mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरठळक बातम्याभारत

शिक्षक भरतीत शासनाची फसवणूक, मुख्याध्यापकासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंद…डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार

शिक्षक भरतीत शासनाची फसवणूक, मुख्याध्यापकासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

अंजुमन इत्तेहादुल इस्लाम या संस्थेमार्फत चालवल्या जाणा-या डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज, आजरा येथे मुख्याध्यापकासह पाच जणांनी चुकीची  माहिती देऊन शिक्षक भरती केली. यामुळे शासनाची फसवणूक झाली असल्याची फिर्याद श्री. भिमराव दत्तात्रय टोणपे (वय 55, व्यवसाय प्रभारी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग ) यांनी आजरा पोलिसात दिल्याने मुख्याध्यापक जमशिद दस्तगीर जमादार, कनिष्ठ लिपिक याहयाखान निजाम बुडेखान, उपाध्यक्ष अहमंद अब्दुल मुराद, ठराव सुचक मन्सुर अ. कादर माणगावकर व ठराव अनुमोदक हसन हुसेन दरवाजकर या पाच जणांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मुख्याध्यापक जमादार यांच्यासह वरील पाच जणांनी संगणमत करून धर्मादाय आयुक्त यांचे पीटीआर उता-याला मंजूरी नसताना तो बरोबर व खरा असल्याचे भासवून तशी कागदपत्र तयार करून फिर्यादी यांचे शिक्षण कार्यालयात कु. शाहिस्ता यासीन शेख हिची विनाअनुदानीत सहाय्यक शिक्षक पदावरून अनुदानीत सहाय्यक शिक्षक रिक्तपदी नियुक्तीसाठी प्रस्ताव सादर करून प्रस्तावास मान्यता घेतली. याबाबतची तक्रार फिर्यादी यांचे कार्यालयाकडे प्राप्त झाली. या तक्रार अर्जाच्या चौकशीत वरील पाच जणांनी चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरोधात सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे सन 2004 नंतर डाॅ.झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल मध्ये  झालेल्या शिक्षक भरतीतील  गैरप्रकार बाहेर येणार असून यामध्ये आर्थिक व्यवहार कोणी केले ? तसेच अंजूमन इत्तेहादुलच्या इमारतीचे चे गाळे भाडे गेले कुठे ? संस्थेची  रुग्णवाहिका कोण चालवत होते ?  रुग्णवाहिकेची अवस्था बिकट कोणी केली ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सभासदांना मिळणार असल्याचे बोलले जाते.

गोवा बनावटीच्या दारूसह तीन लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त… आजरा पोलिसांची कारवाई
एकास ताब्यात एक फरारी

बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना आजरा पोलिसांनी भरत संतु पाटील (वय ४२, रा. हडलगे ता.गडहिंग्लज ) याला रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून दारूसह तीन लाख बारा हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.तर त्याचा साथीदार किसन पांडुरंग येसणे ( रा. मडिलगे ता. आजरा) हा फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बुरुडे चौक येथे आजरा पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना (एमएच २४ व्हि १६२४) स्विफ्ट गाडी वेगाने जाताना दिसली.संशयावरून पोलिसांनी सदर गाडी अडवून झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे २२ बॉक्स आढळून आले.पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच गाडीतील किसन येसणे हा पळून गेला तर भरत पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अनिल कृष्णा तराळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भरत पाटील व किसन येसणे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

देवर्डे येथील हनुमान विकास सेवा संस्थेत पुन्हा मुकुंदराव तानवडे यांची  सत्ता

 

देवर्डे तालुका आजरा येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थे च्या पंचवार्षिक निवडणुकीत मुकुंदराव लक्ष्मण तानवडे गटाने सलग तिसाव्या वर्षी आपले वर्चस्व कायम ठेवत सत्ता काबीज केली आहे.
तानवडे गटाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:- अजिंक्य मुकुंदराव तानवडे ,बाबासो गणपती तानवडे, आनंदा यशवंत गुरव, मारुती दत्तू कांबळे’ संभाजी भीमराव तानवडे, रमेश गुंडू तेजम, कृष्णा गुंडू ढोकरे, सविता सचिन पाटील, बेबीताई दत्तू पोवार, हणमंत गणपत बागडी, अशोक परसू गुरव वासुदेव तानाजी कांबळे
अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत विरोधी आघाडीचा एक उमेदवार
केवळ दोन मताने निवडून आला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. सरनोबत यांनी काम पाहिले.

आजरा कारखान्याच्या सन 2022-23 गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुक करार करून घेणेस सुरूवात

आजरा साखर कारखान्यामार्फत सन 2022-23 गळीत हंगामासाठी लागणा-या तोडणी वाहतुक यंत्रणेची करार प्रक्रियेचा शुभारंभ आमदार प्रकाश आबीटकर यांचे शुभहस्ते पहिल्या पाच ऊस तोडणी वाहतुकीचे करार करून शुभारंभ झाला. हंगाम 2022-23 पुर्ण क्षमतेंने घेणेचे धोरण कारखान्याच्या व्यवस्थापनांने केलेले असून, कारखान्याचा गळीत हंगाम 2022-23 हा यशस्वीरित्या पार पाडणे करीता कारखाना यंत्र सामुग्री देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत तसेच कारखान्यामध्ये दररोज 3500 मे.टन ऊस गळीत होवून अंदाजे 140 दिवस गळीत करून एकूण 4.50 लाख मे.टन ऊसाचे गळीत करणेचे शेती विभागामार्फत नियोजन केले आहे.

कारखान्याने कार्यक्षेत्रातुन 5000 हेक्टर व कार्यक्षेत्राबाहेरील 5000 हेक्टर अशी एकूण 10000 हेक्टर उस क्षेत्राच्या नोंदीचे उदिष्ट ठेवले आहे. आजअखेर एकूण 7852 हेक्टर उस क्षेत्राची नोंद पुर्ण केली आहे. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्टर व छकडी अशी एकूण 260 बिड व 150 स्थानिक यंत्रणेचे करार करणार आहे. तसेच कारखाना मागील हंगाम सुरू करणेसाठी आ. आबीटकर यांनी सतत प्रयत्न व मार्गदर्शन केले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात उचंगी, सर्फनाला इत्यादी प्रकल्प पुर्ण करणेसाठी आपण प्रयत्नशील असलेचे आ. अबिटकर यांनी सांगीतले तसेच कार्यक्षेत्रात उस वाढीसाठी प्रयत्न करणेबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आणि पुढील हंगाम यशस्वीपणे पार पाडणेस शुभेच्छा दिल्या.

इच्छुक ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत करार करणेचे आहे जेणेकरून करारापोटी अॅडव्हान्स वाटप करणे सोईचे होईल असे  चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे यांनी सांगीतले. सदर प्रसंगी संचालक श्री. मधुकर देसाई श्री दिगंबर देसाई, श्री. दशरथ अमृते, कार्यकारी संचालक डॉ. श्री. टी. ए. भोसले, सेक्रेटरी श्री. व्ही के ज्योती, जनरल मॅनेजर (टेक्नि) श्री. व्ही. एच. गुजर, चिफ केमिष्ट श्री. गणेश पाटील, चिफ अकौंटंट, मुख्य शेती अधिकारी श्री. एस. एन. व्हरकट व कारखाना कर्मचारी तसेच तोडणी वाहतुक कंत्राटदार उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अपघातात युवक ठार

mrityunjay mahanews

सभासदांच्या व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर ‘जनता बँकेची’ वाटचाल : अध्यक्ष मुकुंदराव देसाई … बँकेची 60 वी वार्षिक सभा उत्साहात

mrityunjay mahanews

९ लाखांच्या दरोडा प्रकरणी १० अटकेत…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!