आंबोलीत ‘मुसळ’धार …
आजऱ्यात ‘कोसळ ‘धार …

आंबोलीसह आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी नदी प्रवाहित झाली असून दुथडी भरून वाहू लागली आहे.
गेले दोन महिने शांत असलेला रामतीर्थ धबधबा पुन्हा एकदा नव्या रूपात कोसळू लागला आहे. रामतीर्थ धबधबा कोसळू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
आंबोली रस्त्याचा होणार पर्यटकांवर परिणाम
सध्या संकेश्वर – बांदा या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे या मार्गावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले असून दुचाकी सह चार चाकी गाड्या चालवताना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा नकारात्मक परिणाम पावसाळ्यात आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होण्यात दिसू लागला आहे.याचा अप्रत्यक्ष फटका आजरा – आंबोली मार्गावरील व्यावसायिकांनाही बसणार हे स्पष्ट आहे.
………….
आजरा हायस्कूल आजरा मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

आजरा येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा मध्ये लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन मुख्याध्यापक सुनिल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाहू महाराजांच्या विषयी कु सानिका माने हिने भाषण केले तर सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील शाहू महाराजांच्या कार्याची माहिती विभाग प्रमुख गौतम कांबळे यांनी दिली त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांचा आदर्श घेऊन समाजकार्यात सहभागी व्हावे असे मुख्याध्यापक सुनिल कुलकर्णी यांनी आवाहन केले,
शाहू जयंती निमित्त हरित सेना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक बाळकृष्ण दरी, पर्यवेक्षक संभाजी होलम , विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सण सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले सूत्रसंचालन संतोष कालेकर यांनी केले तर आभार किरण कांबळे यांनी मानले.
……….
‘व्यंकटराव ‘येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये लोक राजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा चे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांसमोर बोलताना संचालक व आजरा नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा घेत असताना त्यांची गोरगरीब जनता ,दीन दलित.. त्यांचे संरक्षण व शैक्षणिक उन्नती व्हावी यासाठी केलेले प्रयत्न कथन केले. समाजातील उच्चवर्णीयांच्या मनातून जातिभेद समूळ नष्ट व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले.. समाजाचे कल्याण म्हणजे स्वतःचे कल्याण समता, बंधुता यांची शिकवण देणारा लोकराजा छत्रपती शाहू महाराज, शाहू महाराजांना “राजर्षी” म्हणून ओळखले जाते ज्याचा अर्थ “शाही संत” देखील होता. आरक्षण देणारा पहिला राजा.. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा, कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा असे सांगत विवीध क्षेत्रात भरीव कामगिरी बजावलेल्या छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन केले.
याप्रसंगी प्रशालेच्या पटांगणाच्या कडेला उपस्थित मान्यवर अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासो पाटील, सचिव एस. पी. कांबळे, संचालक पांडुरंग जाधव, व्यंकटराव प्रशालेचे माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई, सुनील पाटील, सचिन शिंपी, प्राचार्य आर. जी. कुंभार, प्रा. शिवाजी पारळे, ए.एस. गुरव,एम.. ए .पाटील, एम. एम.देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख पी. व्ही. पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
………. …….


