
रामतीर्थ यात्रा होणारच…? कोणत्याही परिस्थितीत यात्रेला परवानगी देण्याची मागणी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यावर्षीही रामतीर्थ यात्रेवर मर्यादा आल्या आहेत. परंतु कोरोनाचा एकही रुग्ण नसताना रामतीर्थ यात्रेवर मर्यादा आल्याने भाविकांमधून व तालुकावासियांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेने आज आजरा तहसीलदार व नगरपंचायत प्रशासनाला स्वतंत्र पत्र देऊन यात्रा भरवण्याची मागणी केली आहे. रामतीर्थ यात्रेवर अनेकांचा उदरनिर्वाह सुरू असतो. यात्रेमध्ये दुकाने थाटून सर्वसामान्य कुटुंबे काही दिवसा करता आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावत असतात. सध्या कोरोनाचे संकट किमान तालुक्यात तरी पूर्णपणे आटोक्यात आले आहे. ठिक-ठिकाणी विविध कार्यक्रम उत्साहात साजरे होत असताना रामतीर्थ यात्रेवरच निर्बंध का आणले जात आहेत ? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. निवेदन देताना युवा सेनेचे महेश पाटील, ओंकार माद्याळकर अनपाल तकिलदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
…
यात्रा करणारच….
यात्रेचा दिवस जवळ येईल तसतसे तालुक्यामधील विविध संघटना व व्यापारी वर्ग आक्रमक होत असून कोणत्याही परिस्थितीत यात्रा करणारच असा निर्धारही व्यक्त करताना दिसत आहेत. प्रशासनाने तालुकावासीयांच्या भावना लक्षात घेऊन या यात्रेला लावलेले निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे.
…..
विनम्र निवेदन….
नमस्कार,
कु. श्रृतकिर्ती रणजित सावंत (आजरा/कोल्हापुर ) म्हणजेच तुझ्या रुपाचं चांदणं या मालिकेतील तुमची लाडकी रेणुका हिला तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आणि शुभेच्छांमुळे “कलर्स मराठी अवॉर्डस् २०२१-२०२२” मध्ये “सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री” या विभागात “रेणुका वहिनी” या पात्रासाठी नामांकन मिळाले आहे. आता गरज आहे तुमच्या सर्वांच्या vote रुपी प्रेमाची ! दिलेल्या लिंक वर क्लिक करून तीला भरघोस मतांनी निवडून द्या ! धन्यवाद !
आपले विनीत..
मृत्युंजय महान्यूज परिवार व सावंत परिवार आजरा/ पुणे /कोल्हापूर
https://voot.app.link/UIECACtPOnb(कृपया VOOT हे application प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून Voting करा)
……
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री.अनिरुद्ध (बाळ) केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्पण ब्लड बँक, कोल्हापूर यांच्यामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा नगरपंचायत बांधकाम समिती सभापती किरण कांबळेहोते.नगरसेवक सिकंदर दरवाजकर,आजरा साखर कारखाना संचालक जनार्दन टोपले.स्वराज तालीम मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ५१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.

भाजपाचे प्रधानमंत्री ई-श्रम कार्ड महा-नोंदणी शिबिर

भाजपा मध्यवर्ती कार्यालय आजरा येथे गर्जना प्रतिष्ठान चे संस्थापक प्रकाश बेलवाडे, भाजपा माजी अध्यक्ष अरुण देसाई, तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री ई- श्रम कार्ड महा-नोंदणी शिबिराचे उद्घाटन करणेत आले.
देशातील असंघटित कामगारांना संघटित करून त्यांची नोंदणी करून त्यांनी विशेष सुविधा पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा जास्तीत असंघटित कामगारांना लाभ व्हावा या उद्देशाने आजरा शहर अध्यक्ष वैभव नार्वेकर, उदयराज चव्हाण आणि हर्षवर्धन महागावकर यांच्या सहकार्याने महा नोंदणी शिबिर राबविण्यात आले.
यावेळी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेरणोली केंद्राअंतर्गत शिक्षण परिषद विद्यामंदिर सोहाळे शाळेत संपन्न

त्यांनी केंद्र अंतर्गत शिक्षण परिषद विद्या मंदिर सोहाळे येथे पार पडली.परिषदेच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षिका सौ. कविता नाईक होत्या.
मान्यवरांच्या स्वागतानंतर मुख्याध्यापक श्री. संजय बागडी यांनी निपुण भारत अभियान अंतर्गत शिक्षण परिषदेचा उद्देश व सोहाळे शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला त्यानंतर शिष्यवृती यशाबद्दल सौ. नाईक यांचा साळगाव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजिरी यमगेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्या नंतर निपुण भारत अंतर्गत एम. पी. देसाई, रविंद्र नावलकर , दयानंद भंडारी यांनी मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावरील परिपत्रक वाचन, १ली ते५वी इयत्तेसाठी भाषा ,गणित राबवण्यात येणार्या अभियानाबाबत माहिती दिली.
अध्यक्ष सौ कविता नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सोहाळे शाळेने परिषदेचे केलेले नेटके नियोजन शाळेची शैक्षणिक गुणवत्तेची वाढती कमान याबद्दल शाळेचे कौतुक केले. परिषदेला केंद्रमुख्याध्यापक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. राजदिप यांनी केले व आभार नागेश सुतार यांनी मानले.

💥 यूक्रेनवर कधीही टाकला जाऊ शकतो ४४ टनचा महाविनाशकारी ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’
🔹रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यूक्रेनमध्ये ४४ टन वजनाचा सर्व बॉम्बचा बाप म्हणजेच ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ टाकण्यास तयार आहे. संरक्षण सुत्रांच्या माहितीनुसार, रशियाच्या राष्ट्रपतींनी यूक्रेनमधील मोहीमेत वापर करण्याचा आदेश दिला आहे. हा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा नाटोने इशारा दिला की, मास्को कोणत्याही वेळी हल्ल्याची योजना बनवत आहेत.
‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ काय आहे?
असे म्हटले जात की, यापूर्वी ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ला सीरियामध्ये डीर एज-जोरमध्ये टाकले होते. या सुपर शक्तीशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब ४४ टनहून अधिक असलेला या बॉम्बचा टीएनटीप्रमाणे विस्फोट होतो. विशानकारी हत्यार एक जेटमधून टाकले जाते. यामुळे सुपरसोनिक शॉकवेव्ह आणि अत्यंत उच्च तापमानामुळे सर्वाधिक नुकसान होते.
यूक्रेनच्या लोकांना मानसिक रित्या तोडणार हा बॉम्ब
सीरियामध्ये याचा वापर केला होता. युद्ध सुरू झाल्यासाठी आणि यूक्रेनच्या लोकांच्या भावना तोडण्यासाठी हा बॉम्ब टाकला जाऊ शकतो. या बॉम्बमुळे मोठी जीवितहानी आणि टाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. दरम्यान रशियाने परमाणू बॉम्ब टाकण्याची तोफ तैनात केली आहे. परमाणूचा हल्ला करण्यासाठी 2S7 Pion तोफ यूक्रेनच्या दुसरे मोठे शहर खारकीवजवळ असलेल्या सीमेवर तैनात केले आहे. ही तोफ ३७ किलोमीटरपर्यंत परमाणू बॉम्ब टाकू शकते. यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की, किती मोठी नुकसान होईल.
यापूर्वी रशियाच्या राष्ट्रपतीने हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाइल आणि इतर हत्याराचे प्रक्षेपणसंबंधित सामरिक परमाणूचा अभ्यास पाहिले. क्रेमलिननुसार, दोन बॅलिस्टिक मिसाइल लाँच केले आहे. एक उत्तर-पश्चिम रशियाच्या एकाबाजूने आणि दुसरे बार्ट्स सीमेमध्ये एक पानबुड्डीहून केली आहे. हजारो मैल्य दूर लक्ष्य करण्याचा हेतू आहे.
१९४५ सालानंतर सर्वात मोठे युरोपमध्ये युद्ध..?
बोरिस जॉन्सन यांनी आज इशारा दिला की, यूक्रेनवर रशिया लवकरच हल्ला करू शकतो. जर यूक्रेनवर हल्ला केला तर, याचा मोठा परिणाम जगावर होऊ शकतो. १९४५नंतर युरोपमध्ये हे सर्वात मोठे युद्ध होणार आहे.’





