mrityunjaymahanews
अन्य

माझी भूमिका

गुरुवार दि. २७ नोव्हेंबर २०२५

माझी उमेदवारी

माझी भूमिका…

विकासावर फक्त बोलणार नाही तर करूनही दाखवणार : सुमैय्या खेडेकर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नगरपंचायत म्हणजे काय व नगरपंचायतीच्या माध्यमातून कोण- कोणती कामे करता येतात याचा गेल्या पाच वर्षांमध्ये आपणास चांगलाच अनुभव आला असून विकासाच्या केवळ गप्पा न मारता विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारी नगरसेविका अशी आपली वेगळी ओळख निर्माण झाली आहे. प्रभागाचे प्रतिनिधित्व करताना सभागृहात शांत न बसता प्रत्येक वेळी प्रभावीपणे प्रभागाचे प्रश्न मांडण्याचे काम केले आहे याला सभागृह साक्षीदार आहे. प्रभागातील उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यास आपण कसूभरही कमी पडणार नाही असा विश्वास प्रभाग तीन मधील आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सौ. सुमैय्या खेडेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना सौ. खेडेकर म्हणाल्या, संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्ग उभारणी वेळी प्रभागामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. स्वखर्चाने जास्तीत जास्त प्रभागवासीयांना पाणीपुरवठा करण्याचे काम आपण केले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक्स बसवणे, प्रभागातील फिरत्या व्यावसायिकांना कर्ज स्वरूपात मदत उपलब्ध करून देणे, घरकुल असो विधवा पेन्शन असो अथवा संजय गांधी निराधार योजना कसो सर्व शासकीय योजना प्रभागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत.

प्रभागातील रुग्णांना कोल्हापूर,पुणे,मुंबई सारख्या शहरातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांना उत्तमोत्तम वैद्यकीय सुविधा कशा मिळतील यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अनपेक्षितरित्या राजकारणात आपला प्रवेश झाला. पण नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांकरिता आपण खूप काही करू शकतो याची जाणीव होत गेली. वाणिज्य विभागातील पदवीधर असल्याने शासकीय कागदपत्रांची चांगलीच समज आली आहे.

येत्या पाच वर्षांमध्ये प्रभागातील मच्छी मार्केट परिसर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करणे, प्रभागामध्ये उर्दू माध्यमाची स्वतंत्र अंगणवाडी उभी करणे, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, प्रसूतीसाठी महिलांची आजरा ग्रामीण रुग्णालयात ने आण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे, याचबरोबर प्रभागातील आरोग्य स्वच्छता पाणी याकडे विशेष लक्ष देण्याचा आपला मानस आहे.

माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार सतेज पाटील, आमचे नेते जयवंतराव शिंपी युनूस माणगावकर, आलमभाई नाईकवाडे आदींनी आपल्यावर पुन्हा उमेदवारी देऊन जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

एक वेळ घरी बसेन पण भाजपात जाणार नाही…

mrityunjay mahanews

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

mrityunjay mahanews

संकेश्वर -बांदा रस्त्याचे काम रोखण्यासाठी मशिनरीना बांधली जनावरे

mrityunjay mahanews

शिंपी – चराटी गटातर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा आज सत्कार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!