mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे शासनाच्या योजना पतसंस्थेमार्फत राबविणार : आ. प्रकाश आबिटकर….  आजरा येथे ‘कॅश्यू मॅन्युफॅक्चर’च्या कार्यालयाचे उद्घाटन

राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे शासनाच्या योजना पतसंस्थेमार्फत राबविणार :

आ. प्रकाश आबिटकर

आजरा येथे ‘कॅश्यू मॅन्युफॅक्चर’च्या कार्यालयाचे उद्घाटन

काजू व्यवसायावर अनेक जणांची रोजीरोटी अवलंबून आहे. या व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेता व्यवसायामध्ये येत असणाऱ्या अडचणी मार्गी लावण्याची गरज आहे. सध्याचे  बँकांचे व्याजदर हे काजू प्रक्रिया उद्योजकांना परवडणारे निश्चितच नाहीत. यासाठी सहजपणे व्यावसायिकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक बँकानी व्याजदराबाबत सकारात्मक विचार करावा. सूत उदयोगासाठी ज्या पध्दतीने वीज बिलामध्ये सवलत दिली जाते. त्या पध्दतीने काजू व्यवसायासाठी सवलत मिळावी यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रीयकृत बँका मार्फत विविध शासकीय योजना राबविल्या जातात. याच धर्तीवर पतसंस्था व स्थानिक बँकाकडून या योजना राबविण्याबाबतचे धोरण लवकरच अमलात आणले जाणार असल्याची माहीती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते आजरा येथे कॅश्यू मॅन्युफॅक्चर वेल्फेअर असोसीएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आमदार आबिटकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले.

संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कोड्सकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्थानिक पातळीवरील काजू प्रक्रिया उदयोगामध्ये उपलब्ध असणारा रोजगार व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या होणारी सुमारे तीनशे कोटींची वार्षिक उलाढाल विचारात घेतल्यास या उद्योगातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी असोसिएशनची| स्थापना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी आमदार आबिटकर म्हणाले, जीएसटी, वीज दर, अन्न व भेसळ परवाने, बाजारसमित्यांकडून उत्पादकांना कोणतीही सेवा न देता आकारला जाणारा सेस अशा अनेक किचकट बाबी काजू प्रक्रिया उदयोगासमोर आहेत. यासाठी काजू प्रक्रिया उद्योजकांची स्वतंत्र बैठक घेवून मार्ग काढला जाईल. कोरोनामुळे आलेल्या अडचणींचा सर्वात मोठा फटका सर्फनाला प्रकल्पाला बसला आहे. निविदा, बजेट यासारख्या सर्व बाबी पूर्ण असूनही यावर्षी पाणी अडवता आले नाही. पुढील वर्षी या प्रकल्पात पाणी साठा केला जाईल.

आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी आपापल्या संस्थामधून कमीत कमी व्याजदरात अर्थसहाय्य करण्याची ग्वाही दिली. जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, उदयोजिका सौ. वृषाली कोंडूससकर, मारुती मोरे, महादेव पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आजरा व्यापारी असोसिएशनेचे अध्यक्ष दिवाकर नलवडे,दिनेश मोरे, लक्ष्मण गुडुळकर, माजी उपसभापती दिपक देसाई, सुभाष विभुते, उत्तम देसाई, विकास फळनेकर, जयसिंग खोराटे,निशांत जोशी, परेश पोतदार यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमांचे सूत्रसंचलन बळवंत शिंत्रे यांनी केले. उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

 

आज-यात शिवजयंती जल्लोषात

 

आजरा येथे संयुक्त पारंपारिक शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य मिरवणूकीसह् येथील स्वराज्य तालीम मंडळ, वाघाची तालीम मंडळ, शिव दरबार तरुण मंडळ आदी मंडळांनी जंगी मिरवणूक काढून विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. आजऱ्यात प्रथमच शिवजयंती भव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. दोन वर्षे कोरोनामुळे शिवजयंतीचा आनंदावर विरजण पडले होते. या वर्षी मात्र नेटके नियोजन करत शिवजयंती निमित्य जंगी मिरवणूक काढण्यात आली. गजनृत्य, लेझीम, नाशिक ढोल,लेसर शो,आकर्षक विद्युत रोषणाई, सजीव देखावा,तलवारबाजीची प्रात्यक्षिके मिरवणुकीचे खास आकर्षण ठरली.आजरा शहर वासियांना सह पंचक्रोशीतील सर्व दरम्यान नागरिकांनी मिरवणुकीला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

मिरवणुकीमध्ये नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. संजीवनी सावंत,अशोक चराटी,  सौ.शुभदा जोशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी,राहुल देसाई, पंचायत समिती सदस्य श्री.बशीर खेडेकर, विलास नाईक, विजयकुमार पाटील, बाळ केसरकर, किशोर पारपोलकर, आनंदा कुंभार, सुधीर कुंभार, संभाजीराव पाटील,प्रभाकर कोरे,शैलेश पाटील,दिवाकर नलवडे,युवराज पोवार ,अनिकेत कवळेकर,मारुती बिरजे, विक्रम देसाई,अश्विन डोंगरे,वैभव सावंत,शिवाजीराव गुडूळकर यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.

 

भादवण ग्रामपंचायतच्या वतीने मोफत घरठाण व ७/१२ वाटप

भादवण ता आजरा येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर मध्ये भादवण मधील ग्रामस्थांना मोफत घरठाण व ७/१२उतारे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मा गटविकास अधिकारी श्री.बी.डी. वाघ  यांनी सरपंच संजय पाटील व ग्रामपंचायत भादवणचे सदर कार्यक्रमाबाबत अभिनंदन केले तसेच सदर घरठाण उतारे व ७/१२ उतारे वर्षातुन किमान एकवेळ तरी काढावा आणि तो का काढला पाहिजे हे सुद्धा अगदी सविस्तर पणे सांगितले.

तहसीलदार श्री.विकास अहिर  यांनी सरपंच श्री संजय पाटील यांचा गावच्या सर्वांगीण विकासासाठी तहसीलदार कार्यालयात असणारा सततचा पाठपुरावा याचे कौतुक केले. तसेच गावातील अनेक पाणंद रस्ते आहेत ज्या ठिकाणी अतिक्रमणे असुन ये-जा करण्यासाठी वाहनांसाठी अडथळा होत आहे असे सर्व पाणंद तसेच इतर रस्त्यांची समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी त्याबत योग्य तो निर्णय घेण्यात  उपाययोजना करण्यात येतील असे सरपंच पाटील यांनी सांगितले .

ग्रामसेवक राजन दड्डिकर  व उपसरपंच श्र. दयानंद पाटील यांनी गावातील पाणंद रस्ते तसेच इतर समस्या तसेच गावातील विकासकामे व विकास बाबत माहिती दिली. सुत्रसंचलन श्री सदाशिव दिवेकर यांनी केले .

या कार्यक्रमप्रसंगी तलाठी श्री. रमेश यादव , पोलिस पाटील सौ. गिता कुंभार,उपसरपंच श्री. बाळासाहेब कुंभार, ग्रामपंचायत सदस्य श्री. राहुल देसाई,सौ. सुनंदा कुंभार,सौ. सुनंदा पाटील,श्रीमती बेबुताई लोहार, विकास सेवा सोसायटीचे संचालक रत्नाबाई केसरकर, श्री.अशोक गुरव,जितु पाटील, माजी मुख्याध्यापक श्री. टि. ए. पाटील , श्री. दिनकर गोडसे, खजिनदार श्री. तानाजी उंडगे उपस्थित होते .

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेचा अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योजगांसाठी मेळावा उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अंतिम टप्प्यात जिल्हा बँकेकरिता आजऱ्यात धुमशान… कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ज्योतिप्रसाद सावंत यांना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!