mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


गव्यांच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

                        आजरा:प्रतिनिधी

          चुकलेल्या गायी शोधण्यासाठी गेलेल्या
कोंडीबा बाबू येडगे (रा.आवंडी धनगर वाडा क्रमांक ३ सध्या रा.पुंदरा,चंदगड) यांच्यावर गव्यांच्या कळपाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

येडगे यांच्या गायी चरण्यासाठी सोडल्या असता पुंदरा धनगरवाडा येथे त्या वाट चुकल्याने सापडत नसल्याने काल सकाळी या गाई  शोधायला ते गेलेले असताना पुंदरा हद्दीपासून २०० मिटर अंतरावर असणाऱ्या आवंडी हद्दीत  गव्यारेड्यांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला.गव्याने  त्यांना उचलून आपटल्याने ते गंभीर जखमी झाले.

      येथूनच गंगाराम बाबू येडगे कामावर जात असताना त्यांना येडगे यांच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून गंगाराम त्या दिशेला गेला. तिथे येडगे जगणे अवस्थेत पडलेले आढळले. गवे जंगलांच्या दिशेने निघून गेले.

      यामध्ये डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने येडगे यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


महिलेला मारहाण… चौघांविरुद्ध गुन्हा नोंद


                       आजरा:प्रतिनिधी

जमिनीच्या रस्त्याच्या वादातून अंबाडे येथील रेणुका दशरथ खैरे या ६२ वर्षीय महिलेला मारहाण केल्याप्रकरणी आजरा पोलिसात पद्मावती पुंडलिक पताडे, तुळसाबाई रामचंद्र पताडे,पुंडलिक रामचंद्र पताडे, रामचंद्र दौलत पताडे (सर्व रा. आंबाडे पो किटवडे ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      खैरे व पाताडे कुटुंबीय हे एकाच गावातील रहाणारे असून त्यांच्यामध्ये जमिनीतून जाणारे रस्त्याबाबत वाद आहेत.या वादातून सदर प्रकार घडला. सहा. फौजदार दत्ता शिंदे पुढील तपास करीत आहेत.


विशेष श्रमसंस्कार शिबिरात ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण ‘या विषयावर व्याख्यान

                    आजरा : प्रतिनिधी

          आजरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रश्मी गाडगीळ यांनी महिला ‘ सबलीकरण व सक्षमीकरण ‘ याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

       गाडगीळ म्हणाल्या, महिलांची त्यांच्या लहानपणापासूनच आरोग्याची काळजी घेतली गेली तर त्यांचे सामाजिक आर्थिक सबलीकरण व सक्षमीकरण चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. आज वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत असून त्यांना सामोरे जाण्यासाठी आपले आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. यावेळी त्यांनी महिलांना आरोग्य विषयक येणाऱ्या अडचणी समस्या या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मासेवाडी गावातील महिलांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण केले होते. त्या अनुषंगाने त्यांनी येथील महिलांना येणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींची सविस्तर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी चोडणकर आभार सिद्धी होरंबळे हिने मानले.


सांस्कृतिक स्पर्धेत देवर्डे शाळेचे यश

                     आजरा: प्रतिनिधी

        देवर्डे (ता. आजरा) येथील मराठी विद्यामंदिर शाळेने सांस्कृतिक स्पर्धेतील समूहनृत्य प्रकारात कनिष्ठ गटात दुसरा, तर वाराङ गटात पहिला क्रमांक मिळवला. नंदिनी राजेंद्र पाटीलने कथाकथनमध्ये वरिष्ठ गटामध्ये पहिला क्रमांक पटकावला.

     आजरा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे या स्पर्धाचे आयोजन केले होते. सरोजिनी कुंभार, रेश्मा बोलके, महादेव तेजम, सुनील पाटील, श्रीकांत पाटील या शिक्षकासह संस्कृती बागडी व पौर्णिमा बागडी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे सहकार्य लाभले.


निधन वार्ता
ॲड. लक्ष्मण गुडूळकर


मेंढोली (ता. आजरा) येथील ॲड. लक्ष्मण धोंडिबा गुडुळकर (वय ७०) यांचे रविवारी पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते साखर कारखान्याचे माजी संचालक, सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य मुंबईचे माजी आजरा तालुकाध्यक्ष, मेंढोलीचे माजी सरपंच होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

आनंदी गुरव

खानापूर येथील आनंदी गुंडू गुरव (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ८ रोजी सकाळी होणार आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-याची कन्या झाली आमदार… आजऱ्यात जल्लोष

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कार मोटरसायकल अपघातात रोहन देसाई जखमी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!