mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

        रविवार  दिनांक २७ ऑक्टोबर २०२४

धारदार शस्त्रे विक्री…

दोघे कब्जात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बैलहोंगल जि. बेळगावी येथून विनापरवाना व बेकायदेशीररित्या धारदार शस्त्रे विक्रीसाठी उत्तुर येथे आलेल्या सुरज सिंग जगतसिंग शिकलकर्ताक व रामसिंग जगतसिंग शिकलकर्ताक त्या दोघा बंधूंना आजरा पोलिसांनी शस्त्रांसह ताब्यात घेऊन त्यांच्यावर हत्यार कायदा गुन्ह्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची फिर्याद रोहित धुंदरे यांनी पोलिसात दिली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

केपींचा आज मेळावा…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणारे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा आज रविवार दिनांक २७ रोजी आजरा- आंबोली मार्गावरील हॉटेल सरकार समोरील आवारात मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी दिली.

      निवडणुकीची अधिकृत उमेदवारी शिवसेना/ उ.बा.ठा. गटाकडून जाहीर झाल्यानंतर प्रथमच माजी आमदार पाटील हे आजरा येथे मेळावा घेत असून ते मेळाव्यात नेमके काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

नंदिनीच्या पाठीवर कौतुकाची थाप

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      येथील शिवाजी सावंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आजराची वि‌द्यार्थीनी नंदिनी भिकाजी मिसाळ हीने फूड बेवरिजेस ॲंण्ड सव्हिसेस असिस्टंट या ट्रेडमध्ये सन २०२३-२४ च्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. शिवाजी सावंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला. या वेळी अन्य ट्रेडमधील प्रथम तीन कमांक पटकावलेले यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.

      संस्था स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पोवार अध्यक्षस्थानी होते. सदस्य मानसिंगराव देसाई प्रमुख उपस्थित होते. श्री. पोवार यांच्या हस्ते मिसाळ व तिची आई सौ. मिसाळ यांचा सत्कार झाला सदस्य श्री. देसाई यांनी नंदिनी मिसाळ यांना पाच हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. श्री. पोवार म्हणाले, नंदिनीचे यश उल्लेखनीय आहे. तिचा आदर्श वि‌द्याथीनी घ्यावा. या वेळी शिल्पनिदेशक ए. आर. मंगल. ए. टी. भाकरे, श्री. गवई, रणजित पोवार, धनाजी देसाई यासह विदयार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. धनश्री मंगल यांनी स्वागत, सुत्रसंचालन व आभार मानले.

मटका घेताना एकजण ताब्यात 

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथे कल्याण मटका घेत असताना उत्तूर येथील रमेश शिवराम रक्ताडे याला मटका जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद समीर संभाजी कांबळे यांनी पोलिसात दिली आहे.

बेकायदेशीर दारू विक्री
पेरणोलीतील एका विरोधात गुन्हा नोंद

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली ता. आजरा येथे अमर भीमराव दळवी याला बेकायदेशीर रित्या दारू विक्री करताना रंगेहात पकडून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आहे. याबाबतची फिर्याद दीपक सुभाना कील्लेदार यांनी पोलिसात दिली आहे.

तंबाखूयुक्त पदार्थ विक्री

एकावर गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        उत्तुर ता आजरा येथे आसिफ रशिद नाईकवाडे याला सुगंधी पान मसाला, तंबाखू व सुगंधी दर्जा असलेला पदार्थ विकताना शाही स्वीट मार्ट व शाही पान दरबार नावाच्या दुकानात मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969



 

 

संबंधित पोस्ट

जनता सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघात दुरंगी लढत

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!