उचंगी प्रकल्पस्थळी सतरा दिवसांकरीता १४४ कलम. घळ भरणी प्रक्रिया वेगावली..
उचंगी प्रकल्पस्थळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेले तणावाचे वातावरण विचारात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढील सतरा दिवसांकरता जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. यामुळे प्रशासनाकडून घळभरणी प्रक्रिया लवकरात लवकर करून घेण्याच्या हालचाली झाल्याचे स्पष्ट होत आहे.
असा आहे आदेश…
उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांचे पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी केलेले मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करून धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडलेले आहे. तसेच धरणाचे अंतिम टप्यातील घळभरणीचे काम सुरु असून वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्या नसल्याचा व घळभरणीचे काम पुर्ण झाले की उर्वरित मागण्या मान्य होणार नाही असा धरणग्रस्तांचा झालेला समज व काही प्रकल्पग्रस्त हे घळभरणीचे काम बंद पाडण्यासाठी एक जमाव करुन धरणाचे कामकाज बंद करुन तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान व जाळपोळ करण्याची दाट शक्यता आहे. सदर धरणाचे पुढील उर्वरित कामकाज हे शांततेत सुव्यवस्थेत व सुरळीत पार पाडणेसाठी आणि सदर उचंगी प्रकल्पाचे घळभरणी ठिकाणापासून २ किमी परीघ क्षेत्रामध्ये प्रतिबंधीत क्षेत्र व्हावे आणि ज्याअर्थी उचंगी प्रकल्पाचे घळभरणी परीसरात धरणाचे कामकाज बंद करुन येथील यंत्रसामुग्री नुकसान व जाळपोळ होण्याची दाट शक्यता असून सदर ठिकाणी शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी बंदी आदेश लागू करणे आवश्यक आहे.
सदर आदेशापुर्वी संबंधितांना नोटीस बजावणी करणे शक्य नसल्याने, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढणे आवश्यक आहे त्यामूळे प्रोसिजर कोड १९७३ मधील कलम १४४ अन्वये, मला प्रदान असलेल्या अधिकारास अनुसरुन असा आदेश देतो की, उचंगी प्रकल्पाचे घळभरणी ठिकाणापासून २ किमी परीघ व्यासाममध्ये दि. २२/०२/२०२२ रोजी रात्री ००.०० ते दिनांक ०८/०३/२०२२ रोजी रात्री २४.०० या कालावधीत सी.आर.पी.सी. १९७३ चे कलम १४४ अन्वये उचंगी प्रकल्पासाठी कार्यरत अधिकारी/कर्मचारी/पोलीसवर्ग, कामासाठी उपयोगात येणारी वाहने, मशीनरी, संसाधने, शासकिय अधिकारी/कर्मचारी यांची वाहने संचार करणे व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीने व वाहनांना परवानगी शिवाय संचार करणेस याव्दारे बंदी घातली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील असेही या आदेशात म्हटले आहे.
. ……
ग्रुप ग्रामपंचायत शृंगारवाडी (उचंगी)ला जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार

गेल्या चार वर्षांमध्ये अनेक अभियाने यशस्वी राबवून जिल्ह्यासह विभागस्तरावर मजल मारलेले ग्रुप ग्रामपंचायत शृंगारवाडी ला जिल्हास्तरीय प्रथम यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला होता त्याचे वितरण मा ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ , मा जिल्हापरिषद अध्यक्ष श्री पाटील व उपाध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी यांचे उपस्थितीत छ शिवाजी विद्यापीठ चे राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय सभागृहात दि १८ फेब्रुवारी रोजी पार पाडला .या पुरस्कारासह ग्रामपंचायतीस तालुका स्तरीय यशवंत ग्रामपंचायत तसेच सरपंच सौ आंबूताई केशव सुतार यांना यशवंत सरपंच या पुरस्काराने सन्मानित करणेत आले .
…….
निधन वार्ता :मारुती भाटले

पांगिरे (ता. भुदरगड) येथील मारुती भाटले(वय ७५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे सोना नातवंडे मुलगी,जावई असा परिवार आहे. आजरा येथील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संतोष भाटले व रवी भाटले यांचे ते वडील होत.
…….







