

आण्णा भाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
आजरा: प्रतिनिधी
अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित आजरा या सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडीनंतर आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना डॉ. अनिल देशपांडे यांनी सूतगिरणीच्या प्रगतीचा आढावा घेतला.एकीकडे सूतगिरण्या अडचणीत असताना दुसरीकडे अण्णा-भाऊ सुतगिरणी स्वबळावर डौलात चालू असल्याचे त्यांनी सांगितले. नोकर पगारासह सूतगिरणी कडून वीज बिलांची पूर्तता वेळेत केली जाते. अतिशय चांगल्या स्थितीत सूतगिरणीची वाटचाल सुरू आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकआण्णा चराटी म्हणाले, चांगल्या संस्थेच्या पाठीशी नेहमीच सभासद असल्याने सूतगिरणीची बिनविरोध निवडणूक होण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट सूतगिरण्यामध्ये अण्णाभाऊ सूतगिरणीचा समावेश आहे. मध्यंतरीच्या खडतर कालावधीनंतर पुन्हा एकदा सूतगिरणी उद्योगास चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन व प्रत्येकाला सोबत घेऊन सूतगिरणीची वाटचाल या पुढेही चालू राहील. येत्या काही दिवसात सूतगिरण्यांना चांगले दिवस येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीचे सूत्रसंचालन शंकर उर्फ भैय्या टोपे यांनी केले. बैठकीस सर्व संचालक उपस्थित होते.
नवनिर्वाचित संचालक पुढील प्रमाणे- कापूस उत्पादक सभासद गट-
श्रीमती अन्नपूर्णादेवी काशिनाथ चराटी(आजरा)
डॉ.अनिल माधवराव देशपांडे(आजरा),श्री. अशोक काशिनाथ चराटी(आजरा),डॉ. संदीप बाबुराव देशपांडे(खेडे)
श्री. नारायण गणू मुरूकटे(दाभेवाडी)
डॉ.इंद्रजीत नानासो देसाई(आजरा)
श्री. गंगाधर मसाजी/जी.एम. पाटील(देवर्डे)
श्री. सुधीर बाबुराव कुंभार(आजरा)
श्री. रजनीकांत आनंदराव नाईक(कापशी)
श्री. अविनाश रामचंद्र सोनटक्के(मलकापूर)
श्री. जयसिंग बळीराम देसाई(आजरा)
श्री शंकर रामचंद्र टोपले(आजरा)
भटक्या जाती व जमाती प्रतिनिधी- श्री. कृष्णात वसंत गिरीगोसावी(आजरा)
अनुसचित जाती / जमाती प्रतिनिधी-
श्री. शशिकांत आप्पा सावंत(बरुडे)
महिला सदस्य प्रतिनिधी-
श्रीमती मालुताई कृष्णा शेवाळे(आजरा)
सौ. मनिषा महेश कुरूणकर(आजरा)
बिगर कापूस उत्पादक-
श्री. राजाराम पांडूरंग पोतनिस(सातेवाडी)


