सोमवार दि.१३ आक्टोंबर २०२५


जि. प., पं.स. साठी आज आरक्षण सोडत…
धाकधूक वाढली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या आरक्षणाचे चित्र आज, सोमवारी स्पष्ट होणार आहे. आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या चार जागांचे मतदारसंघ निहाय आरक्षण जाहीर होणार आहे. यामुळे गेले तीन वर्षे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मंडळींची धाकधूक वाढली आहे.
स्थानिक नेते मंडळींनी कमी झालेला जि.प.चा एक व पंचायत समितीचे दोन मतदारसंघ पूर्ववत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु यामध्ये फारसे यश आले नाही.
जिल्हा परिषदेच्या उत्तुर व वाटंगी तर पंचायत समितीच्या उत्तुर, भादवण, वाटंगी व पेरणोली मतदार संघाकरीता आज आरक्षण जाहीर होणार आहे.
आजच ठरणार सभापती पदाचे आरक्षण…
या आरक्षणाबरोबरच आज पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षणही जाहीर होणार आहे.
हात्तीवडे गाव शिवारात बिबट्याचा वावर…?
ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हात्तिवडे गाव शिवारामध्ये बिबट्याच्या पाऊलखुला आढळून आल्या असून कांही जणांनी बिबट्याला पाहिल्याचे समोर येत आहे.
बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने या भागात बिबट्याचा वावर आहे हे अधोरेखित झाले आहे. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कांही ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिल्याचेही सांगितले जाते. बिबट्याकडून अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही तरी देखील या परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

हत्तीचा बंदोबस्त करा… आजपासून घाटकरवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घाटकरवाडी गावामध्ये जून २०२५ ते आज अखेर हत्तीचा रहिवास असून हत्तीकडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. थेट गाव- वस्तीमध्ये संध्याकाळच्या दरम्यान हत्ती येत असून ऊस, भात, नाचना या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी वन विभागाला तक्रारी देऊन सुद्धा आज तागायत हत्ती हटवण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आज सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर पासून घाटकरवाडी ग्रामस्थ उपोषणासह रास्ता रोको करणार आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्तूर मधील वडभाव परिसराची स्वच्छता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दर रविवारी एक तास गावच्या स्वच्छतेसाठी उपक्रमाद्वारे आज वडभाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. पूर्वी कित्येक वर्षे उत्तूर गावची तहान भागवणारी विहीर म्हणून ओळख असणाऱ्या वडभाव परिसराची आज ग्रामपंचायत उत्तूरच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात गावातील महादेव तरुण मंडळ व गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विहीर परिसरात वाढलेली झुडपे व गवत, इतर प्लास्टिक कचरा काढून विहिरीची स्वच्छता करण्यात आली. विहिरीच्या पाण्यात टीसीएल टाकून पाणी वापरण्यायोग्य केले .या स्वच्छता उपक्रमात सरपंच किरण आमणगी ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, भैरू कुंभार, संदेश रायकर ,सरिता कुरुंदकर, सविता सावंत ,मंडळाचे कार्यकर्ते संजय गुरव, बाबुराव पाटील ,वसंत जाधव , सुरेश बामणे ,पोपट बार्देस्कर, अभी सावंत, विनायक कातोरे,तानाजी कातोरे, योगेश सावंत, सचिन उत्तूरकर ग्रामपंचायत कर्मचारी सचिन फाळके, महादेव मोरवाडकर, संजय पाटील, चंद्रकांत इंगळे उपस्थित होते.
भैरू कुंभार यांनी स्वागत केले, सरपंच किरण आमणगी यांनी आभार मानले.
ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवणे शक्य : डॉ.अशोक कडलक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ऊस उत्पादन घेतांना शेतकऱ्यांना जमिनीचे गुणधर्म, हवामानात होणारे वेळोवेळी बदल, माती परिक्षण, रोग, किडीचा प्रादुर्भाव या सगळ्याची माहीती कृत्रिम बुध्दीमता (एआय तंत्रज्ञान) यांच्या मार्फत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे. यामुळे वीस ते तीस टक्के ऊसाची उत्पादन वाढ करणे शक्य असल्याचे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिटुटचे प्रमुख संशोधक डॉ.अशोक कडलक यांनी केले.
आजऱ्यातील जनता बँकेच्या सभागृहात त्रिस्तरीय बेणे ऊस बेणे मळा प्रकल्प मार्गदर्शन मेळाव्यात डॉ. कडलक बोलत होते. वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, भारतीय ग्रीन टेक प्रा. लि. संचालक विनय पोळ, उपाध्यक्ष सुभाष देसाई प्रमुख उपस्थित होते.
कारखान्याचे शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. कडलक म्हणाले, भविष्यात शेतीसाठी जमिनीचा वापर वाढले ही आशा संपललेली
आहे. त्यामुळे आहे त्या जमिनीमध्ये उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी कुत्रिम बुध्दीमतेचा वापर करावा लागले. विभागीय कृषी सहसंचालक श्री. मास्तोळी म्हणाले, सध्याचे ऊसाचे उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा देणारे नाही. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे लागले. शेतीचे योग्य ते नियोजन करावे लागले. विनय पोळ, मुकुंदराव देसाई यांचे भाषण झाले.
या वेळी जिल्हा बँकेचे संचलाक सुधीर देसाई, संचालक रणजित देसाई, दिगंबर देसाई, एम. के. देसाई, मारुती घोरपडे, रचना होलम, रशिद पठाण, नामदेव नार्वेकर, शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत, राजू होलम, संताजी सोले, अशोक गुरव, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, कार्यालयीन अधिक्षक अनिल देसाई, प्रकाश चव्हाण, अमित सामंत, परेश पोतदार, एस. व्ही. कालेकर, सचिन देसाई, नंदकुमार देसाई, भिकाजी गुरव, उस पुरवठा अधिकारी राजू देसाई यासह शेतकरी उपस्थित होते. सुरक्षितता अधिकारी रमेश देसाई यांनी सुत्रसंचालन तर उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी आभार मानले.

आनंदराव नादवडेकर शिक्षक पतसंस्थेकडून, दिवाळी भेट वस्तू वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्था, आजरा येथे मार्च २०२५ अखेरच्या सर्व सभासद बंधू-भगिनींना खास दीपावली निमित्त ५ लिटर खाद्यतेलाचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुणे विभाग संपर्क प्रमुख श्री. सुनिल शिंदे , शिक्षक बँक संचालक श्री. शिवाजी बोलके व बळवंत शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चेअरमन श्री. सुभाष आजगेकर, व्हा. चेअरमन सौ. भारती चव्हाण, यांच्यासह सभासद उपस्थित होते.



ए.