mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार   दि.२३ मार्च २०२५   

रात्री अमृत महोत्सव..‌ सकाळी मृत्यू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बोलकेवाडी तालुका आजरा येथील यशवंत चंद्रू कोलेकर यांचा कुटुंबीयांनी रात्री मोठ्या उत्साहाने अमृत महोत्सव साजरा केला आणि सकाळी त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. गडहिंग्लज येथे उपचारासाठी नेत असतानाच या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आलेला कोलेकर यांचा गोतावळा शोक सागरात बुडाला. या घटनेमुळे बोलकेवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

         बोलकेवाडी येथे यशवंतराव व त्यांच्या पत्नी रहात होते. वडिलांचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी त्यांचे मुंबईसह बाहेरगावी असणारे कुटुंबीय कार्यक्रमासाठी आले होते. शुक्रवारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शनिवारी सकाळी अचानकपणे यशवंतराव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

        मोठ्या हौसेने अमृत महोत्सवासाठी आलेले कोलेकर कुटुंबीय शोकसागरात बुडाले.कोलेकर यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, पत्नी असा परिवार आहे. ते बोलकेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे माजी अध्यक्ष होते.

मानधनातून कर माफीचा सरपंच, सदस्यांचा कौतुकास्पद उपक्रम : माधुरी परीट

पेरणोली येथे विधवा मिळकतधारकांना करमाफी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या मानधनातून विधवा महीलांना केलेली मालमत्ता कराची माफी ही आदर्शवत आहे. त्यांचा उपक्रम कौ तुकास्पद आहे. असे गौरवोद्‌गार जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी परीट यांनी काढले.

       श्री. रवळनाथ कुरकुंदेश्वर युवा विकास आघाडी व ग्रामपंचायत पेरणोली यांच्यावतीने महीला दिनाचे औचित्य साधून आयोजीत घरफाळा व पाणीपट्टीच्या पावत्यांचे वितरण कार्यक्रम प्रसंगी श्रीमती परीट बोलत होत्या. सरपंच प्रियांका संतोष जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील प्रमुख उपस्थित होत्या.

      श्रीमती परीट म्हणाल्या, पेरणोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ८३ विधवा महीलांच्या नावावर असणारा घळफाळा व पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी आपल्या मानधनातून देण्यासारखा अनुकरणीय उपक्रम जिल्हयात प्रथम राबवून वेगळा आदर्श तयार केला आहे.अशा विधायक उपक्रमांना आपले सहकार्य राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.

      यावेळी ग्रामस्तरावर पाणी स्वच्छता, आरोग्य क्षेत्रात व अंगणवाडीचा उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त महीलांचा सन्मान श्रीमती शिल्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. युवा आघाडी प्रमुख उदय कोडक यांनी मनोगत व्यक्त केले. अस्मिता दत्तात्रय कांबळे यांनी सॅनेटरी पॅड विषयी मार्गदर्शन केले.

      उपसरपंच संदिप नावलकर, सदस्य संकेत सावंत, रणजित फगरे, अमोल जाधव, सुषमा मोहीते, रुपाली पाईम, अश्विनी कांबळे, युवा आघाडीचे प्रमुख, कोअर कमीटी, महीला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      ग्रामविकास अधिकारी संदिप चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. अविनाश वर्धन यांनी युवा आघाडीने दीड वर्षात केलेल्या पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचा आढावा घेतला. सुरेश दास यांनी सुत्रसंचालन केले.

मानधन गावच्या विकासासाठी… सरपंच प्रियांका जाधव

      विधवा महीलांची होणारी परवड विचारात घेवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सदरचा उपक्रम राबविला. येथून पुढे मिळणारे मानधनातून असेच विधायक उपक्रम राबवणार आहे. यातून गावच्या विकासासाठी योगदान दिले जाईल असे सरपंच प्रियांका जाधव यांनी सांगीतले.

पोलीस डायरी

कंपाऊंड भिंत पाडून दीड लाखांचे नुकसान…
एका विरोधात गुन्हा नोंद

           उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       भिकाजी भैरू लवटे ( रा. कुंभार गल्ली, उत्तुर ता. आजरा) हे देवदर्शनासाठी बाहेरच्या राज्यात गेले असताना त्यांच्या शेजारी हद्द असणाऱ्या मल्लीकार्जुन आप्पासाहेब शेट्टी रा. गडहिग्लज यांनी जेसीबी आणून साफसफाई करीत असताना फिर्यादी यांची सिटी सर्वे मिळकत नं.१०१३ मध्ये असलेल्या हद्दी बिघडवून हद्दीवरील फुल झाडांचे व घराचे कंपाऊंड भिंतीचे अंदाजे दिड लाखांचे नुकसान करून फिर्यादींचे हद्दीत अतीक्रमण केल्याबद्दल लवटे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

पोलीस हवालदार बाजीराव कांबळे पुढील तपास करीत आहेत.

विवाहितेचा छळ चौघांविरोधात गुन्हा नोंद

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      प्रतिक्षा विनायक निऊंगरे ( रा. साळगाव ता. आजरा सध्या भादवण ता आजरा जि. कोल्हापूर) या विवाहितेचा माहेरकडून मुंबई येथ खोली घेणेसाठी १० लाख रुपये आणावे या कारणास्तव गेले वर्षभर शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद संबंधित विवाहितेने पोलीसांत दिल्याने सासरच्या चौघां विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

      पुढील तपास पोलीस हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत.

किटवडे धनगरवाडा येथे क्षयमुक्त अभियान

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आयुष्यमान आरोग्य मंदिर गवसे अंतर्गत विद्या मंदिर धनगरवाडा किटवडे येथे १०० दिवसीय क्षयमुक्त अभियान हा उपक्रम राबवण्यात आला.

     यावेळी मुले व मुली यांच्यासाठी क्षयरोग क्षय ( T.B) या विषयावर भाषण व निबंध स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमधील दिपाली कोकरे, कविता पांढरमिसे, हौसाबाई कोकरे या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले.

       यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.जी. गुरव ,समुदाय आरोग्य अधिकारी विक्रम गदळे, शिक्षक उत्तम कोकीतकर,आरोग्य सेविका माया सावंत व स्पर्धक उपस्थित होते.

निधन वार्ता
लिलाताई भोसले

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सिरसंगी ता.आजरा येथील श्रीमती लिलाताई दादासाहेब भोसले (वय ७८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले.

       रामचंद्र भोसले , सुनिल भोसले , अनिल भोसले , वैशाली भोसले यांच्या त्या आई होत. यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

लुटीचा बनाव करून पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न फसला… आजरा व सिंधुदुर्ग पोलिसांनी केला पर्दाफाश … अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या अलगद जाळ्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

mrityunjay mahanews

तोडणी ठेकेदारांकडून 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक : आजरा पोलिसात दोन ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews
error: Content is protected !!