mrityunjaymahanews
अन्य

महिलेच्या प्रसंगावधानामुळे तिघांना मिळाले जीवदान…. आजरा येथील शिवाजी नगर घाटावरील घटना…

 

महिलेच्या प्रसंगावधानामुळे तिघांना मिळाले जीवदान….

आजरा येथील शिवाजी नगर घाटावरील  घटना…

आजरा येथील शिवाजीनगर घाटावर आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेलेल्या सौ. प्रियांका पवार (वय 27 रा.शिवाजी नगर आजरा) व त्यांच्या अनुक्रमे 11 व 9 वर्षाच्या दोन मुलींना सौ. राजश्री रामचंद्र डोंगरे(रा.नबापूर/शिवाजी नगर) यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले. सौ राजश्री यांचे याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

घटनास्थळावरून याबाबत मिळालेली माहिती अशी की, सौ. प्रियांका पवार या आपल्या दोन मुलींना शिवाजीनगर घाटावर हिरण्यकेशी नदीपात्रामध्ये धुणे धुण्यासाठी घेउन गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या दोन मुली अंघोळीकरता पाण्यात उतरल्या. अचानकपणे पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी सौ. प्रियांका या प्रयत्न करत असताना त्या देखील मुलींबरोबर बुडू लागल्या.मुलींसह प्रियांका या बुडत असल्याचे लक्षात येताच घाटावर इतर धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये गोंधळ उडाला. जवळच धुणे धूत असलेल्या सौ.राजश्री यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःजवळची धुण्याकरता आणलेली एक साडी त्यांच्या दिशेने भिरकावली या साडीचा आधार घेत प्रियांका व त्यांच्या दोन मुलींना काठावर आणण्यात सौ. राजश्री याना यश आले.,केवळ त्यांच्या प्रसंगावधानामुळे  तिघींना जीवदान मिळाले.

सध्या आजरा शहरात या प्रकाराची जोरदार त्यांच्या असून सौ. डोंगरे यांचे कौतुक होत आहे.

आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर वैद्यकिय तपासणी शिबीर

आजरा  शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. गवसे येथे  डॉ. राहुल पाटील कन्सलल्टींग जनरल फिजिशियन, व त्यांचा स्टाफ लाईफ लाईन हॉस्पीटल आजरा यांचे मार्फत कर्मचा-यांच्या आरोग्याचा विचार करून कारखाना कार्यस्थळावर कर्मचा-यांची मोफत वैद्यकिय तपासणी करणेत आली. त्यावेळी कामगारांचे फिजिकल चेकींग, शुगर, ब्लड प्रेशर चाचणी, इ.सी.जी. इ. तपासण्या करण्यात आल्या. व आरोग्याबाबत सुचना करणेत आल्या.

कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. वसंतराव देसाई यांच्या पुतळयास हार घालुन वैद्यकिय तपासणी शिबीरास सुरूवात केली. यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे, व्हा. चेअरमन श्री. आनंदा कुलकर्णी, संचालक श्री. अशोक चराटी संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक श्री. मुकुंदराव देसाई, श्री, सुधीर देसाई, श्री. मधुकर देसाई, श्री. मारूती घोरपडे, संचालिका सौ. सुनिता रेडेकर, संचालक श्री. मलिककुमार बुरुड, श्री. दशरथ अमृते, श्री. जनार्दन टोपले, श्री अनिल फडके, श्री. लक्ष्मण गुडुळकर, श्री. आनंदा कांबळे, श्री. तानाजी देसाई, श्री. विलास नाईक कार्यकारी संचालक डॉ. टी.ए.भोसले, सेक्रेटरी व्ही. के, ज्योती, फॅक्टरी मॅनेजर (टेक्नि.) श्री.व्ही.एच.गुजर, चिफ केमिस्ट श्री. गणेश पाटील, इन लेबर ऑफीसर श्री सुभाष भादवणकर, कामगार संघटना अध्यक्ष श्री. प्रकाश देसाई व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रिय तंबाखु नियंत्रण च्या वतीने साळगाव शाळेत बक्षिस वितरण

राष्ट्रिय तंबाखु नियत्रंण अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सी. पी. आर. हाॅस्पीटल कोल्हापुर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरिय तंबाखु विरोधी घोषवाक्य स्पर्धेचे बक्षिस वितरण साळगाव शाळेत संपन्र झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. मंजिरी यमगेकर  होत्या
प्रास्ताविकात तालुका समन्वयक संजय मोहिते यांनी राष्ट्रिय तंबाखु नियत्रंण कक्षामार्फत वर्षभर शाळा स्तरावर विविध तंबाखु विरोधी ऊपक्रमांचे आयोजन , प्रबोधन , जनजागृती तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे या वर्षी तंबाखु विरोधी घोषवाक्य स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात आल्या होत्या त्या मध्ये तालुक्यातील वि मं किणे , वि मं साळगाव , कासारकांडगाव , देवर्डे , हाजगोळी बुद्रूक , किटवडे धनगरवाडा , मासेवाडी ,व्यंकटराव हायस्कुल आजरा , आजरा हायस्कुल आजरा या शाळांनी सहभाग घेतला होता याळेतील प्रथम ,द्बितीय तृतीय क्रमांकांना सी पी आर हाॅस्पीटल कोल्हापुर मार्फत शिल्ड व प्रमाण पत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या संपुर्ण अभियानाची माहिती श्री मोहिते यांनी दिली.
यावेळी या स्पर्धेबाबत व तंबाखु सेवन ,कर्करोग याबाबत समाजाची भुमिका तरुण पिढीची व्यसनाधिनता याविषयी श्री. डाॅ .मारुती डेळेकर(किणे), श्री सुनिल कामत( वाटंगी), श्री. दिपक कांबळे ( मासेवाडी) श्री.उत्तम कोकितकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी श्री. महादेव तेजम,सौ. अनुजा वाळके  , श्री आनंदा पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सत्यवान सोन्रे यानी केले व आभार निवृती मिटके यांनी मानले.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘ उचंगी ‘चे उद्या (शुक्रवारी) पाणीपूजन… माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,हसनसो मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित रहाणार…

mrityunjay mahanews

उत्तूर येथील दुचाकी अपघातात नवविवाहीत तरुणाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी अनिकेत चराटी… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews
error: Content is protected !!