्यात व्यस्त आहे. भातकापणीसह मळणीचा धडाका सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. मुळातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच नेहमीप्रमाणे हत्तीचा सुरू असणारा धमाकुळ बळीराजाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. उचंगी परिसरातील उत्तम देसाई यांच्यासह शिंत्रे परिवाराच्या मालकीच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये भात, नाचणी व ऊस या पिकांचा समावेश असून हत्तींचा बंदोबस्त करणार तरी कधी? असा प्रश्न पुन्हा एकवेळ शेतकरी वर्गातून उपस्थित केला जाऊ लागला आहे
————————–ADVT————–
————






उचंगी येथे हत्तीचा धुमाकूळ: पावर ट्रीलर केले पलटी तर भात, नाचणी पिकाचे प्रचंड नुकसान