


जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
जिल्हा परिषदांमध्ये किमान 50, तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाची कोंडी फुटल्यानंतर या आरक्षणानुसार निवडणूक पात्र सर्व महापालिकांच्या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानंतरही या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी सरकारने न्यायालयात केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली होती. एवढेच नव्हे तर आपल्या निर्णयाची अंमलबजाणी करण्यात टाळाटाळ केल्यास राज्य निवडणूक आयोगावार अवमानाची कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता. मात्र, राज्य सरकारने पुन्हा कायद्यात सुधारणा करीत सदस्य संख्या बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागणार असल्याने निवडणुक लांबणीवर पडली आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना; तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.
सध्या 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज (ता. 5 ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर 13 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी; तर 12 जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून, यथावकाश पुढील आदेश देण्यात येतील, असे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 85 अशी सदस्य संख्या अशी आहे.
ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान 50 जागा देण्यात येतील.
(..बातमी सौजन्य :- मराठी बातम्या)
……
क्रांतिदिनी आजरा येथे कवी संमेलन
कवयित्री शरयू आसोलकर अध्यक्ष तर कवी-कादंबरीकार प्रवीण बांदेकर उद्घाटक
आजरा येथे नुकत्याच स्थापन झालेल्या प्रागतिक जनवादी साहित्य मंचचे उदघाटन आणि त्यानिमित्ताने आजरा, गडहिंग्लज, चंदगड परिसरातील कवींचे कविसंमेलन गंगामाई वाचनालय आजरा येथे दुपारी ठीक १२.०० वाजता आयोजित केले आहे. सुप्रसिध्द कवी, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते या मंचचे उदघाटन होणार असून सुप्रसिध्द कवयित्री डॉ शरयू आसोलकर या कवी संमेलनाच्या अध्यक्ष राहणार आहेत. या कार्यक्रमाला आजरा येथील जेष्ठ साहित्यीक राजाभाऊ शिरगुप्पे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रा बांदेकर हे मराठीतील नामवंत कवी आणि कादंबरीकार आहेत. चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन अनिमल फार्म या त्यांच्या कादंबऱ्या बरोबर येरु म्हणे, खेळ खंडोबाच्या नावानं, चिनभिन हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. घुंगुरकाठी, हरवलेल्या पावसापाण्याच्या शोधात हे त्यांचे ललीतलेख संग्रहही प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र फौंडेशन, पद्मश्री वि खे पाटील पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार यासह डझनाहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ शरयू आसोलकर तुटलेपण पुन्हा बांधून घेतांना, अनवट वाटा, पुढल्या हाका हे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विध्यापिठ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांचा विशाखा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करतात.
या परिसरातील लिहत्या हातांना बळ मिळावे, महाराष्ट्रातील उत्तमोत्तम साहित्यिकांचे इथल्या नव्याने लिहणाऱ्यां लेखक कवींना मार्गदर्शन मिळावे हा या साहित्य मंचच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. *मंगळवार दि ९ ऑगस्ट क्रांतिदिनी* गंगामाई वाचनालय आजरा येथे *दुपारी ठीक १२. वाजता* होणाऱ्या या कविसंमेलनात ज्यांना आपली कविता सादर करायची आहे त्यांनी आपली नावे प्रा सुभाष कोरे (9923088463), संजय साबळे (9356443875) आणि अनुष्का गोवेकर (7588620526) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन संपत देसाई, संतोष पाटील, मधुकर जांभळे, संजय घाटगे, युवराज जाधव, सुनीता खाडे यांनी केले आहे.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या पेरणोली शाखा इमारत नुतनीकरणानिमित्य श्री सत्यनारायण पूजा संपन्न

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा, शाखा पेरणोलीकडे शाखा इमारतनुतनीकरणा निमित्य शाखा चेअरमन श्री. आनंदा मस्कर व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. अनिता मस्कर यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली.
सदर कार्यक्रमावेळी प्रास्ताविकात मान्यवरांचे स्वागत व शाखाधिकारी श्री. मारुती पाटील यांनी केले. संस्थेचे चेअरमन श्री. जनार्दन टोपले यांनी शाखा प्रगतीचा व संस्थेचा प्रगतीबाबत माहीती दिली. शाखा पेरणोली दिनांक ३१/०७/२०२२ अखेर सांपत्तीक स्थीती सभासद संख्या ११३०, भागभांडवल रु. २५.०४.८२०/- ठेवी रु.५,३०,८५,९५०/- कर्ज वाटप रु. ३,७३,६७,६३७/- एकूण व्यवसाय रु. ९,०४,५३,५८७/- असून खेळते भांडवल रु. ५,४७,४१,३१७/- आहे. त्यानंतर शाखेचे शाखा चेअरमन श्री. आनंदा मस्कर, शाखा सल्लागार श्री. शंकर हळवणकर, श्री. पांडुरंग परीट, श्री. शंकर नावलकर, शाखेचे मुख्य कार्यालय प्रतिनिधी श्री. नारायण सावंत, जेष्ठ सभासद श्री. आनंदा पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास श्री. महादेव उर्फ बापू टोपले, संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. दयानंद भुसारी, जेष्ठ संचालक मा. श्री. नारायण सावंत, श्री. मलिककुमार बुरूड, श्री. रविंद्र दमले, श्री. महेश नार्वेकर,श्री. सुरेश कुंभार, श्री. सुधीर कुंभार, श्री. रामचंद्र पाटील, श्री. राजेंद्र चंदनवाले, श्री. संजय घंटे, संचालिका सौ. प्रेमा पांडुरंग सुतार, सौ. माधवी कारेकर, संस्थेचे जनरल मॅनेजर श्री. अर्जुन रामा कुंभार, पेरणोलीच्या सरपंच सौ. उषाताई जाधव, बळीराजा पतसंस्था चेअरमन श्री. शिवाजीराव देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष श्री. तानाजी देसाई, आजरा तालुका शिवसेना प्रमुख श्री. राजेंद्र सावंत, कोरीवडे उपसरपंच श्री. दत्ता पाटील तसेच देवकांडगाव, हरपवडे, कोरीवडे, पेरणोली, साळगांव, सोहाळे, देवर्डे येथील सभासद व ठेवीदार उपस्थित होते.
आभार संस्थेचे जनरल मॅनेजर श्री. अर्जुन कुंभार यांनी मानले.


महाराष्ट्राच्या विकासातील मराठी माणसाचे योगदान अनन्यसाधारण – डॉ आनंद बल्लाळ

महाराष्ट्राच्या विकासातील मराठी माणसाचे योगदान अनन्यसाधारण आहे, असे मत आजरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ आनंद बल्लाळ यांनी येथे व्यक्त केले.
आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ अशोक सादळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीतील लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे योगदान’ या विषयावर डॉ आनंद बल्लाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉ बल्लाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांचे नाते दुधात विरघळलेल्या साखरेसारखे आहे, ते कोणालाही वेगळे करता येणार नाही. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ‘माझी मुंबई’ या वगनाट्यात मराठी माणसाचे महत्व अधोरेखित केले आहे. तसेच लोकमान्य टिळकांचिंबचतुसूत्री आजही पुन्हा विचार करण्यासारखी आहे, असेही डॉ. म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विठ्ठल हाक्के यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी डॉ रणजित पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी उपप्राचार्य प्रा दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

‘वंचीत ‘ ची आजऱ्यात बैठक संपन्न

वंचीत बहुजन आघाडी आजरा व बंचित बहुजन महिला आघाडी आजरा यांची आजरा तालुका कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर याच्या आदेशाने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्या कोल्हापूर जिल्हा प्रभारी माननीय डॉ. क्रांतीताई सावंत यांचा आजरा तालुका संपर्क दौरा झाला यावेळी आजरा येथील सुसज्ज अशा नुतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉ. क्रांतीताई सावंत यांचे हस्ते करणेत आले. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे वचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन महिला आघाडी आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांचा संपर्क मेळावा घेण्यात आला. या वेळी दक्षिण कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष दयानंद काळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी माननीय दो क्रांतीताई सावंत यांनी उपस्थित सर्वांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर यांना समजून सांगताना त्यांच्या भूमिका या वंचित समाजाप्रति असणारी निष्ठा, त्यांचे वचितांना सत्तेत बसवण्याचे स्वप्न या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला, पदाधिका-यांना मार्गदर्शन करून त्यांना संघटन कौशल्य कसे असावे यासंबंधी मनमोकळी चर्चा केली.
त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ताकदीनिशी लढवणार असलेने कार्यकारिणीने व कार्यकर्ते यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा असा आदेश दिला आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला आपाडीच्या उपाध्यक्षा रूपाली कांबळे, तसेच महिला आघाडी जिल्हा महासचिव उज्वला
खवरे, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गौतम कांबळे यांनी प्रास्ताविक केले व स्वागत तालुका उपाध्यक्ष संदिप कांबळे यांनी केले.
यावेळी बचित बहुजन आघाडीचे आजरा तालुका मार्गदर्शक अजयकुमार देशमुख, उपाध्यक्ष विलास कांबळे, महासचिव,सर्जेराव कांबळे सचिव प्रविण कश्यप, कोषाध्यक्ष अंकुश कांबळे निरीक्षक गणपती कांबळे आयटी प्रमुख, सागर कांबळे संघटक,अविनाश कांबळे संघटक, मंगेश कांबळे, आजरा तालुका महिला अध्यक्षा प्रिती कांबळे, सचिव वैशाली कावळे आयटी प्रमुख प्रियंका कशप, विद्या कांबळे संपर्क प्रमुख भाग्यश्री कांबळे सहसचिव, लता कांबळे, प्रसिध्दी प्रमुख अश्विनी कांबळे सचिव, रंजना कांबळे, वंदना भोसले तसेच जिल्हा कमिटी सदस्य रशीद शिकलगार जिल्हा उपाध्यक्ष, महादेव कांबळे जिल्हा सचिव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थिताचे अभार संपर्क प्रमुख भिकाजीराव कांबळे यांनी मानले.


