सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४

एक संधी द्या… मतदारसंघाचा कायापालट करतो : शिवाजीराव पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आपल्या रक्तात भाजपा आहे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे आपले दैवत आहेत. आयुष्यामध्ये कधीही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नसताना त्यांच्या सहकार्याने थेट विधानसभेला धडक देत निसटत्या मतांनी पराभव पत्करावा लागला. पराभवाने खचून न जाता पुन्हा एक वेळ कामाला लागलो आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील घराणेशाही संपवण्यासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एक संधी देऊन पहा मतदार संघाचा निश्चितच कायापालट केल्याशिवाय राहणार नाही,असे प्रतिपादन शिवाजीभाऊ पाटील यांनी केले. आजरा येथे स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे नूतन अध्यक्ष दयानंद भुसारी यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, मतदारसंघांमध्ये चांगल्या शाळा, सैनिक शाळा, स्पोर्ट्स अकॅडमी, नर्सिंग कॉलेज व उद्योग उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी दहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी आपले बोलणे झाले आहे. केवळ रस्ते, इमारती म्हणजे विकास नसून रोजगार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रामध्ये शाश्वत काम करणे म्हणजे विकास आहे. कांही मंडळी सोळाशे कोटी रुपयांची विकास कामे केल्याचे सांगत आहे. त्यांनी ही विकास कामे दाखवावीत आपण उमेदवारी मागे घेऊ असे खुले आव्हाने त्यांनी केले.
यावेळी मलिककुमार बुरुड म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा व चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळे पद नसतानाही विधानसभा मतदारसंघात करोडोंची विकास कामे करण्याबरोबरच अडचणीत असणारा दौलत साखर कारखाना चालू करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. जिल्हा परिषद मतदार संघातील निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी राहतील यात शंका नाही.
अरुण देसाई म्हणाले ,गेल्या पाच वर्षात शिवाजीभाऊ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे.सर्वच क्षेत्रात काम करण्याची वृत्ती असून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.यावेळी गतवेळेपेक्षा जास्त मतदान करून त्यांना निश्चितच निवडून आणू.
कार्यक्रम प्रसंगी आनंदा कांबळे (गजरगाव) सुभाष सावंत ( कोळींद्रे ) समीर देसाई (उचंगी) शकुंतला सुतार (हात्तिवडे) आनंदा भूतुर्ले, रणजीत किल्लेदार, सुनील पाटील (हात्तीवडे) महादेव पाटील (गजरगाव) संदीप केसरकर, जयसिंग शेंदरकर (किणे) संजीव देसाई (कोवाडे), भरत बुरुड (शिरसंगी), प्रकाश प्रभू (विटे) यांच्यासह कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सुधीर कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर आनंदा कुंभार यांनी आभार मानले.

मतदारसंघाचा स्वाभिमान जपण्यासाठी साथ द्या : के. पी. पाटील
आजरा येथे ठाकरे गटाचा मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमदार प्रकाश आबिटकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. याचा शिक्का केवळ आबिटकरांना लागला नाही तर राधानगरी-भुदरगड-आजराच्या तमाम जनतेला लागला आहे. हा गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी विद्यमान आमदारांना पराभूत करून पुन्हा स्वाभिमान जपण्यासाठी साथ द्या असे आवाहन, राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. ते आजरा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक करताना संजय येसादे म्हणाले, राधानगरीचा आमदार निष्ठावंत शिवसैनिकच ठरवणार आहेत. माजी आमदार के. पी. पाटील पुढे म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार दृढ करण्याची ही लढाई आहे. चांगल्या चालविलेल्या बिद्री साखर कारखान्यात राजकीय आकसापोटी विरोध करून सभासदांचे नुकसान केले आहे. स्वाभिमानी शिवसैनिक लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्याची जपणूक करून सन्मान केला जाईल. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, सहकारातील आदर्शवत बिद्री कारखानाच्या इथेनॉल प्रकल्पाला विरोध करून विद्यमान आमदारांनी चांगल्या चाललेल्या संस्था बंद पाडण्याचे काम सुरू केले आहे.उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गद्दारांच्या विरोधातील लढाईत माजी आमदार के. पी. पाटील यांना मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विश्वनाथ कुंभार, तालुकाप्रमुख युवराज पोवार, माजी सभापती उदयराज पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले, दयानंद भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँक संचालक रणजीत पाटील,उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, आजरा शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, महेश पाटील, विक्रम देसाई, अमित सामंत, शिवाजी आढाव, भिकाजी विभूते,प्रसाद पिलारे, गीता देसाई, राजकुमार भोगण, संकेत सावंत, संतोष पाटील, अमित गुरव, बबन चौगुले, अनुसया पाटील, दिनेश कांबळे, शिवाजी आढाव, संजूभाई सावंत, सौरभ पाटील, हणमंत पाटील, राजकुमार भोगन, शिवाजी पाटील, प्रथमेश खोत यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसैनिक उपस्थित होते.

अंजनाताईंच्या वतीने दूध संस्थांना शुभेच्छा भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या वतीने तालुक्यातील सर्व संस्थांना सदिच्छा भेट देउन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालिका श्रीमती रेडेकर यांनी तालुक्यातील सर्व संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेच्या अडीअडचणी समजावून घेतल्या व संस्थेचे संचालक मंडळ व उत्पादकाना भेटून मिठाई व भेट वस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी देवर्डे, हाळोली, वेळवटी, म्हसोली, पेठेवाडी, खेडगे, शेळप, पारपोली, दाभिल, दाभिलवाडी, माद्याळ, दर्डेवाडी, मेढोंली, हत्तीवडे, होणेवाडी, कागिणवाडी, दाभेवाडी, कानोली, हारुर, या गावातील दुध संस्थांचा संपर्क करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोकुळ दुध संघाचे अधिकारी के.डी. आमते, कोले , सुपरवायझर विश्वास चव्हाण, विजय केसरकर, उदय पाटील, विनायक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बेकायदेशीर दारू विक्री : एका विरोधात गुन्हा नोंद
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करणाऱ्या विनायक शांताराम साळोखे रा. बेलेवाडी हुब्बळगी ता. आजरा, जि. कोल्हापूर याला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दिपक मल्लाप्पा मन्यागोळ यांनी याबाबत आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे.बेलेवाडी, हुब्बळगी गावचे हद्दीत घराचे बाजुस मोकळ्या जागेत उघड्यावर विनापरवाना देशी दारु विकत होता असे पोलिसांनी सांगितले.

मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी ? संशोधनात आली मोठी माहिती समोर !

भारतातील अनेक लोक हे सी फूड मोठ्या प्रमाणात खातात. मुंबई तसेच कोकणातील अनेक लोक हे चिकन मटणपेक्षा सागरी पदार्थांना म्हणजेच माशांना जास्त पसंती दर्शवतात. माशांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये सुरमई, पापलेट, बोंबील मांदेल यांसारखे अनेक मासे बाजारात विकले जातात. माशांची नावे घेतली तरी मासे प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु नुकताच एक मोठा दावा करण्यात आलेला आहे. या अभ्यासात असे म्हणण्यात आलेली आहे की, जे लोक जास्त प्रमाणात मासे खातात. त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी असतो. परंतु या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.*
अमेरिकेतील एका डॉक्टरांनी असे सांगितले आहे की, आठवड्यातून तुम्ही दोनदा तरी मासे खाणे गरजेचे आहे. कारण माशांमध्ये सर्व प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतात. यामध्ये चरबी युक्त ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते. याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तसेच हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे फॅट्सचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये आपल्या शरीरातील अनेक कमतरता भरून काढण्याची ताकत असते. यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. आणि आपल्या हृदयाचे आरोग्य देखील खूप चांगले राहते.
त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तरी मासे खा असा सल्ला आरोग्य तज्ञांकडून दिला जातो. कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी जास्त प्रमाणात असतात. यामुळे हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता कमी असते . म्हणजेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. आणि ते आपल्याला माशांमधून नैसर्गिक रित्या मिळते. म्हणून आरोग्य तज्ञांकडून माशांचे सेवन आठवड्यातून दोन वेळा तरी करावे. असे सांगण्यात आलेले आहे. म्हणजे जे लोक नियमित माशांचे सेवन करतात. त्यांना हार्ट अटॅक शक्यता काही प्रमाणात कमी असते. कारण त्यांच्या हृदयाला ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. (online news)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त...
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



