रवीवार दि. १२ जानेवारी २०२५


उत्तुर येथे मारामारी… एक जखमी… एका विरोधात गुन्हा नोंद

उत्तूर ता. आजरा येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन संजय विजय गोसावी रा.उत्तूर याने राजेश विजय गोसावी यांच्या डोक्यात सळी घालून त्यांना जखमी केले व त्यांच्या पत्नी सौ.रेखा यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी संजय गोसावी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे अशी माहिती आजरा पोलिसांनी दिली.
पुढील तपास हवालदार बाजीराव कांबळे करीत आहेत.

उर्वरित मागण्या मार्गी लावा
अन्यथा कामे बंद पाडण्याचा उचंगी प्रकल्पग्रस्तांचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरीत मागण्याबाबत चर्चा होवून निर्णय होत नाही तो पर्यंत प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरु असलेली कामे बंद करावीत. याबाबत निर्णय न झाल्यास (ता.१४) पासून कामे बंद पाडू असा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी यांना दिले आहे.प्रशासनावर विश्वास ठेऊन प्रकल्पग्रस्तांनी पाणी साठवण्याबाबत अनुमती दिली अजूनही धरणग्रस्ताचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे प्रकल्पयस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित सर्व विभागाच्या अधिका-यांच्या सोबत बैठक घेऊन पश्न मागी लावावेत. निर्वाह भत्याबाबत २९ प्रकल्पग्रस्तांचे सर्व्हेक्षण फेर अहवाल करणे संदर्भात निर्णय होण्याची गरज आहे गायरान जमिनीचा आकार लाऊन मिळणे बाबत धरणग्रस्त शेतक-यांच्या जमिनीचे स्वतंत्र नकाशे तयार करावेत. जमीन वाटपाचे आदेश झालेल्या धरणग्रस्ताना जमीन मोजून त्यांना कब्जा मिळावा अंशतः बुडीत झालेल्या गट नंबरची फेर मोजणी करून मिळावी. (उदा. पांडूरंग केरबा धनुकटेकर) मौजे चाफवडे व जेऊर
गावातील धरणाच्या पाण्याखालील बुडीत झालेल्या व होणाऱ्या मंदिरांना जागा उपलब्ध करून मिळाव्यात, उजव्या तिरावरील चाफवी ते जेऊन या रस्त्यामध्ये गेलेली आहे व जमीन यांचा मोबदला मिळावा मौजे बोलकेवाडी येथे जमीन मिळालेल्या खातेदारांना ती जमीन कसणेसाठी वन जमिनीतून रस्ता मिळावा. चितळे व वाटंगी मध्ये जमिनी मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांना घरासाठी भूखंड मिळावा, स्वेच्छा पुनर्वसनाची वाढीव रक्कम मिळावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. वरील सर्व प्रश्न समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने बैठक लावावी.
निवेदनावर कॉ. संजय तर्डेकर, मारूती चव्हाण, धनाजी दळवी, सुरेश पाटील, प्रकाश भडांगे, कृष्णा गुडूळकर, निवृत्ती बापट पांडूरंग धन्कटेकर यासह धरणग्रस्तांच्या सहया आहेत.

शासकीय चित्रकला परीक्षेत दीनदयाळ विद्यालयाचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शासकीय चित्रकला परीक्षेत (इंटरमिजिएट) शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून अ श्रेणीमध्ये ०६ विद्यार्थी ब श्रेणीमध्ये १० विद्यार्थी व क श्रेणीमध्ये १३ विद्यार्थी पास झाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.सुधीर मुंज व सचिव मलिककुमार बुरुड ,सर्व संचालक मंडळ ,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांचे प्रोत्साहन तर श्रीम. कांबळे एस. पी. यांचे मार्गदर्शन लाभले.


आजपासून आजऱ्यात राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी कै. रमेश टोपले यांच्या स्मृती प्रित्यर्थ नवनाट्य कला मंच संस्था आजरा यांच्या वतीने आज रविवार दि. १२ जानेवारी पासून कै. रमेश टोपले राज्यस्तरीय नाट्य महोत्सवास सुरुवात होत आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर, समिती सांगली निर्मित “देहभान” हा शुभारंभाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व नाट्य प्रयोग आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर होणार आहेत.


निधन वार्ता
महेश कारेकर

आजरा येथील सराफी व्यावसायिक महेश विष्णुपंत कारेकर (वय ४९ वर्षे ) यांचे काल शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.



