mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

आज-यात ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

आज-यात तेहतीस वर्षीय तरुणाची आत्महत्या

साई कॉलनी आजरा येथील अझरुद्दीन अब्दुल अजीज राजगुरू या ३३ वर्षीय तरूणाने राहत्या घरी स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री सदर प्रकार घडला असल्याचे परिसरातील नागरिकातून सांगितले जाते. मंगळवारी सकाळी सदर प्रकार निदर्शनास आला. अझरुद्दीन याने आत्महत्या केल्याचे समजताच त्याचा मित्र परिवार मोठ्या संख्येने साईनगर येथील राहत्या घरी जमा झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले व आई असा परिवार आहे.

आजरा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक…

 चार बाधित सापडले

आजरा तालुक्यामध्ये कोरोना चा प्रवेश पुन्हा एक वेळ झाला असून तालुक्यात चार रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशभर पुन्हा एक वेळ कोरोनाची लाट आली आहे. आजरा तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. येत्या आठवडाभरात प्रचंड संख्येने रुग्ण सापडण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे. तालुक्यातील होन्याळी येथील ५१ वर्षीय पुरुष मडीलगे येथील ३३ वर्षीय , वझरे येथील ३० वर्षीय पुरुष,आणी यमेकोंड येथील ३४ वर्षीय पुरुषाचा नुकत्याच सापडलेल्या बाधीतांमध्ये समावेश आहे.

ज्योतिप्रसाद सावंत यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशन, कोल्हापूर यांच्यावतीने आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार ‘मृत्युंजय महान्यूज’ चे संपादक ज्योतिप्रसाद सावंत यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संजय घोडावत विद्यापीठ येथे दैनिक सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक मा. श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक मा. डॉ. शैलेश बलकवडे, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त मा. विनायक भोसले, संजय घोडावत पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य मा. विराट गिरी, कार्यकारी संपादक बी न्यूज मा. ताज मुल्लाणी, दैनिक नवराष्ट्रचे आवृत्ती प्रमुख मा. दीपक घाटगे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर निर्मळे आदी मान्यवरांसह जिल्हाभरातील विविध वृत्तपत्रांचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित उपस्थित होते.

कोवाडे येथे सातेरी दूध संस्थेत सत्तांतर.…

कोवाडे  (ता.आजरा)येथील सातेरी सहकारी दूध व्याव.संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सातेरी परिवर्तन पॅनेलने सत्तांतर घडवीत ३०वर्षाची सत्ता संपुष्टात आणली .या पॅनेलने १०जागा जिंकत सत्तांतर केले, तर विरोधी विठ्ठल-रुक्मिणी आघाडीला बिनविरोध एका जागेवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत सत्ताधारी विठ्ठल-रुक्मिणी आघाडीचे भटक्या विमुक्त जाती जमातीमधील राखीव मोहन गोंधळी तर सातेरी परिवर्तन आघाडीचे अनुसुचित जाती -जमातीचे रमेश कांबळे बिनविरोध निवडून आले होते.त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस होती.मात्र सातेरी परिवर्तन आघाडीने निवडणुकीतील सर्व १०जागा जिंकून एकतर्फी सत्ता प्रस्थापित केली.सातेरी परिवर्तन आघाडीचे विजयी उमेदवार व पडलेली मते पुढील प्रमाणे..आनंदा घोळसे(७३)भास्कर देसाई(६७)अमर होडगे(६६)बाबू सुतार(६६)नामदेव सावंत(६२)महादेव मांगले(६१)आप्पा पोवार(५९)सरिता जगदाळे(६८)विमल भिऊगडे(६१)अशी मते पडली. विजयी उमेदवार व समर्थकानी फटाके फोडत गुलालाची उधळण केली.सातेरी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व सरपंच मनोहर जगदाळे,धनंजय सावंत,महादेव पोवार,
माजी सरपंच व तंटामुक्त समिती सदस्य मारुती देसाई अमृतराव हुंदळेकर,गणपती घोळसे रघुनाथ गुरव संतोष चौगुले, शंकर जकाते यांनी केले तर विरोधी आघाडीचे नेतृत्व डी. वाय. देसाई,विनायक जकाते, सयाजी होरटे,विठोबा तांबेकर यांनी केले.

महत्वाच्या घडामोडी :-

 

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडणार…

 

जानेवारी महिना अखेर कोरोना रुग्णांचा उच्चांक गाठण्याची शक्यता असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज

 

देशात एक लाख ७९ हजार नवीन रुग्ण यामध्ये ९० टक्के  ओमिक्रोनचे रूग्ण

संबंधित पोस्ट

सिरसंगी येथे नवविवाहितेची आत्महत्या…नामदार मुश्रीफ यांच्यावरील चराटी यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’….. ना. मुश्रीफ समर्थक कारखाना संचालकांचा पत्रकार बैठकीत आरोप

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पेंढारवाडीत दोन जनावरांना ‘लंपी’ ची लागण ? गडहिंग्लज उपविभाग हादरला….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रेंदाळ येथील पर्यटकांकडून आज- यात गोळीबार…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!