महाविद्यालयीन तरुणीची इटे येथे आत्महत्या

इटे ,तालुका आजरा येथील निशा बाळू सुतार(वय 18 वर्षे ) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत इटे ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, घरी कोणीही नसताना कुमारी निशा बाळू सुतार हिने राहत्या घराच्या तुुळीला गळफास लावून घेतला.सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. आजरा येेेेेेथे 12 वी च्या वर्गात शिकत होती. निशा हिच्या पश्चात भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेची नोंद आजरा पोलिसात करण्याची कार्यवाही सुरू आहे.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

प्रा.अर्जुन आबिटकर यांनी आवंडी धनगरवाड्यावर घेतली धाव ; मृत्यू पावलेल्या गायीच्या शेतकर्यांना दिला दिलासा

आवंडी धनगरवाडा क्रमांक तीन (ता. आजरा) या धनरवाड्यावरील आठ गायींचा मृत्यू विषबाधा झाल्याने झाला आहे. त्यामुळे पशुपालकांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी धनगरवाड्याला भेट दिली. तहसीलदार विकास अहिर, पशुपालक व आवंडीचे सरपंच बाबू येडगे यांच्याशी चर्चा केली. घटनेची आ. प्रकाश आबिटकर यांना माहिती दिली असून, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून दिली जाईल, अशीही ग्वाहि त्यांनी दिली.
शेतकरी बयाजी गंगाराम कोकरे, बबन विठू कोकरे, कोंडीबा धुळू कोकरे, जानू बाळू कोकरे, विठ् बाबू कोकरे व कोंडीबा गंगाजी कोकरे यांच्याशी चर्चा केली. पशुधन विस्तार अधिकारी श्री. ढेकळे यांना सूचना दिल्या. यावेळी रणजित सरदेसाई, विजय थोरवत, संतोष भाटले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


………. छोटी जाहीरात ………..
खरेदी-विक्री
आजरा मुख्य बाजारपेठेतील 1680 चौ. फूट आर. सी. सी.इमारत विकणे आहे.
…
जॉन फर्नांडिस नगरच्या मागील बाजूस असणारा (DESAI COLONY) 180 चौ. मि. चा बिगरशेती भूखंड विकणे आहे.
…
नाईक गल्ली येथील 3 गुंठे क्षेत्र विकणे आहे.
…
गांधी नगर येथील 2.25 गुंठे क्षेत्र विकणे आहे.
…
आजरा बाजारपेठेत असणा-या इमारतीचा दुसरा मजला(अंदाजे 4000 चौ,फूट ) विकणे/भाडयाने देणे आहे.
…
संपर्क :9637598866







