mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मग काम अडवले कशासाठी…?


             ✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत

     गेले आठ दिवस रामतीर्थ फाटा ते रामतीर्थ मंदिर या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण सुरू आहे. बुधवारी सायंकाळी अचानकपणे वनविभागाने या कामाला हरकत घेतली. वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याला परवानगी घेतलेली नसल्याचा खुलासा परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांनी केला. व सदर कामास स्थगिती आणली. तुम्ही परवानगी मागा आम्ही परवानगी देतो… असा साधा फॉर्म्युला यावेळी वापरण्यात आल्याने मुळातच हे काम अडवले कशासाठी ? हा प्रश्न आता जाणकारांना पडला आहे.

      वास्तविक वनखात्याच्या जमिनीतून रस्ता करताना त्याची रीतसर परवानगी आवश्यक आहे.पण यापूर्वीही रामतीर्थ फाटा ते रामतीर्थ या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण वेळोवेळी झाले असताना यावेळी वन विभागाने हा प्रश्न उचलून धरला . संबंधित ठेकेदारावर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु रीतसर परवानगी मागितल्यावर देणार असे वन विभागाने स्पष्ट केल्याने जर ही प्रक्रिया खरोखरच इतकी साधी सोपी होती तर कामाला हरकत घेण्यामागचा नेमका उद्देश काय ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याचे काम देण्यापूर्वी अथवा ठेका आहे घेण्यापूर्वी ठेकेदाराला याची कल्पना नव्हती काय ? हा मुद्दाही महत्त्वाचा आहे

      तालुक्यात इतर अनेक ठिकाणी वन खात्याच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे वाडी -वस्त्यांवर जाताना अनेक अडचणी येत आहेत.जर इतकी सहज, साधी ,सोपी व सरळ ही प्रक्रिया असेल  तर ते याच पद्धतीने वनविभागाने सोडवल्यास तालुकावासिय निश्चितच सुखावतील.


देवर्डेच्या सरपंचपदी कल्पना चाळके


                    आजरा: प्रतिनिधी

        देवर्डे ता. आजरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पना वसंतराव चाळके यांची निवड झाली. मंडल अधिकारी एस. एस. कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली. यावेळी सदस्य सौ.शीला गुरव उपसरपंच मारुती बुरुड, जी. एम. पाटील, जोतिबा चाळके बाबासाहेब तानवडे, भीमराव चाळके, देवदास बोलके, सर्जेराव पाटील, शामराव पाटील, संदीप जाधव, काशिनाथ मोरे, यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


सेंद्रीय शेतीकडे शेतक-यांने वळण्याची गरज :राहुल टोपले


                    आजरा: प्रतिनिधी

         सेंद्रीय शेतीतून विषमुक्त व कसदार अन्नधान्य व भाजीपाला पिकवता येतो. माणसांना रोगापासून दूर ठेवता येते. आरोग्य जपायचे असेल तर सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे. असे प्रतिपादन मिशन ऑरगॅनिक कोल्हापूर या संस्थेचे संचालक राहुल टोपले यांनी केले.

        मासेवाडी (ता. आजरा) येथे आजरा महावि‌द्यालयाच्यावतीने विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे. यामध्ये सेंद्रिय शेती व आनंदी जीवन या विषयावर श्री. टोपले यानी मार्गदर्शन केले. चंद्रकांत शंकर खोत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. टोपले म्हणाले, ‘विषमुक्त व रसायनमुक्त शेती करणे ही काळाची गरज आहे. शेतीमध्ये रसायनांचा प्रचंड वापर होत असल्याने शेती नापीक बनत चालली आहे: या शेतीमधून निर्माण झालेला भाजीपाला व अन्नधान्यादवारे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.

     सेंद्रिय शेतीमुळे शेतीमधील उत्पादन खर्च कमी करता येतो व यामधून लोकांचे आरोग्य ही जपता येते.

      सरपंच पांडुरंग तोरगले, उपसरपंच चंद्रकांत खोत, अंकुश राजाराम बडर, श्रावण नामदेव चौगुले, वैभव महादेव गिरी उपस्थित होते.

       निशा दोरुगडे हिने सुत्रसंचालन केले तर आभार कुमारी साधना सासूलकर यांनी मांनले. या व्याख्यानास मासेवाडी ग्रामस्थ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी संग्राम पाटील


                    आजरा:प्रतिनिधी

भाजपाच्या युवा मोर्चा, कोल्हापुर ग्रामीणच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. घाटकरवाडी येथील संग्राम रामचंद्र पाटील यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात करण्यात आली आहे.

      इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे…
उदयराज महादेव चव्हाण, आजरा( जिल्हा सरचिटणीस)संतोष आप्पा चौगले, शिरसंगी ( जिल्हा उपाध्यक्ष)सचिन रणजीत पाटील, गवसे ( जिल्हा कार्यकारणी सदस्य)
समीर पांडुरंग देसाई, उचंगी (जिल्हा कार्यकारणी सदस्य)शिवाजी लक्ष्मण खामकर,पोळगाव ( जिल्हा कार्यकारणी सदस्य)संजय अनंतराव धुरे , उत्तुर( जिल्हा कार्यकारणी सदस्य )


पंडित दीनदयाळ विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात

                    आजरा: प्रतिनिधी

     येथील पंडित दीनदयाळ हायस्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात सुरू झाला आहे.

     क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पंडित दीनदयाळ हायस्कूलचा माजी विद्यार्थी आणि आजऱ्यातील उदयोन्मुख व्यवसायिक सुरेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.

      विद्यार्थ्यांच्या अंगी वेगवेगळे सुप्त गुण असतात, या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्या विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार भावी आयुष्यात चांगले मार्गदर्शन मिळून एक उत्तम प्रकारचा खेळाडू बनावा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच विद्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती तसेच हा क्रीडा महोत्सव दोन दिवस चालणार असून यामध्ये वेगवेगळ्या खेळ प्रकारांची स्पर्धा घेण्यात येणार आहेत असे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी सांगितले. यानंतर संस्थेचे संचालक सुधीर कुंभार यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

     यावेळी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली व उद्घाटनाचा खो – खो चा सामना खेळवण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


तहसीलदारांना निवेदने…

१. इको सेन्सिटिव्ह झोन मधील उत्खनन बंद करा…

    आजरा तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये सुरू असणारे बेकायदेशीर उत्खनन तातडीने थांबविण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय जनहित पार्टीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

२. महामार्गासाठी पूर्वकल्पना न देता जमिनीतून काम केले जात असल्याबाबत आत्मदहनाचा इशारा…

     राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणतीही कल्पना न देता आपल्या शेतातून रस्त्याचे नियोजन केल्याच्या पार्श्वभूमीवर आजरा येथील समीर मोरजकर यांनी महामार्ग प्रशासनासह महसूल विभागाला हा प्रकार त्वरित न थांबल्यास आत्मदानाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.


संबंधित पोस्ट

विजेचा धक्का बसून आज-यात एकाचा मृत्यू…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सुळे येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!