
सौ.शशिकला रक्ताडे यांचे निधन
आजरा येथील सौ. शशिकला बाळासाहेब रक्ताडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने शुक्रवारी पहाटे निधन झाले.निधनसमयी त्यांचे वय ५८ वर्षे होते.
रक्ताडे दाम्पत्य आठ दिवसापूर्वी राजस्थान सहलीकरीता गेले होते. दरम्यान जयपुर येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले असता गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. उपचाराकरिता दवाखान्यात नेत असतानाच त्यांचे शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. सौ. रक्ताडे या आजरा तालुका मराठा महासंघाच्या कार्यकारिणी सदस्य व आजरा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रा. बाळासाहेब रक्ताडे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी,मुलगा असा परिवार आहे.

आज-यात उपसरपंचपदासाठी बिनविरोधला प्राधान्य
आजरा तालुक्यात उपसरपंचपदासाठी कोरीवडे, बहिरेवाडी,सरंबळवाडी ग्रामपंचायती वगळता बहुतांश गावात उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.
आजरा तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या पैकी चाफवडे, लाटगाव, पोळगाव, पारपोली, आवंडी या ग्रामपंचायती बिनविरोधी झाल्या. ३६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. यामध्ये कोरीवडे व पेंढारवाडी या ग्रामपंचायतीसाठी काठावर बहुमत असल्याने मोठी चुरस होणार असे चित्र होते. शेळप, किटवडे येथे उपसरपंच निवडीत बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांच्या भूमिका महत्वाची ठरणार आहे.
नूतन उपसरपंचाचे नाव व कंसात ग्रामपंचायतीचे नाव…
उषा नावलकर (साळगाव), राहुल कातकर (खेडे) सुधा कांबळे (दाभिल), वसंत कोंडूसकर ( सोहाळे) सदाशिव हेब्बाळकर (कोळींद्रे), आनंदा राणे (खानापूर), नम्रता तळेकर (चाफवडे) रोंगु कोकरे (आवंडी) स्वप्नील आरदाळकर (कानोली- हारुर), समिक्षा देसाई (उत्तूर), नामदेव जाधव (झुलपेवाडी), विदयाधर गुरव (आरदाळ), शिवाजी लोकरे (धामणे), तुकाराम कुंभार (वझरे), संजय आजगेकर (पेंढारवाडी), दत्ता मिसाळ (बहिरेवाडी), चंद्रकांत खोत (मासेवाडी), सतीश उंचावळे (होन्याळी), संजय पाटील (भादवण), सुशांत गुरव (मडिलगे), जयवंत शिंदे (वडकशिवाले), प्रशांत कोटकर (हाजगोळी खुर्द), रणजित सरदेसाई (लाटगाव), कृष्णा परीट (भादवणवाडी), जयश्री पाटील (सूळेरान), उदय सरदेसाई (चितळे). अस्मिता पंडीत (हाजगोळी बुद्रक), महादेव पाटील (गजरगाव), राजेश देसाई (श्रृंगारवाडी -उचंगी), संजय सुतार ( पोळगाव), शिवानंद पाटील (लाकूडवाडी), रक्माजी पाटील (किटवडे),प्रकाश कविटकर(पारपोली),बाजीराव देवरकर (सरंबळवाडी)श्रीकांत नार्वेकर(शेळप)

इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या हस्ते लोकशाहीर गव्हाणकर पुरस्काराचे वितरण होणार
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या शाहिरीने सर्वदूर नेणारे लोकशाहीर द. ना गव्हाणकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यावर्षी कॉ. कृष्णा मेणसे यांना सुप्रसिध्द इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. डॉ जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाची पुनर्मांडणी करून मराठ्यांचा सत्य इतिहास ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पहिल्यांदा उजेडात आणला.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महराज, राजाराम महाराज यांच्यासह महाराणी ताराबाई यांच्या कर्तुत्वाची ऐतिहासिकता पुढे आणली.
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या डॉ. जयसिंगराव पवार यांनी अत्यंत जिद्दीने आणि परिश्रमाने इतिहास संशोधक हि आपली ओळख निर्माण केली. मराठ्यांच्या इतिहासाची फेरमांडणी करतांना यापूर्वी ज्या इतिहासकारांनी चुकीच्या पध्दतीने मराठा इतिहास लिहिला होता तो त्यांनी आपल्या संशोधनातून खोडून काढला. राजाराम कोलेज मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी इतिहास संशोधक म्हणून त्यांची निवड झाली. शिव छत्रपती एक मागोवा, छत्रपती संभाजी एक चिकित्सा, मराठ्यांचे स्वातंत्र्य युध्द, शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे हे त्यांचे महत्वपूर्ण ऐतिहासिक ग्रंथ आहेत.
राजर्षी शाहू राजांच्या कार्याचा आढावा घेणारा १२०० पानांचा त्रिखंडात्मक चरित्रग्रंथाची निर्मिती करून शाहू राजांच्या कर्तुत्वाचा नेमका वेध त्यांनी घेतला आहे. डॉ अप्पासाहेब पवार या आपल्या गुरूंच्या विनंतीवरून केवळ १ रुपया मानधनावर त्यांनी शाहू संशोधन केंद्राची जबाबदारी आठ वर्षे त्यांनी सांभाळली. अखिल भारतीय मराठी इतिहास परिषदेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
या कार्यक्रमाला आ. हसन मुश्रीफ, आ. प्रकाश आबिटकर, आ.राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

🔴चिंताजनक ! कोरोनाच्या संकटात बर्ड फ्लूचा कहर ; ‘या’ राज्यात १८०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

♦️कोरोना महामारीच्या दहशतीमध्येच बर्ड फ्लूमुळे आता लोकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे १८०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील सरकारी पोल्ट्री सेंटरमध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे १८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरकारी कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूच्या व्हायरसचा H5N1 प्रकार आढळून आला आहे. हे केंद्र जिल्हा पंचायतीमार्फत चालवले जाते. अधिकाऱ्याने सांगितले की, केरळच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत नियमांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पशुसंवर्धन मंत्री जे चिंचू रानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने केलेल्या प्रोटोकॉलनुसार बर्ड फ्लूचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. प्राथमिक तपासणीत सरकारला बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, व्हायरसचा नमुना अचूक चाचणीसाठी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
ज्या सरकारी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूमुळे 1800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता, तिथे 5000 हून अधिक कोंबड्या होत्या. आता उरलेल्या कोंबड्याही नष्ट करण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शासनाच्या समन्वयाने आजार रोखण्यासाठी तयारी सुरू आहे. यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Source:-
https://chat.whatsapp.

छाया वृत्त

आजऱ्यात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
…………..

पंडीत दीनदयाळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.




