mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्याराजकीय

चांदेवाडी येथे मारामारीत एक जखमी… सुतार दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंद…

चांदेवाडी येथे मारामारीत एक जखमी…

सुतार दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा नोंद

 

घराशेजारी असणाऱ्या सामायिक बोळाच्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन चांदेवाडी (ता. आजरा ) येथील शंकर विष्णु सावरतकर (वय वर्ष 70) यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी धोंडीबा गोविंद सुतार व सौ. चंद्रकला धोंडीबा सुतार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की शंकर सावरकर व सुतार परिवार एकमेकाशेजारी राहतात त्यांच्या घरांमध्ये असणाऱ्या बोळावरून दोघा कुटुंबीयांमध्ये वाद आहेत. मंगळवार दिनांक  2 ऑगस्ट रोजी सुतार कुटुंबीय हा बोळ काठ्या व पत्र्यांचा सहाय्याने कुंपण करून बंद करत होते. याच वेळी सावरतकर यांनी यावर आक्षेप घेऊन सदर बोळाबाबतचा कोर्टाचा मनाई आदेश आहे असे सांगत असताना धोंडीबा याने त्यांच्या डोक्याच्या मध्यभागी दगड मारून त्यांना जखमी केले. तर त्यांच्या पत्नी सौ. चंद्रकला हिने हाताने ओरबडून शिवीगाळ करून त्यांना धमकी दिली. यामध्ये सावरतकर हे जखमी झाले आहेत.

सावरतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात सुतार दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

……

 

अण्णा-भाऊनी काढलेल्या संस्था डॉक्टर देशपांडे यांनी नावारूपास आणल्या : माजी मंत्री भरमुअण्णा पाटील

डॉ. अनिल देशपांडे यांचा वाढदिवस उत्साहात

जिद्दीच्या जोरावर स्व. काशिनाथ अण्णा चराटी व स्व. माधवराव देशपांडे यांनी काढलेल्या संस्था डॉ. अनिल देशपांडे व अशोक चराटी आणी त्यांच्या सहकाऱ्यानी नावारूपास आणल्या आहेत.देशपांडे हा सुसंस्कृत परिवार आहे.या कुटुंबाचे तालुक्याच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे ,असे प्रतिपादन माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांनी केले.आजरा अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्तावीक विजयकुमार पाटील यांनी केले. डॉ.देशपांडे यांचा माजी  मंत्री भरमूअण्णा पाटील, आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी घराची व मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक  सत्कार करण्यात आला.

यावेळी भरमुअण्णा म्हणाले,डॉ.देशपांडे व चराटी यांच्यासारख्या मंडळींमुळे विकासाचे प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे आजरा तालुका आदर्श बनेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी व्यवसाय व समाजकारणाची सांगड घालण्याचे काम डॉ.देशपांडे यांनी केले असल्याचे गौरवोदगार काढले.तर अशोकआण्णा चराटी यांनी सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक दिलदार सहकारी आपणाला मिळाला असल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना डॉ.देशपांडे म्हणाले,अण्णा भाऊंच्या पश्चात त्यांचा वारसा सक्षमपणे चालविण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे.तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अशोकआण्णा यांनी यांच्या टेक्स्टाईल क्लस्टर उभा करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

आपल्या एकसष्टीनिमित्य यापुढे सर्व आजी – माजी सैनिकांना आपल्या रुग्णालयात मोफत उपचार करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी प्रा.विजय बांदेकर,प्रकाश वाटवे, कृष्णा येसणे,डॉ. संदीप देशपांडे,सौ.सौम्या तिरोडकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम प्रसंगी डॉ. अंजनी देशपांडे,  डॉ. दीपक सातोस्कर, सुरेश डांग, रमेश  कुरुणकर, संजयभाऊ सावंत, दिगंबर देसाई, रमेश रेडेकर, मारुती मोरे,सौ.मिनल होळणकर, कांचनताई, विलास नाईक,दशरथ अमृते, अभिषेक शिंपी, किरण कांबळे, प्रकाश कोंडुसकर, वृषाली कोंडुसकर, योगेश पाटील, राजू पोतनीस प्रशांत गंभीर, शशिकांत सावंत, सचिन इंजल,सौ. प्रणिता केसरकर, जनार्दन टोपले, किशोर भुसारी, शैला टोपले,जी.एम.पाटील, नारायण मुरकुटे, आय. के. पाटील, अनिकेत  चराटी, संभाजीराव इंजल, वसंतराव देसाई( कानोली) रामचंद्र पाटील (इटे), श्रीमती मंगल शेवाळे, अमोघ वाघ, मारुती घोरपडे,संजय चव्हाण, सौ. शामली वाघ, विश्वासराव देसाई, गिता पोतदार,सौ.मनीषा कुरुणकर, सचिन सटाळे,डॉ.प्रवीण निंबाळकर, बंडोपंत चव्हाण,डॉ.सुरजित पांडव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.अशोक बाचुळकर यांनी केले.आभार भैय्या टोपले यांनी मानले.

 

 

संबंधित पोस्ट

चिमणे येथील एकाचा चिकोत्रा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

mrityunjay mahanews

सर्फनाला प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले…. आजऱ्यात विविध संघटनांच्या वतीने विजयी रॅली

mrityunjay mahanews

एरंडोळ येथे महिलेची आत्महत्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चाफवडे येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू…विवाहितेच्या छळप्रकरणी खेडगे येथील पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!