
पाऊस नाही तरीही रामतीर्थ धबधबा कोसळू लागला…

रामतीर्थ धबधबा तालुक्यात समाधानकारक पाऊस न होताही पुन्हा एक वेळ दिमाखात कोसळू लागला आहे. गतवर्षी 15 मे रोजी धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला होता त्याला कोकण व आंबोली परिसरात झालेला जोरदार पाऊस व पश्चिम भागात झालेला जोरदार पाऊस जबाबदार होता.
या वर्षी मात्र मान्सूनचा अद्याप पत्ता नाही. केवळ आंबोली भागांमध्ये असणारा पाऊस व विविध छोट्या- मोठ्या धरणांचे सोडलेले पाणी यामुळे रामतीर्थ धबधबा बऱ्यापैकी क्षमतेने पुन्हा कोसळू लागला आहे .पाऊस नसतानाही पर्यटकांची आता रामतीर्थ कडे गर्दी होताना दिसत आहे.


पोलीस असल्याचे भासवून वृद्धा कडून 35 हजार रुपयांचे दागिने लंपास …
आजरा येथील भादवण फाट्यावर कृष्णा अप्पाजी डोंगरे या 80 वर्षीय वृध्दास आपण पोलीस आहे आपल्या गडहिंग्लजच्या साहेबांनी बंदुकीसह दोन लाखांचा माल जप्त केला आहे असे सांगून त्यांचेकडील साहित्य व हातातील अंगठ्या काढून ठेवणेस सांगून त्या रुमालात गाठ मारून देत असता हातचलाखी करून रुमालातील सोन्याच्या अंगठ्या गायब केल्या व तिथून तो पसार झाला याबाबतची फिर्याद कृष्णा आप्पाजी डोंगरे (रा. भादवण ता. आजरा) यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

छाया वृत्त : –

खा.राहुल गांधी यांच्याबाबत केंद्र सरकार सूड भावनेने वागत असल्याचा आरोप करत आजरा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या निषेध मोदी सरकारचा निषेध करताना गोकुळच्या सांचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर,नगरसेवक किरण कांबळे,अभिषेक शिंपी,अशोक पोवार, विक्रम पटेकर, नौशाद बूड्डेखान,विश्वास जाधव,अमित खेडेकर,मंजूर मुजावर,जुबेर सोनेखान व अन्य कार्यकर्ते






