mrityunjaymahanews
अन्य

प्रशांत सयाजीराव देसाई यांचे निधन

 

 

 

प्रशांत देसाई यांचे निधन

          पुणेस्थित आजरा येथील पोलीस दलातील जवान प्रशांत सयाजीराव यांचे (वय 38 वर्षे )यांचे अल्पशा आजाराने रविवारी सायंकाळी पुणे येथे निधन झाले.

        आजरा  येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सयाजीराव देसाई यांचे ते चिरंजीव होत.पुणे ग्रामीण विभागात सेवा बजावत असणा -या प्रशांत यांच्या  पश्चात आई,वडील,विवाहित बहीण,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.सोमवारी दुपारी हिरलगे (ता.गडहिंग्लज)या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

       शालेय व महाविद्यालयीन काळात खेळाडू म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत यांचा मित्रपरिवार मोठा आहे.

 

अण्णांची खंत… दादांची हमी… आणि हाळवणकर यांची फिरकी …         

     

       ज्योतिप्रसाद सावंत

आजरा येथे नुकत्याच पार पडलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या महालक्ष्मी उद्यानाच्या लोकार्पण समारंभामध्ये भाजपामध्ये असून अस्वस्थ वाटणाऱ्या अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांनी आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती न दर्शविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या नाराजीमध्ये अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. यातूनच चराटी यांना ‘आपण शेवटपर्यंत भाजपामध्ये राहणार’ असे सांगावे लागणं यामागचे कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे.

अशोकअण्णा चराटी हे आजरा तालुक्यातील सहकारातील बडे प्रस्थ आहे.या पूर्वीचा इतिहास पाहता त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसह भाजपाच्या नेत्यांशी जवळीक राहिली आहे.चराटी हे सध्या भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. आठ -दहा दिवसापूर्वी त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगून चंद्रकांतदादा उपस्थित राहू शकले नाहीत.जिल्हा उपाध्यक्षाच्या कार्यक्रमाला दादा उपस्थित राहू शकले नाही ही खंत निश्चितच चराटी यांना वाटणे रास्त आहे. अखेर संधी मिळताच चराटी यांनी ही खंत बोलून देखील दाखवली.चराटी यांची ही खंत रास्त असली तरीही याचबरोबर त्यांनी ‘आपण शेवटपर्यंत भाजपातच राहणार ‘असे स्पष्ट केल्याने अनेक प्रश्नांची निर्मिती झाली आहे.कदाचित चराटी यांची यापूर्वीचे राजकीय वाटचाल पाहता भाजपा नेत्यांना चुकीचा संदेश गेला असल्याची शक्यताही बोलली जात आहे.यातच भरीस भर म्हणून माजी आमदार व भाजपाचे महाराष्ट्र उप प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी चराटी यांची ही भविष्यवाणी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कितपत खरी ठरणार या विषयी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह होय.

चराटी हे सध्या राष्ट्रवादीचे जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्याशी जुळवून घेत आहेत.विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.स्थानिक इतर पक्षातील अनेक मंडळींशी सलोख्याचे संबंध असल्याने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असूनही त्यांनी कोणतीही निवडणूक भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर लढवलेली नाही. पुढील वर्षी होऊ घातलेल्या आजरा साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आजरा तालुका खरेदी-विक्री संघ, यासह नगरपंचायत निवडणुकीमध्ये चराटी यांची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे. चराटी यांच्या ‘एकसष्टी’ चा कार्यक्रम अद्यापही प्रलंबित आहे.पुढील वर्षीच्या या सर्व निवडणुकांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्यास त्याचा पक्षाला फायदाच होणार आहे. परंतु याच कार्यक्रमात चंद्रकांतदादांनी वर्षभरात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील व त्यानंतर चराटी यांचा एकसष्टी कार्यक्रम घेतला जाईल व त्या कार्यक्रमास फडणवीस स्वतः उपस्थित राहतील असे जाहीर केले. दादांच्या या विधानाने अण्णांचे कितपत समाधान झाले ? हा विषय ही पुन्हा संशोधनाचा आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चराटी यांना एकाकी लढत द्यावी लागली होती. या लढतींमध्ये झालेल्या पराभवाची खदखद अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. या खदखदीमुळेच भविष्यात धाडसी स्वभावाचे चराटी कोणताही निर्णय घेऊ शकतात …शेवटी त्यांचे तालुक्यात अस्तित्व राजकीय अस्तित्व आहे हे नाकारता येणार नाही.

आज-यात आज शिवजल्लोष…

विविध कार्यक्रमांचे नेटके आयोजन…

आज दि. ०२ मे २०२२ रोजी आजरा येथील जवळपास १८ मंडळे एकत्र येऊन संयुक्त शिवजयंती उत्सव साजरा करीत आहेत. आजरा शहरात भव्य तयारी करण्यात आली आहे.आजची शिवजयंतीनिमित्य निघणारी भव्य मिरवणूक हे खास आकर्षण रहाणार आहे.
वैशाख शु.द्वितीया, सोमवार दि.०२ मे सकाळी ७.०० वाजता श्री शिवतीर्थ आजरा येथे श्री. अभिषेक-पूजा व शिववंदना होणार आहे.

सायंकाळी ठीक ५:०० वाजता व्यंकटराव हायस्कूल, आजरा येथून श्री. शिवजयंती मिरवणूक निघणार असून त्यात प्रामुख्याने भव्य श्री. शिवमूर्ती,छ.शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा,शंभुनाद ढोलताशा,गजोनृत्य,व अनेक आकर्षक कार्यक्रम होणार आहेत.

आजरा तालुक्यातील तमाम शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असे आवाहन संयुक्त पारंपरिक श्री. शिवजयंती उत्सव कमिटी,आजरा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

आजरा पोलिसांचे शहरातून संचलन…

शिवजयंती व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आजरा पोलिसांनी रविवारी सायंकाळी शहरातून संचलन केले. शहरामध्ये शिवजयंतीसह ईद मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे संचलन करण्यात आले.

संचलनामध्ये गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, आजरा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्यासह पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.

सौ. राजश्री डोंगरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव…

शनिवारी आजरा येथील शिवाजीनगर घाटावर हिरण्यकेशी नदी पात्रात बूडणा-या तिघींना मोठ्या धाडसाने प्रसंगावधान दाखवत जीवदान देणाऱ्या सौ राजश्री रामचंद्र डोंगरे यांच्या कर्तृत्वाची बातमी ‘मृत्युंजय महान्युज’ वरून प्रसिद्ध होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.

येथील विठोबा देव ट्रस्ट नवापूर यांच्या वतीने मधुकर क्रमित यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तर मराठा महासंघाच्या घेण्यात सौ सुनंदा मारुती मोरे व सौ. भैरवी सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका सौ. स्मिता जाधव यांनीही त्यांचा विशेष सत्कार केला.या व्यतिरिक्त मारुती मोरे, यशवंत इंजल, योगेश पाटील, प्रकाश सावंत, विजय थोरवत, समीर मोरजकर आदीसह शहरवासियांनी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या धाडसाचे विशेष कौतुक केले.

संबंधित पोस्ट

हाजगोळी बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बेपत्ता शेतकऱ्याचे प्रेत विहिरीत आढळले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!