

आजर्यात भरचौकातील दुकान चोरट्यांनी फोडले ; सुमारे एक लाखाचा मद्देमाल लंपास ..सीसीटीव्हीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
आजरा शहरातील प्रंचड रहदारीचा अशी ओळख असणार्या संभाजी चौकातील दुकान फोडून सुमारे एक लाखांचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.याबाबतची अधिक माहिती अशी कि, आजर्यातील प्रसिध्द अशा आबुल पान शाॅप या सलाम अब्दुल काकतीकर यांच्या दुकानाचे कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील साहित्यासह सुमारे एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला.गेल्या वर्षात सलग दुसर्यांदा हा चोरीचा प्रकार घडला आहे.शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदाही चोरटे उठवतांना दिसतात. या चोरीची नोंद आजरा पोलिस ठाण्यात झाली असून व्यापारी वर्गात या प्रकारामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अलिकडे शहरामध्ये भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. गेली ७ वर्ष आजरा शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत यामुळे एखादी गुन्हेगारीची घटना शहरात घडल्यास स्थानिक व्यापार्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची मदत पोलिसांना घ्यावी लागते.मोजक्याच व्यापर्यांकडे सीसीटीव्हीची व्यवस्था असल्याने पोलिस तपासावर मर्यादा येतांना दिसतात

धामणे येथील मोटर चोरी प्रकरणातील आरोपी आजरा पोलिसांकडून गजाआड
धामणे (ता. आजरा) येथील ग्रामपंचायत मालकीच्या पंप हाऊस मधील इलेक्ट्रिक मोटर अज्ञात चोरट्याने 1 जुलै रोजी चोरून नेल्याची फिर्याद ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संभाजी गुरव यांनी पोलिसात दिली होती. पोलिसांनी तातडीने तपास करून विजय अशोक गोसावी (वय 19, राहणार लिंगनूर, ता. कागल) याला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली इलेक्ट्रिक मोटर व गुन्हा करताना वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले आहे.
या कामी आजरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, फौजदार बी.एस.कोचरगी, अमोल पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

कोवाडे येथे भटक्या कुत्र्यांचा कडून कोंबड्यांचा फडशा
कोवाडे( ता.आजरा ) येथे भटक्या कुत्र्यांचा कोंबड्यान चाफळच्याकोवाडे येथे भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून गावातील सुमारे पंचवीस कोंबड्या या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहेत.
आमराई परिसरामध्ये सदर प्रकार घडला असून गावासह पंचक्रोशीत वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

गाई मृत झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी
शिवसेना- युवासेनेची मागणी

धनगरवाडा क्र. 3 येथील शेतकऱ्यांचा उदर निर्वाह हा जनावरे व शेतीवर अवलंबून आहे. अचानक या गाई दगावल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे पशुधन गेल्याने शेतकरी कासावीस झाला असुन त्याला दिलासा देण्यासाठी नवीन पशुधन खरेदीसाठी हातभार म्हणून आपल्या कडून आपत्तीव्यवस्थापन मधून खासबाब मधून त्यांना अनुदान देण्यात यावे,अशी मागणी तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी नगसेवक व उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, राधानगरी विधानसभा संपर्कप्रमुख दीनानाथ चौगुले,शिवसेना तालुकप्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत,शिवसेना शहरप्रमुख ओंकार माध्याळकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव,युवासेना तालुकाअधिकारी महेश पाटील व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

आजऱ्यात आज ‘राष्ट्रवादी’ तर्फे सेवा संस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार
आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजरा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या विविध सेवा सोसायटयामधिल् नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या सत्काराचे आयोजन आज मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी 11 वाजता एम.आय. डि. सी., आजरा येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी दिली.
माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्कार समारंभास आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही सुधीर देसाई यांनी स्पष्ट केले.


……………….. छोटी जाहीरात ………………..
खरेदी-विक्री
आजरा मुख्य बाजारपेठेतील 1680 चौ. फूट आर. सी. सी.इमारत विकणे आहे.
…….. ………………..
जॉन फर्नांडिस नगरच्या मागील बाजूस असणारा (DESAI COLONY) 180 चौ. मि. चा बिगरशेती भूखंड विकणे आहे.
…………………..
नाईक गल्ली येथील 3 गुंठे क्षेत्र घरासह विकणे आहे.
………………………..
गांधी नगर येथील 2.25 गुंठे क्षेत्र विकणे आहे.
…………………….
आजरा बाजारपेठेत असणा-या इमारतीचा दुसरा मजला(अंदाजे 4000 चौ,फूट ) विकणे/भाडयाने देणे आहे.
…… ……. संपर्क :9637598866……..


