

आवंडी धनगर वाड्यावर आठ देशी गाईंचा आकस्मिक मृत्यू

आजरा तालुक्यातील आवंडी धनगर वाडा क्रमांक तीन येथे अज्ञात आजाराने अथवा विषारी वनस्पती खाल्ल्याने धनगर बांधवांच्या आठ गाई दगावल्या आहेत.अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बयाजी गंगाराम कोकरे, बबन विठू कोकरे, कोंडीबा गंगाजी कोकरे, जानू बाबू कोकरे यांच्या गाईंचा समावेश आहे. सदर गाईंनी विषारी वनस्पती खाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पशुधन विभागाचवतीने वर्तवण्यात आला आहे.

मलिग्रे येथील आगीत 5 म्हैशी जखमी..1 मयत

मालिग्रे (ता. आजरा) येथ्रे श्री. जोतिबा गणपती साळुंखे. यांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये 4 म्हशी व 1 रेडकू भाजूले असून या दुर्घटनेतील रेडी मृत्यू पावली असून इतर जनावरे गांभीर जखमी आहेत .घटनास्थाळी गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी भेट देऊन पाहणी केली व सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीची आर्थिक मदत करून अत्यावश्यक ती सर्व मदत करण्यासंबंधी दूध संघाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आजऱ्यात कृषि दिन कार्यक्रम उत्साहात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री के. वसंतरावजी नाईक यांची जयंती – ०१ जुलै, दरवर्षी कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पंचायत समिती आजरा व तालुका कृषि अधिकारी यांचे सयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी श्री. सुधाकर खोराटे, तालुका कृषि अधिकारी श्री. के. एल. मोमीन, मंडल कृषि अधिकारी श्री. निलकुमार ऐतवडे, कृषि अधिकारी श्री. दिनेश शेटे, विस्तार अधिकारी श्री. ए. बी. मासाळ, श्री. एस. एस. एरूडकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. बी. सी. गुरव, कृषि विभागाकडील कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्तविकात मंडल कृषि अधिकारी श्री. निलकुमार ऐतवडे यांनी के. वंसतरावजी नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचे महत्व विषद केले. तसेच दि. २५.०६.२०२२ ते ०१.०७.२०२२ अखेर साजरा करण्यात येत असलेल्या कृषि संजिवनी सप्ताहाबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी अभ्यासू वृत्तीने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा व वेगवेगळया माहितीचा पिकाच्या लागवडीमध्ये अवलंब करून जास्तीत जास्त उत्पादन घेउन किफायतशीर शेती करण्याची गरज असल्याचे सोहाळे येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुर्यकांत दोरुगडे यांनी प्रतिपादन केले. यावेळी गतवर्षी तालुक्यात घेण्यात आलेल्या पीक स्पर्धा विजेते शेतकरी श्री. संभाजी मारुती पाटील, रा. वझरे, श्री. किरण कृष्णाजी देशपांडे रा. हाजगोळी बु. व श्रीमती बायाक्का रामू पोवार रा. मोरेवाडी यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले. शासनाशी संलग्न असलेल्या पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. पाटील यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी श्री. के. एल. मोमीन यांनी कृषि विभागाकडील विविध योजना, महाडिबीटी आणि पीक विमा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून तालुक्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रभारी गटविकास अधिकारी श्री. सुधाकर खोराटे यांनी जिल्हा परिषदेकडील विविध योजनांची माहिती दिली. आभार कृषि अधिकारी श्री. दिनेश शेटे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. श्रीनिवास अपसंगी यांनी केले.

आजरा महाविद्यालय च्या गौरव भोसले वेस्ट झोन क्रिकेट साठी विद्यापीठ संघात झाली

अखिल भारतीय क्रीडा विद्यापीठ असोसिएशन व जे जे टी यू विद्यापीठ यांच्या वतीने दिनांक 23 ते 27 जून 2022 दरम्यान राजस्थान येथे वेस्ट झोन क्रिकेट पुरुष आंतर – विदयापीठ स्पर्धासाठी आजरा महाविद्यालय च्या गौरव हेमंत भोसले याची शिवाजी विद्यापीठ क्रिकेट संघात निवड झाली आहे.
त्याला संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी,मा. डॉ. अनिल देशपांडे, मा. रमेश कुरुनकर, डॉ. दिपक सातोस्क्रर, योगेश पाटील, दिनेश कुरुनकर, विलास नाईक,विजयकुमार पाटील, सु. ई. डांग, प्राचार्य डॉ. अशोक सादले, उपप्राचार्य दिलीप संकपाळ डॉ. धनंजय पाटील , अल्बर्ट फर्नांडिस, प्राध्यापकवृंद, शिक्षककेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले .

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे १ कोटी ५७ लाख जमा.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनुदान जमा…..
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे गेले दोन महिने तटलेले १ कोटी ५७ लाख इतके अनुदान आज जमा झाले असून विधवा परित्यकत्या व अपंग स्त्री पुरुषांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा होणार आहे.
गेले दोन तीन महिने विधवा परित्यकत्या व अपंग स्त्री पुरुषांची पेन्शन मिळालेली नव्हती त्यासंदर्भात मागील आठवड्यात तहसीलदार आजरा यांना श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. या निवेदनात पेन्शनची रक्कम खात्यावर आठ दिवसात जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. तहसीलदार आजरा यांनी निवेदनाची प्रत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाला अपंग व विधवा परित्यकत्या निराधार स्त्री पुरुषांच्या भावना तातडीने कळविल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत पेन्शन अनुदान आज जमा झाले.
तहसीलदार आजरा यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हे अनुदान तात्काळ जमा झाल्याने संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहे.

पुन्हा गजराजाचे वेळवट्टी येथे

काल दि ३० रोजी रात्री ८:०० वाजता वेळवट्टी ता आजरा येथील डॉ धनाजी गोविंद राणे यांच्या शेतामधील मेसकाठ्या हत्तीने मोडून नुकसान केले आहे
सुमारे अर्धा तास हत्ती राणे यांच्या शेतात होता
नंतर तो आजरा आंबोली राष्ट्रीय महामार्ग ओलांडून देवर्डेच्या दिशेने गेला
या वेळी वाहनधारकांची व परिसरातील नागरिकांची हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.

उदयपूर खुनाचा श्रमुद (लो) तर्फे निषेध
उदयपूर, राजस्थान येथे धार्मिक कट्टरपंथीय लोकांनी एकाचा निर्घृणपणे खून केला. या खुनाचा श्रमिक मुक्ती दल (लोक.) ने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या एका इसमाचा उदयपूर येथे खून करण्यात आला होता.
अलिकडच्या काळात धार्मिक कट्टरतावाद वाढत आहे. धार्मिक सहिष्णुता व सर्वधर्मसमभाव या मूल्यांवर आधारित भारतीय राज्यघटना ही या देशाचा पाया आहे. परंतु, जाणीवपूर्वक संविधान विरोधी शक्ती मोठ्याप्रमाणात सक्रिय होताना दिसत आहेत. या सर्व शक्तींना खतपाणी घालणाऱ्या अनेक संघटना आपल्या देशात सक्रिय आहेत. त्या कोणत्या एका धर्माच्या नाहीत. धार्मिक कट्टरतावाद हा देशाच्या एकता व अखंडतेला घातक आहेत. हा घातकपणा जाणीवपूर्वक देशात पसरवण्याचे काम केले जात आहे, ज्याचा महत्वाचा डाव म्हणजे, हिंदू-मुसलमान तेढ वाढविणे. हिंदू-मुस्लिम द्वेष वाढवून देशात संविधानाची व देशाच्या उज्वल साहिष्णुतेच्या परंपरेची पायमल्ली करण्याचा धार्मिक कट्टरतावाद्यांचा डाव सुज्ञ भारतीयांनी ओळखून, हा डाव हाणून पाडला पाहिजे, असेही श्रमुदने आवाहन केले आहे.

जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात ९९.७१ टक्के वसुली

जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात बँक पातळीवरील कर्जाची ९९.७१ टक्के इतकी वसुली झाल्याची माहिती संचालक सुधीर देसाई व विभागीय अधिकारी सुनील दिवटे यांनी दिली.
तालुक्यात १०८ विकास संस्थांकडून ५८ कोटी ५९ लाख एक हजार अल्प मुदत पीक कर्ज तसेच दोन कोटी ४४ लाख ६० हजार मद्यम मुदत कर्ज असे एकूण ६१ कोटी तीन लाख ६१ हजार वसुलपात्र कर्ज येणे होते. पैकी मद्यम मुदत कर्जाची संपूर्ण वसुली झाली असून एकूण वसुली ६० कोटी ८६ लाख ३१ हजार म्हणजे ९९.७१ % इतकी झाली आहे . १०५ संस्थांकडून बँक कर्जाची संपूर्ण वसुली झाली .
वसुलीसाठी बँकेचे चेअरमन आमदार हसन मुश्रिफ यांचे मार्गदर्शन ,सर्व विकास संस्थांचे चेअरमन,संचालक ,सचिव ,सभासद तसेच बँकेचे वसुली अधिकारी ,निरिक्षक,शाखाधिकारी व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
बँकेमार्फत शासनाच्या विविध महामंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची तसेच व्यक्तीगत कर्ज योजनांचीही कार्यवाही सुरु असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक देसाई यांनी केले.
छाया वृत्त :–
कृषीपंप विद्युत प्रवाह पुरवठा वेळापत्रकात बदल करण्याच्या मागणीचे निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याना देताना तालुकाप्रमुख राजू सावंत व कार्यकर्ते
………..
…..छोटी जाहीरात ….
खरेदी-विक्री
आजरा मुख्य बाजारपेठेतील 1680 चौ. फूट आर. सी. सी.इमारत विकणे आहे.
…
जॉन फर्नांडिस नगरच्या मागील बाजूस असणारा (DESAI COLONY) 180 चौ. मि. चा बिगरशेती भूखंड विकणे आहे.
…
नाईक गल्ली येथील 3 गुंठे क्षेत्र घरासह विकणे आहे.
…
गांधी नगर येथील 2.25 गुंठे क्षेत्र विकणे आहे.
…
आजरा बाजारपेठेत असणा-या इमारतीचा दुसरा मजला(अंदाजे 4000 चौ,फूट ) विकणे/भाडयाने देणे आहे.
…
संपर्क :9637598866



