
‘ तो ‘ मृतदेह हात्तीवडेतील महिलेचा…

हाजगोळी ( ता.आजरा ) येथील बंधाऱ्यांमध्ये हिरण्यकेशी नदी पात्रात सापडलेला मृतदेह हात्तीवडे येथील सौ. सविता तानाजी गुरव या ३६ वर्षीय विवाहितेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सौ.सविता यांना दिनांक २० सप्टेंबर रोजी स्थानिक नागरिकांनी हात्तीवडे येथील हिरण्यकेशी नदी घाट परिसरात सायंकाळच्या दरम्यान पाहिले होते. त्यानंतर त्या आढळून आल्या नव्हत्या. त्या नदीपात्रातून वाहून गेल्या असल्याचा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करत होते. ग्रामस्थ व नातेवाईकांकडून गेले आठ दिवस त्यांची शोध मोहीम सुरू होती. दरम्यान हाजगोळी बंधाऱ्यांमध्ये आज सापडलेला महिलेचा मृतदेह सौ. गुरव यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सौ. गुरव यांच्या पश्चात पती व मुलगा आहे आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आजरा येथे गिरणी कामगारांचा सोमवारी मेळावा
आजरा येथील किसान भवन येथे सोमवार दिनांक २ रोजी दुपारी बारा वाजता सर्व श्रमिक संघटना, यांच्या वतीने मेळावा आयोजित केला आहे .
या मेळाव्यात म्हाडा कडून आलेली यादी, अद्ययावत करणे तसेच म्हाडा कडून काही सुचना व अटी लावणे आल्या आहेत. त्यावर चर्चा करून मंबईत घरे मिळण्यासाठी, ऑनलाईन फाॅर्म भरणे करीता नियोजन केले आहे, तरी सर्व गिरणी कामगारनी मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे, आवाहन काॅ शांताराम पाटील यानी केले आहे.
🌧️🌧️पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप ; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

🌧️पुणे – शहरात विसर्जनाच्या दिवशीच दुपारी साडेतीन नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कात्रज, आंबेगाव, धायरी, नर्हे, खडकवासला, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, सुस, बावधन या भागात प्रचंड मोठा पाऊस झाला.
अवघ्या काही मिनिटातच रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. सिंहगड रस्त्यावर वडगाव पूल, पाटील हॉस्पिटल, इनामदार चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली.
विसर्जन मिरवणूक पहायला जाणाऱ्या अनेक नागरिकांच्या गाड्या बंद पडल्या. पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने सिंहगड रस्त्यावर धोकादायक स्थिती निर्माण झालेली होती. यातच काही मंडळाने मिरवणूक रथ रस्त्यातच थांबवून कार्यकर्त्यांनी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेतला. यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली.
सुदैवाने दिड दोन तासात पावसाचा जोर कमी झाल्याने मिरवणूका पुन्हा मार्गस्थ झाल्या. रस्त्यावरील पावसाळी चेंबरमध्ये ठिकठिकाणी कचरा साचल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने पाण्याचा निचरा झाला.
याप्रकारे पावसाळी गटारे तुंबून वाहतूक कोंडी होण्याची परिस्थिीत सुस बावधन मध्ये देखील निर्माण झाली होती. रस्ते तुंबल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
दरम्यान पाऊस कमी झाल्यावर उपनगरांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागात सह परिवार मित्र मंडळींसह देखावे बघण्यासाठी निघाले. यामुळे स्वारगेट, सारसबाग, सेव्हन लव्हच चौक, डेक्कन , नळ स्टॉप आदी ठिकाणी सायंकाळी सहानंतर गर्दी झाले. यातच वाहन चालकांनी दिसेल तीथे वाहने लावल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत होते.
कारण… राजकारण
……………
अजितदादा मुंबईत सर्व गणपतींना गेले, पण ‘वर्षा’वर का नाही?, शिंदेंचे नेते म्हणतात, खाजवून खरुज काढू नका!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान यां दिग्गज कलाकारांसह जगातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. मात्र गणेशोत्सवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीबरोबच चर्चा झाली ती अजित पवरांच्या अनुपस्थितीची. अजित पवारांनी वर्षा निवासस्थानावरील गणेशोत्सवात पाठ फिरवल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजा रंगली आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी टाळले
अजित पवारांनी गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील लालबाग, सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली. एवढच नाही तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी देखील हजेरी लावली. मात्र मुंबईत असून देखील अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी टाळले. यावर दीपक केसरकर विचारले असता ते म्हणाले,एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे संबंध चांगले आहेत. कदाचित चुकून मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीला जाणेचे राहून गेले असेल. अशा चर्चा म्हणजे खाजून खरूज काढणं अशातला हा प्रकार आहे.
अजित पवारांमुळे शिंदे गटातील अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्डवॉर असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून रंगल्या आहेत. आता अजित पवारांनी मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदर देखील मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते त्यावेळी देखील पाठ फिरवली होती. दरम्यान अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे बोलले जाते. अजित पवारांमुळे शिंदे गटातील अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांच्या शासकीय निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय नेते मुंबईत आल्यावरच दर्शन घेतलं. मात्र त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असू द्या किंवा मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईतला दौरा असू द्यात या ठिकाणी कुठेही दिसले नाही. इतकंच काय तर अजित पवार गटातील एक-दोन मंत्री आणि नेते सोडले तर बाकीच्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी दिसले नाहीत.
सण उत्सवात कुटुंब -समाज एकत्र येत हे सण उत्सव साजरे करतो. आता त्यात यंदाच्या गणेशोत्सवात सत्तेत एकत्र असणारे. वेळोवेळी आपण एक आहोत हे दाखवणारे हे नेते मात्र आपल्या व्यस्त वेळामुळे फारसे एकत्र दिसले नाहीत आणि त्यामुळेच या सगळ्याची राजकीय चर्चा तर होणारच. आता गणेशोत्सवात संपूर्ण मुंबईचा दौरा करणारे अजित पवारांना केसरकर म्हणात त्याप्रमाणे खरेच लक्षात राहिले नसेल.

…फिल्मी न्युज… ‘बाहुबली २ ‘ ते ‘जवान ‘; भारतीय सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली १००० कोटींपेक्षा अधिक कमाई

💫💫 भारतात विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. पण त्यातील काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाले.तर काही सिनेमे मात्र सुपरफ्लॉप झाले. दुसरीकडे काही सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवण्यात कमी पडले असले तरी प्रेक्षकांच्या मात्र पसंतीस उतरले. ‘बाहुबली २, ‘आरआरआर’ ते ‘जवान’ पर्यंत अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर १००० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.*
बाहुबली २
‘बाहुबली २’ हा प्रभासच्या करिअरमधला सुपरहिट सिनेमा आहे. एस.एस. राजामौलींनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह हिंदीतही या सिनेमाने चांगली समाई केली. या सिनेमाच्या माध्यमातून प्रभास ‘पॅन इंडिया’
स्टार झाला. ‘बाहुबली २’ या सिनेमाची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ होती. रिलीजच्या दहा दिवसांत या सिनेमाने १००० कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
आरआरआर
एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या सिनेमा काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला. या सिनेमात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आह भारतासह जगभरात या सिनेमाने चांगलीच कमाई केली. या सिनेमाला ऑस्करदेखील मिळालं. रिलीजच्या १६ दिवसांत या सिनेमाने १००० कोटींचा गल्ला जमवला.
केजीएफ
प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ २’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. हिंदी पट्ट्यात या सिनेमाला चांगलच यश मिळालं. रिलीजच्या १६ दिवसांत या सिनेमाने १२०० कोटींची कमाई केली आहे.
‘जवान’
शाहरुख खान स्टारर ‘जवान’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. ‘जवान’ हा शाहरुखचा या वर्षातला दुसरा सिनेमा आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे. आता हा सिनेमा नक्की किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘पठाण’
‘पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पड्यावर पदार्पण केलं. या सिनेमात किंग खानचा ॲक्शन मोड पाहायला मिळाला आहे. रिलीजच्या २७ दिवसांत या सिनेमाने भारतात ५०० कोटी आणि १००० कोटींचा गल्ला जमवला आहे.
दंगल
आमिर खानच्या करिअरमधला ‘दंगल’ हा सुपरहिट सिनेमा आहे. या सिनेमातील आमिरच्या कामाचं खूप कौतुक झालं. नितेश तिवारी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘दंगल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलच कलेक्शन जमवलं. या सिनेमाने १५४ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १००० कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
News Source :-
https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq




