mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार १३ एप्रिल २०२६

चारचाकीने दुचाकीला ठोकले…
चालकास ग्रामस्थांनी ठोकले…
दुचाकीवरील तिघे जखमी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे येथे आजरा – गडहिंग्लज मार्गावर चारचाकी व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील तिघे जखमी झाले आहेत. सदर अपघात झाल्यावर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी चार चाकी चालकास चांगलेच ठोकले.

मनोज दत्तात्रय बोरकर (वय ४० वर्षे) पत्नी पुनम (वय. ३२ वर्षे) ,व मुलगी वैष्णवी( वय ८ वर्षेसर्व रा. नेर्ली तामगांव ता. करवीर जि. कोल्हापूर ) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी मनोज बोरकर यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते.

पुथ्वीराज राजेंद्र चव्हाण( वय ३२ वर्षे रा. कसबे डिग्रज ता. मिरज जि. सांगली) हे स्वीफ्ट डिझायर वाहन चालवत होते. मडिलगे पासून २०० मीटर अंतरावर समोरुन येणाऱ्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकलला जोराची धडक दिली यामध्ये पतीसह पत्नी व लहान बालिका जखमी झाली. हे सर्व नेर्ली तामगांव ता. करवीर जि. कोल्हापूर येथील राहणारे असून त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चारचाकी चालक अपघातस्थळी न थांबता पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना ग्रामस्थांनी त्याला धरून चोप दिला व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.अपघाताची माहिती कळताच सपोनि बाबासाहेब सरवदे, पोउनि.संजय पाटील,युवराज धोंडे यांनी भेट दिली.पुढील तपास पांडुरंग येलकर करत आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रे ठार…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे तालुका आजरा येथे गावापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असणाऱ्या बाबू हरळकर यांच्या शेतातील गोठ्याजवळ बांधलेल्या कुत्र्याचा शनिवारी रात्री बिबट्याने फडशा पाडला. तर एक कुत्रे गायब असल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मडिलगे, सोहाळे भागात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले आहे. बिबट्याच्या या वावराने शेती कामासाठी व काजू बिया गोळा करण्यासाठी जाणाऱ्या मंडळींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचे आज होणार चित्र स्पष्ट


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात पेरणोली, हरपवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणुक लागली आहे. तर हरपवडे, मडिलगे, बहिरेवाडी, देऊळवाडी, धामणे येथे सदस्यपदासाठी पोट निवडणूक लागली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.

यापूर्वी ९ अर्ज दाखल झालेले आहेत.

सरपंचपदासाठी ६ तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३ अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी पेरणोली येथून राजश्री पवार,संध्या कालेकर, संजीवनी नावलकर, राजश्री देसाई असे ४ तर कोरीवडे सरपंच पदाकरिता संदीप आनंदा रायकर विवेक दिगंबर पाटील असे २ अर्ज दाखल झाले आहेत.

सदस्यपदासाठी धामणे २ तर हरपवडे १ अर्ज दाखल झाला आहे. देऊळवाडी, मडिलगे व बहिरेवाडी येथे आजतागायत एकही अर्ज दाखल झालेला नाही. आज मात्र मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

आ. सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

विधान परिषदेचे गटनेते व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आ. सतेज उर्फ बंटी डि. पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ मृत्युंजय ‘ कार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

या प्रसंगी अशोक तर्डेकर, संजयभाऊ सावंत, रविंद्र भाटले, विक्रम देसाई, सुमीत सावंत, बाळासाहेब पाटील, निसार लाडजी, रवींद्र तळेवाडीकर, विलास जोशीलकर, आरीफ खेडेकर, किरण पाटील डॉ. शाहिद लाडजी आणि ग्रामीण रुग्णालय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

वेळवट्टी येथे विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वेळवट्टी या.आजरा येथे विठ्ठल रुक्माई मंदिर जिर्णोद्धारासाठी आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून दहा लाख रुपये उपलब्ध झाले होते त्याचा उदघाटन सोहळा प्रा.अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडला.

यावेळी स्वागत व प्रास्तावीकात ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत देसाई यांनी मा. प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या अंदाजे २ कोटी १२लाख रुपये तसेच भविष्यातील नियोजित विकासकामांची माहिती दिली अध्यक्षीय भाषणात प्रा.अर्जुन आबिटकर यांनी भविष्यात देखील निधीची कमतरता भासू देणार नाही तसेच मा. आरोग्यमंत्री यांचे या गावावरील प्रेम सदैव असेच राहील असे सांगितले.

रुपचंद्र गावडे यांनी आपल्या मनोगतात वारकरी सांप्रदाय चा आढावा दिला जितेंद्र पोवार यांनी आभार मानले.

यावेळी वारकरी सांप्रदाईक मंडळ अध्यक्ष मधुकर गावडे व इतर मान्यवरांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत, साळगावचे सरपंच  धनंजय पाटील, संतोष भाटले, काकासो देसाई, शनिल महागावकर, सरपंच मारुती पोवार, ग्रामपंचायत सदस्य शामराव पोवार, सुनंदा कुंभार, रेश्मा गावडे, मनीषा देसाई इंजिनिअर अनिकेत शिंत्रे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

देसाई सरांनी शिक्षक धर्माचे पालन केले : राधाब्रज मोहनदास महाराज

पेरणोलीत रविंद्र देसाई यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

माणूस कधी निवृत्त होत नाही. माणूस हा सदैव कार्यरत असतो. ही सेवानिवृत्ती नव्हे सेवासंपन्न समारंभअसेच म्हणावे लागेल. रविंद्र देसाई यांनी आपल्या शिक्षकी सेवेत शिक्षक धर्माचे पालन केले आहे. असे प्रतिपादन राधाब्रज मोहनदास महाराज बेळगाव यांनी केले.

सेवानिवृत्त शिक्षक रविंद्र शंकरराव देसाई यांचा मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी राधाब्रज मोहनदास महाराज बोलत होते. शारदाबाई वि. चव्हाण गर्ल्स हायस्कूल व पेरणोली हायस्कूल मधून ३५ वर्षांच्या सेवेतून देसाई हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पेरणोली (ता. आजरा) येथे कार्यक्रम झाला. यावेळी गर्जा महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक परश्राम बामणे म्हणाले, देसाई सर हे सरळ स्वभावाचे आहेत. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आळखले जातात. त्यांनी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यामिक व शैक्षणिक कार्यात ठसा उमटवला आहे. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. श्रमिक मुक्ती दलाचे राज्यकार्याध्यक्ष का. संपत देसाई म्हणाले, आम्ही एका वर्गात शिकलो. पण देसाई हे पुढे शिक्षक झाले. त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे टी. एस. देसाई म्हणाले, देसाई यांनी शैक्षणिक कार्य करतांना सामाजिक भान देखील राखले. आजरा कारखान्याचे संचालक हरीबा कांबळे म्हणाले, देसाई यांनी सामाजिक बांधीलकी जीवना जपली आहे. इथून पुढे ही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रीय रहावे.

जे. पी. नाईक संस्थेचे अध्यक्ष डॉ . शिवशंकर उपासे, आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित तोडकर तोडकर, आबासाहेब मोहीते, शिवाजी बिद्रे, विनायक आमनगी, संजय मोहीते, इनास फर्नांडीस, शिवाजी देसाई शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थ, तरुण मंडळी यांचे सहकार्य मिळाले.

आजरा आगारात बुधवारी प्रवासी राजा दिन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा आगारात प्रवासी राजा दिन व कामगार दिन बुधवार (ता. १५) होत आहे. सदरच्या कार्यक्रम प्रवाशी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करणेसाठी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या दिवशी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत पहिल्या सत्रात प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्विकारल्या जातील व त्यावरील उपाययोजनाबाबत चर्चा होईल. दुपारी ३ नंतर दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीगत अथवा संघटनात्मक समस्या एटेकून घेतल्या जातील. त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

प्रवासी व कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरुपात नेमून दिलेल्या वेळेत आगारात देण्यात याव्यात. असे आवाहन आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 आजचे पंचांग 

दिनांक : १३ एप्रिल २०२६
वार : सोमवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : एकादशी (१४ एप्रिल रात्री ०१.०८ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (दुपारी ०४.०३ पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : शुभ योग (सायंकाळी ०५.१६ पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : भाव करण (दुपारी ०१.१८ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५८ ते सकाळी ०९.३२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१४ ते दुपारी ०१.०४
सूर्योदय : सकाळी ०६.२४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत १९४८ शक संव

आयपीएल न्यूज

मुंबई विरुद्ध बंगळूरु सामन्यामध्ये मुंबईला १८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. २४० धावांचे उद्दिष्ट गाठताना मुंबईचा पाच बाद २२२ धावांवरच खेळ आटोपला. फिल सॉल्ट याने ३६ चेंडूत ७८ धावा काढत सामनावीरचा बहुमान पटकावला.

गुजरात विरुद्ध लखनौ सामन्यात गुजरातने लखनौला पराभूत केले.

आजचा सामना

हैदराबाद विरुद्ध राजस्थान
स्थळ : हैदराबाद
वेळ : सायंकाळी ७.३० पासून

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात राजकीय त्सुनामी…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

बैलाच्या हल्ल्यात पारपोलीत शेतकऱ्याचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!