mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडाठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

निवडणूक विशेष आजरा परिवर्तन विकास आघाडी

शुक्रवार दि.,२८ नोव्हेंबर २०२५

आज-यातील १४ कोटीवरून २४ कोटींच्या नवीन पाणी योजनेचे पाणी दिसत नाही
हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीसाठी लढाई
:संजयभाऊ सावंत


हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीसाठी लढाई आहे. १४ कोटीच्या नवीन पाणी योजनेचा खर्च २४ कोटी पर्यंत गेला आहे. त्या योजनेचे पाणी अजून शहरात दिसत नाही. स्वच्छता, आरोग्य, बांधकाम झालेले नाही. रस्ते, गटर्स सुशोभीकरण करणार आहे. कामात गुणवत्ता पाहीली जाणार आहे. मोफत वाहतूक व्यवस्था करणार असल्याचे आजरा परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

आजरा शहर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले,डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित, पुरोगामी परंपरेला वाहिलेली भूमी आहे. या शहराने अनेक सामाजिक चळवळींचा पाया घातला. याच पवित्र भूमीतून टोल आंदोलन,शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आदी चळवळीचा आवाज उठवणाऱ्या संजयभाऊ सावंत त्या परंपरेचेच खरे वारसदार आहेत. त्यांनी अनेक वर्षे शहराच्या सामाजिक व राजकीय सेवेत झोकून दिल्या आहेत. त्यांनी आपल्या नगराध्यक्ष उमेदवारीबाबत मांडलेली भूमिका…

संजय सावंत यांनी मागील पंचवीस वर्षापासून आजरा शहराच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक जीवनात अपार योगदान दिले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते सतत लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. काँग्रेसचे विधानपरिषद विरोधी गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या विचारांचे ते कट्टर निष्ठावंत अनुयायी आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये सावंत यांनी जीवाचे रान करून विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. मंडळाची स्थापना सावंत यांनी केली.या मंडळाच्या माध्यमातून सावंत यांनी शहरभर तरूण कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले.यामधूनच सामाजिक काम करून स्वतः संधी निर्माण करत सोन्याहून पिवळे केले. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सर्वत्र भीतीचे वातावरण होते, तेव्हा सावंत यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयात ठाण मांडले. शहरातील अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून त्यांनी झटून प्रयत्न केले.

ग्रामीण रुग्णालयापर्यंत मोफत वाहतूक सेवा देणार…

आजरा शहरासह तालुक्यातील रूग्णासाठी आजरा बस स्थानकावरून ग्रामीण रुग्णालया पर्यंत मोफत वाहतूक सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

पूरग्रस्तांना मदत….

बीड जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्तांना सावंत यांच्या मंडळाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.२०२० मध्ये पूरग्रस्त काळात आजरा शहरासह अनेक गरजू कुटुंबांना त्यांनी आर्थिक आणि शासकीय मदत मिळवून दिली. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या पुनर्बाधणीसाठी शासनाकडून मदत मंजूर करून घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

आजरेकर हुकूमशाहीच्या कारभाराला वैतागले…

आजरा- हुकुमशाही आणि मनमानी कारभाराला वैतागली आहे. सुज्ञ जनता या पंचवार्षिक निवडणुकीत आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या मागे ठामपणे उभा राहील. याची आम्हाला खात्री आहे. जनतेच्या याचं विश्वासाच्या आधारावर लोकाभिमुख स्वच्छ, पारदर्शी कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास ही भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीत आजरा परिवर्तन विकास आघाडी म्हणून उतरलो आहोत. आजरा शहराची नगरपंचायत झाल्यानंतर इथल्या जनतेने ज्या विश्वासाने नगरपंचायतीची सत्ता सत्ताधारी आघाडीकडे सोपवली होती, त्या जनतेच्या विश्वासाला सत्ताधारी नेतृत्वाने हरताळ फासला आहे. मनमानी कारभार आणी बगलबच्च्यांचे हित हाच या मंडळींचा एकमेव अजेंडा राहिला आहे. म्हणूनच या निवडणुकीत आजरा शहराच्या विकासाचे नवे प्रारूप मांडून आम्ही मतदारांच्याकडे जाणार आहोत.

महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणार…

आजरा शहर कोकणचे प्रवेशद्वार. गोवा आणि कोकणात जाणारा पर्यटक याचं शहरातून जातो. स्वच्छ हवा, समृध्द निसर्ग आणि मुबलक पाणी असतानाही केवळ विकासाभिमुख राज्यकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे या शहराचा विकास रखडलेला आहे. ‘सुंदर आजरा…. समृध्द आजरा’ हा आमचा अजेंडा असून विकासाचे नवे प्रारूप घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. पिण्याचे स्वच्छ आणि शुध्द पाणी, स्वच्छ सुंदर रस्ते, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्क, स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे यासह नवनवे उपक्रम राबवून जनहिताच्या कामावर आमचा भर राहणार आहे.

नेतेमंडळींचा वारसा पुढे नेणार…

स्वर्गीय अमृताकाका देसाई, स्व. काशीनाथअण्णा चराटी, बळीरामजी देसाई, वसंतराव देसाई, माधवराव देशपांडे, सिलेमान दिडबाग इथल्या अठरापगड जातीतल्या आणि विवध धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये एक बंधुभावाचे नाते तयार केले. तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा विश्वास आम्हाला आहे.

सामाजिक कार्यातून जनतेच्या मनात घर

संजयभाऊ सावंत हे फक्त आंदोलन,चळवळ एवढ्यापुरतेच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकासाठी सदैव तत्पर आहेत. त्यांनी मंडळाच्या माध्यमातून लोकांकडून एकही रुपया न घेता सर्व शासकीय योजनांचे अर्ज विनामूल्य भरून दिले. ज्यामुळे शेकडो नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला. दलित वस्ती व मुस्लिम वसाहतीसाठी सुधार योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून त्यांनी अनेक युवकांना नोकरी मिळवून दिली.

विकासाची दिशा …

बंटी साहेबांचे निष्ठावंत...

चार वर्षापूर्वी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांनी आणलेल्या निधीच्या अंमलबजावणीत अभिषेक शिंपी यांच्यासह संजयभाऊ सावंत यांचा मोलाचा वाटा आहे. शहरात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, वस्ती सुधारणा या सर्व क्षेत्रात त्यांनी सक्रिय भूमिका निभावली.

शहरासाठी विकासाचे स्वप्न

संजयभाऊ सावंत यांनी आजरा शहराच्या विकासाचे वेगळे स्वप्न पाहिले आहे. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत,द.ना गव्हाणकर,शिक्षततपस्वी जे पी नाईक आदींच्या सांस्कृतिक वारसा लाभलेले हे शहर राज्याच्या नकाशावर वेगळ्या पद्धतीने ठसा उमटविणारे शहर म्हणून संजयभाऊ सावंत यांना आणावयाचे आहे. या शहराची असलेली सांस्कृतिक ओळख जोपासण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्याचा मानस त्यांच्याकडे आहे. त्या दृष्टीने त्यांनी वेगळ्या पद्धतीचे नियोजन केले आहे. नाट्यपरंपरांना देशभरात आज-याच्या नावाने ओळखले जाईल, अशी वेगळ्या धाटणीची विकासाची संकल्पना त्यांच्याकडे आहे. रस्ते, गटर, लाईट, पाणी हा शहराचा विकास करण्याचीही संकल्पना त्यांनी मनामध्ये घेतली आहे.

जातीपातीचे राजकारण केले नाही

आजरा शहरात सर्व धर्मीय राहतात.हे शहर समानतेच्या विचारांनी प्रेरित आहे. या शहरामध्ये आम्ही कधीच जातीपातीचे राजकारण केले गेले नाही. सर्व समाज अतिशय गुण्यागोविंदाने काम करतात. शहराच्या विकासासाठी अनेकांनी वेगवेगळे योगदान दिले आहे. त्यामध्ये विविध समाजाचे लोक समाविष्ट आहेत. त्यामुळे शहर अतिशय विकासात्मक करण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला सर्व स्तरातून संजयभाऊ सावंत यांना शहरातील सर्व समाजघटकांचा पाठिंबा मिळत आहे.याचा त्यांना ठाम विश्वास आहे.

मी बंटी साहेबांचा कार्यकर्ता आहे. माझी निष्ठा आणि सेवा यांना न्याय मिळवून देणारी ही संधी आहे.आजरेकर माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मला नगराध्यक्षपदावर पाठवून शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करतील. बंटी साहेब माझ्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहेत. त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. मी निधी आणून आजरा शहर आदर्श बनविणार आहे.

……संजयभाऊ सावंत

प्रभाग दोन व प्रभाग १४ मध्ये जोरदार प्रचार 

प्रभाग क्रमांक १४ मधील आजरा नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्ष उमेदवार श्री संजय भाऊ सावंत व नगरसेवक उमेदवार श्री अभिषेक जयवंतराव शिंपी यांचे सह मतदार कार्यकर्ते व मान्यवर जेष्ठ मंडळी यांचे उपस्थितीत भव्य प्रचार फेरी संपन्न झाली… यादरम्यान प्रभागातील सर्व उमेदवारांच्या घरी जाऊन उमेदवारांनी मतदानासंदर्भात सांगितले. सवाद्य प्रचार फेरी दरम्यान उमेदवार ,कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. एकंदरीत आजरा परिवर्तन विकास आघाडी मधील या प्रभागातून नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून अभिषेक जयवंतराव शिंपी यांना भरघोस मताधिक्य मिळणारच आणि या प्रभागाचा विकास करण्याची संधी निश्चित मिळणार असे वातावरण दिसले.

प्रभाग दोन मधील प्रचार फेरीमध्येही मोठ्या संख्येने मतदार सहभागी झाले होते. प्रभागातून सवाद्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रभाग फेरीमध्ये संजयभाऊ सावंत, माजी उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत, सौ. भैरवी सावंत, सौ. सुमैय्या खेडेकर, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, कॉम्रेड संपत देसाई यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विकासावर फक्त बोलणार नाही तर करूनही दाखवणार : सुमैय्या खेडेकर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नगरपंचायत म्हणजे काय, नगरपंचायतीच्या माध्यमातून कोण- कोणती कामे करता येतात याचा गेल्या पाच वर्षांमध्ये आपणास चांगलाच अनुभव आला असून विकासाच्या केवळ गप्पा न मारता विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारी नगरसेविका अशी आपली वेगळी ओळख निर्माण झाली आहे. प्रभागाचे प्रतिनिधित्व करताना सभागृहात शांत न बसता प्रत्येक वेळी प्रभावीपणे प्रभागाचे प्रश्न मांडण्याचे काम केले आहे याला सभागृह साक्षीदार आहे. प्रभागातील उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यास आपण कसूभरही कमी पडणार नाही असा विश्वास प्रभाग तीन मधील आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सौ. सुमय्या खेडेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना सौ. खेडेकर म्हणाल्या, संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्ग उभारणी वेळी प्रभागामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. स्वखर्चाने जास्तीत जास्त प्रभागवासीयांना पाणीपुरवठा करण्याचे काम आपण केले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक्स बसवणे, प्रभागातील फिरत्या व्यावसायिकांना कर्ज स्वरूपात मदत उपलब्ध करून देणे, घरकुल असो विधवा पेन्शन असो अथवा संजय गांधी निराधार योजना कसो सर्व शासकीय योजना प्रभागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत.

प्रभागातील रुग्णांना कोल्हापूर,पुणे,मुंबई सारख्या शहरातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांना उत्तमोत्तम वैद्यकीय सुविधा कशा मिळतील यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अनपेक्षितरित्या राजकारणात आपला प्रवेश झाला. पण नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांकरिता आपण खूप काही करू शकतो याची जाणीव होत गेली. वाणिज्य विभागातील पदवीधर असल्याने शासकीय कागदपत्रांची चांगलीच समज आली आहे.

येत्या पाच वर्षांमध्ये प्रभागातील मच्छी मार्केट परिसर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करणे, प्रभागामध्ये उर्दू माध्यमाची स्वतंत्र अंगणवाडी उभी करणे, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, प्रसूतीसाठी महिलांची आजरा ग्रामीण रुग्णालयात ने आण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे, याचबरोबर प्रभागातील आरोग्य स्वच्छता पाणी याकडे विशेष लक्ष देण्याचा आपला मानस आहे.

माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार सतेज पाटील, आमचे नेते जयवंतराव शिंपी युनूस माणगावकर, आलमभाई नाईकवाडे आदींनी आपल्यावर पुन्हा उमेदवारी देऊन जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

उत्तूरला चोरट्यांचा हवेत गोळीबार ; सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला

mrityunjay mahanews

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मारकासाठी दोन कोटींची तरतूद करणार :नामदार मुश्रीफ…… यासह आजरा स्थानिक ताज्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चाफवडे येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू…विवाहितेच्या छळप्रकरणी खेडगे येथील पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

आजरा पं. स. उपसभापती निवड आज… हात्तीवडे येथे दोन ठिकाणी घरफोडी… आजऱ्यातील राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव स्थगित… तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!