

निंगुडगे येथे मारहाणीत एक जखमी
निंगुडगे (ता. आजरा) येथे पैशाच्या कारणावरून झालेल्या मारामारीमध्ये शिवराज मगदूम यांना आप्पाजी मगदूम (रा. तेरणी ता. गडहिंग्लज) व अन्य दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी आप्पाजी मगदूम व अन्य दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवराज मगदूम यांच्या मालकीची गाय आप्पा मगदूम यांनी खरेदी केली होती या व्यवहारातील शिल्लक पैसे शिवराज यांनी मागितल्याचा राग आप्पा यांना आला. याच रागातून त्याने त्यांच्या डोक्यात वार करून जखमी केले अशी फिर्याद शिवराज मगदूम यांनी आजरा पोलिसात दिली आहे.या फिर्यादीवरून आप्पाजी मगदूम व अन्य दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


श्रावण बाळसह अन्य पेन्शन तात्काळ जमा न केलेस आंदोलनाचा इशारा

राज्यात विधवा सन्मानाचे वारे वाहत असतांना विधवांसह परित्यकत्या अपंग आणि निराधार स्त्री पुरुषांची मिळणारी पेन्शन तटवून प्रशासनाने शासनाच्या परिपत्रकाला एक प्रकारे हरताळ फासला आहे. अपंग, विधवा परित्यकत्या निराधार स्त्री पुरुषांना दिली जाणारी संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन तात्काळ खात्यावर जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज तहसीदार विकास अहिर याना निवेदनाद्वारे कळविला. यावेळी संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा पण उपस्थित होते..
शिष्टमंडळात मुकुंद नार्वेकर, निवृत्ती फगरे, संतोष सुतार, दिलीप कांबळे, सुशीला होरंबळे यांच्यासह अपंग पुनर्वसन संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
……………….. छोटी जाहीरात ………………..
खरेदी-विक्री
आजरा मुख्य बाजारपेठेतील 1680 चौ. फूट आर. सी. सी.इमारत विकणे आहे.
…
जॉन फर्नांडिस नगरच्या मागील बाजूस असणारा (desai colony) 180 चौ. मि. चा बिगरशेती भूखंड विकणे आहे.
…
नाईक गल्ली येथील 3 गुंठे क्षेत्र विकणे आहे.
…
गांधी नगर येथील 2.25 गुंठे क्षेत्र विकणे आहे.
…
आजरा बाजारपेठेत असणा-या इमारतीचा दुसरा मजला(अंदाजे 4000 चौ,फूट ) विकणे/भाडयाने देणे आहे.
…
संपर्क :9637598866





