mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आज-याला पुन्हा दंगलीचा धोका…?

पोलीस प्रशासनाकडून व्यापारी वर्गाला सूचना


                   आजरा:प्रतिनिधी

       शहरामध्ये घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना, त्यांचे उमटणारे पडसाद व सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे पसरणारे संदेश यामुळे आजरा शहराला पुन्हा एक वेळ दंगलीचा धोका असल्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी शहरवासीयांना दिला असून धार्मिक तेढ निर्माण होतील असे कोणतेही वर्तन आपल्याकडून होणार नाही याची प्रत्येक शहरवासीयाने काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

      आजरा शहरातील व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. शुक्रवारी एका व्यावसायिकाच्याबाबत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

       हारुगडे म्हणाले, व्यापाऱ्यांकडून शहरामध्ये खंडणी, हप्ता, जबरदस्तीने वर्गणी वसुली यासारखे प्रकार होत असतील तर तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार करावी. शहरांमध्ये छोट्या-मोठ्या घटना घडतात. अशा घटना घडत असताना धार्मिक तेढ निर्माण होणार नाही व शांती अबाधित राहील याची खबरदारी घेण्याची गरज आहे. आजरा शहराला दंगलीची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे पुन्हा एक वेळ दंगलीसारखी घटना घडल्यास त्याची दूरगामी परिणाम शहरवासीयांना भोगावे लागतील याचे भान ठेवण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

        शहरवासीय व व्यापारी वर्गाच्या वतीने व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, परशुराम बामणे, यशवंत इंजल, दयानंद भोपळे, सुशील लतीफ, शरीफ खेडेकर, सचिन इंदलकर,भास्कर बुरुड, संदीप पारळे, आदींनी विवीध सूचना मांडल्या.

        शहरवासीय व व्यापाऱ्यांच्या सूचनांची तातडीने दखल घेऊन योग्य ती अंमलबजावणी करण्याची आश्वासन यावेळी हारुगडे यांनी दिले.

     यावेळी बैठकीस आप्पासाहेब तेरणी, अण्णा फडके, प्रथमेश काणेकर, विनय सबनीस, अभिषेक रोडगी,अभि गोवेकर,मुकुंद फडके, जयवंतराव केळकर ,उमेश नेवगी,उमेश कुरुंदकर, वामन सामंत, गुरुप्रसाद टोपले, शंकर उर्फ भैय्या टोपले, गौतम भोसले, पोलीस ठाण्याचे गोपनिय विभागाचे अनिल तराळ यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाच्या सूचना…

१. छोट्या मोठ्या घटनांबाबत वेळीच तक्रारी द्या.
२. व्यापारी वर्गाने चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
३. सोशल मीडिया वरून चुकीचे संदेश जाणार नाहीत याची काळजी घ्या.
४. किरकोळ घटनांना धार्मिक रंग देऊ नका.

शहरवासीयांच्या सूचना…

१. तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करा.
२. बस स्थानक आवारात तरूणांचे रात्रीचे      क्रिकेट खेळणे बंद करा.
३. आठवडा बाजारात महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करावी.
४. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत.


मडिलगे व खानापूर येथे दोन गव्यांचा हृदयविकाराने मृत्यू


                       आजरा:प्रतिनिधी

           आजरा तालुक्यातील खानापूर व मडिलगे येथे शनिवारी दोन गवे मृतावस्थेत आढळले. सदर गव्यांचा थंडीमुळे हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागातून देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहेत.

            तालुक्यामध्ये गव्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ठिकठिकाणी असे गवे मृतावस्थेत आढळत आहेत.


अखेर आजरा दंगलीतील संशयीत पंधरा वर्षांनी दोषमुक्त


                   आजरा: प्रतिनिधी

          आजरा येथे सन २००८ मध्ये उसळलेल्या हिंदू – मुस्लीम दंगलीच्या वेळी धार्मिक भावना दुखावणारे पत्र प्रसिद्ध केल्याचा आरोप करून सदर दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आजरा गावातील परशुराम बामणे, दयानंद भोपळे, विजय थोरवत, संजय होडगे जयसींग पाटील वगैरे आठ आरोपीविरुद्ध भारतीय भारतीय दंड संहिता कलम १५३A , B व कलम २९५ A, १०९, ५०५ खाली आजरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याचे तपासांती आजरा पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकाऱ्यानी संबंधित आरोपीविरुद्ध आजरा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांना दोष मुक्त करण्याकरता मे. न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर आरोपीतर्फे वकिलांचा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना दोषमुक्त करण्याचा आदेश केला आहे.

         सदर कामांमध्ये आरोपींचे वतीने ॲडव्होकेट शैलेश देशपांडे, ॲडव्होकेट देवदास आजगेकर, ॲडव्होकेट धनंजय देसाई व ॲडव्होकेट सचिन इंजल यांनी काम पाहिले.


विनापरवाना देशी दारू जवळ बाळगल्याबद्दल गुन्हा नोंद


                        आजरा:प्रतिनिधी

         विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या देशी दारू जवळ बाळगल्याच्या आरोपावरून कोळिंद्रे ता. आजरा येथील अमर लक्ष्मण नाईक याच्या विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      याबाबतची वर्दी पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजीत जाधव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. कोळिंद्रे- बटकणंगले मार्गावर सदर कारवाई करण्यात आली.


भोवताल…

अबब…भरलेला ऊसाचा ट्रक झाडावर चढतोय काय..‌.?

                  चंदगड : प्रतिनिधी

        सध्या ऊस कारखान्याचे गाळप हंगाम जोरात सुरू आहेत.त्यात चंदगड तालुक्यातील दौलत (अथर्व) हलकर्णी, हेमरस (ओलम ) राजगोळी,कोलीक म्हाळूगे येथील नलवडे या तीनही कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या सहकार्याने सुरळीत चालू आहेत.शेतक-यांचा जास्त  उसाने भरलेल्या आणि त्यासाठी बांधलेल्या (रोप) दोरात अडकल्याने ट्रकच्या समोरील ऊस मागे आल्यामुळे ट्रकाची पुढील बाजू पूर्णपणे उचलली गेल्याने  झाडावर चढतोय की काय .. असा प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात निश्चितच आला असेल.

   ट्रक चालक आणि क्लीनर  दैव बलवत्तर म्हणून बचावले. ट्रकच्या समोरील काचा फुटल्या. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.ही घटना कुद्रेमणी (ता.जि.बेळगाव ) येथे आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली .


.

संबंधित पोस्ट

गणेशमूर्ती सांभाळण्याच्या नादात एकाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

देवकांडगाव येथील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू…बहिरेवाडी येथे मारामारी… चार जखमी

mrityunjay mahanews

प्रा. संजय मंडलिक हेच योग्य उमेदवार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!