
सर्फनाला प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले.
गेले सहा महिने केवळ बैठका होतात पण पुनर्वसनाचे प्रश्न मात्र तसेच असल्याचा आरोप करत आज प्रकल्पग्रस्तानी मोर्चाने जाऊन सर्फनाला धरणाचे काम आज बंद पाडले.
दि १७ नोव्हेंबर २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्फनाला प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत प्रलंबीत प्रश्न सोडविण्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरला. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील संघटनेने ३० डिसेंबर रोजी निवेदन दिले होते. या निवेदनात ९ जानेवारीपर्यंत प्रलंबित प्रश्न बैठक घेऊन न सोडविल्यास धरणाचे काम बंद करू असे कळविले होते.
प्रकल्पग्रस्तानी निवेदन देऊनही त्याची जिल्हाधिकारी कार्यालय अथवा पाटबंधारे विभागाकडून गांभीर्याने दखल न घेतल्याने स्पष्ट करत धरणाचे काम बंद करण्यासाठी आज धरणावर प्रकल्पग्रस्त स्त्री पुरुष मोठ्या संख्येने जमले.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई म्हणाले, प्रशासन आम्हाला जर गांभीर्याने घेणार नसेल तर आम्ही शांततेच्या मार्गाने संघर्ष करू. आधी पुनर्वसन मगच धरण हा कायदा आम्ही लढून तयार केला आहे. आम्हांला कोणाची भीक नको आमचा अधिकार हवे आहेत. त्यामुळे आमची लढाई ही न्यायाची आणि हक्कासाठीची आहे. प्रकल्पग्रस्तानावर दडपशाही करून रेटून धरणाचे काम जर कोणी करू पाहत असेल तर ते या तालुक्यातील कष्टकरी जनता कदापिही सहन करणार नाही. चित्री प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन लढ्याने महाराष्ट्राच्या धरणग्रस्त चळवलीला एक आदर्श घालून दिला आहे.आज आम्ही धरणाचे काम बंद केले आहे. आता धरणग्रस्तांच्या परवानगीशिवाय काम पुन्हा चालू होणार नाही. जोपर्यंत धरणस्थळावर जिल्हाधिकारी यांचे उपास्थितीत बैतक होऊन पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम ठरत नाही तोपर्यंत धरणाचे कोणत्याही प्रकारचे काम आम्ही करू देणार नाही असेही सांगितले.
यावेळी अशोक मालव, नारायण भाडंगे, दशरथ घुरे, संतोष पाटील, अमरसिंह ढोकरे यांनीही मनोगते व्यक्त केली. त्यानंतर प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने मोर्चाने धरणावर आले. त्यांनी धरणाचे चालू असलेले काम बंद करण्यास भाग पाडले.
आंदोलन प्रसंगी प्रकाश शेटगे, गोपाळ ढोकरे, प्रकाश कविटकर, निवृत्ती शेटगे, हरी सावंत, कुंडलिक शेटगे, निवृत्ती पाटील, ज्ञानेश्वर गुंजाळ यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
दुचाकीने घेतला अचानक पेट
आजरा येथील घटना

आजरा – आंबोली मार्गावर हॉटेल समोर पार्किंग केलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने दुचाकी जळून खाक झाले आहे यामध्ये सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रकांत मारुती शिंदे हे आपली मोटरसायकल हॉटेल हर्ष समोर उभी करून हॉटेलमध्ये गेले होते. दरम्यान अचानक मोटर सायकलने पेट घेतला यामुळे आंबोली मार्गावरील इतर वाहन चालकात धावपळ उडाली.
अल्पावधीतच मोटरसायकल जळून खाक झाली.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

गिरणी कामगारांचा पुनर्वसनाचा संघर्ष लढा मजबूत करू काॅ.उदय भट

इंग्रजांनी वस्त्र उद्योगासाठी मंबईत कापड गिरणी ची उभारणी केली असली तरी हक्कासाठी गिरणी कामगार संघटीतपणे सातत्याने लढत राहीला आहे. शासनाने व्यवसायासाठी गिरणी मालकाना लिजवर मोफत जमिनी दिल्या. मुंबईतील कापड व्यवसाय भरभराटीला असताना मुंबईचे शांघाय करण्याच्या नादात गिरण व्यवसाय मोडकळीस आणून गिरणी कामगाराना देशोधडीला लावले, त्या जागेवर मालकांच्या बरोबर गिरणीकामगारांचा अधिकार हा कामगारांनी लढून मिळवलेला हक्क आहे. आम्ही गिरणीच्या जागेत खोली मागण्यासाठी लढत नसून, आमच्या हक्काच्या पुनर्वसनासाठी संघर्ष लढा देण्याचा मनोदय काॅ. उदय भट यांनी गिरणीकामगार मेळावात व्यक्त केला.
आजरा येथील जे पी नाईक सभागृहात गिरणीकामगार मेळावाच्या अध्यक्ष स्थानी काॅ. अतूल दिघे होते. प्रास्ताविक व स्वागत काॅ.शांताराम पाटील यांनी केले यावेळी काॅ.उदय भट पुढे म्हणाले , गिरणीकामगार आता वयस्कर झाले आहेत, काही हयातीत नाहीत , त्यांच्या वारसाना हक्क मिळणार आहे. गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठीची यादी अद्ययावत करणे तसेच वारसांच्या माहिती फाॅर्म भरून घेण्यात येत आहेत. राजकीय पक्षाचे वारसदार, उद्योगपतीचे वारसदार मुलगा, नातू , पणतू पुढे येत आहेत. त्या प्रमाणे मंत्री चंद्रकांत पाटील मी गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून सांगतात तर गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सहकार्य केले पाहीजे. गिरणी कामगार हा सगळ्याचा बाप आहे, तो संयुक्त महाराष्ट्र सह वेगवेगळ्या चळवळीत आघाडीवर आहे. तो जाती धर्माच्या पलिकडे लाल बावट्या मध्ये संघटित आहे.हाच आमचा मानवता धर्म आहे.
यावेळी काॅ.अतूल दिघे यांनी गावागावात गिरणी कामगारांच्या वारसाचा ग्रुप तयार करून त्यांना गिरणीकामगार संघर्ष लढा समजून देणे आवश्यक आहे.यासाठी वारसांचे फाॅर्म भरणे सुरू आहे हा लढा तीव्र करण्यासाठी १८ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी काढण्यात येणा-या मोर्चात सामिल होण्याचे आव्हान केले.
यावेळी उपस्थित शांताराम हारेर, नारायण भंडागे, निवृत्ती मिसाळ, मनप्पा बोलके, विजय पाटील, विठ्ठल बामणे, जानबा धडाम, हिंदूराव कांबळे, गोपाळ रेडेकर, आबा पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने गिरणीकामगार उपस्थित होते, आभार काॅ. संजय घाटगे यांनी मांडले.

आजरा हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जनता एज्युकेशन सोसायटी संचालित आजरा हायस्कूल आजरा ने शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अभूतपूर्व यश मिळविले. महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व उच्च माध्यमिक (आठवी) पुणे यांच्यामार्फत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आजरा हायस्कूल आजरा चे तब्बल २६ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. तालुक्यामध्ये सर्वाधिक शिष्यवृत्ती धारक विदयार्थी असण्याचा मान आजरा हायस्कूल आजरा ने पटकावला .इयत्ता पाचवी चे राज्यामध्ये दोन विद्यार्थी चमकले व इयत्ता आठवीचे राज्यामध्ये चार विद्यार्थी चमकले याबरोबरच जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पाचवी चे सात व इयत्ता आठवीचे १९ विद्यार्थी पात्र ठरले.
इयत्ता पाचवी-_प्रशांत प्रदीप पारपोलकर गुण(२९०) राज्यात ४ था , अक्षरा सर्जेराव पाटील गुण( २८४) राज्यात ८ वी ,जिल्हा शिष्यवृत्तीधारक वेदिका विजय पोतदार गुण (२७६) , श्रुती धनाजी कुंभार गुण(२६८) , तन्मय उदयसिंग सरदेसाई गुण(२६८)
नवेली दामोदर यादव गुण(२५८), अथर्व कृष्णा वांद्रे गुण(२५२) याना मोलाचे मार्गदर्शन श्रीम मनिषा कांबळे , सौ वृषाली यादव, सौ. वैजयंता अडकुरकर, किरण कांबळे यांनी केले.
इयत्ता आठवी. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किरण उमाजी कुंभार गुण(२७८) राज्यात ५ वी, सई संजय भोसले गुण(२७४) राज्यात ७ वी , प्रेरणा बाळासो लवटे गुण(२७२) राज्यात ८ वी ,निशांत शशिकांत सुतार गुण ( २६८) राज्यात १० वा तसेच जिल्हा शिष्यवृत्तीधारक आर्यन तुकाराम कांबळे गुण(२६०) , गजाला इरफान बागवान गुण(२५८) , शर्वरी रवींद्र देसाई गुण (२५६), मधुरा प्रदीप पारपोलकर गुण (२५४) , संचिता श्रीधर कुराडे गुण(२५२) , समीर कृष्णा वरेकर गुण(२५०) , आदित्य बाळू येसणे गुण(२४८) , अंजली महेश केसरकर गुण(२४२), सोहम सचिन इंजल गुण (२४०), वृंदा राहुल कुंभार गुण(२३८), संचिता संभाजी हसबे गुण (२३६), श्रीशांत उदय सरदेसाई गुण (२३८) , प्रथमेश वामन सामंत गुण (२२६) , अभिनंदन सुभाष बुरुड गुण (२२४) , हर्षवर्धन युवराज येसणे गुण(२१८) , यांना राहुल पाटील, सौ सुधा पाटील, सौ भाग्यश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले.

निधन वार्ता
मामू सोनेखान

नाईक गल्ली,आजरा येथील आजरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य खुदबुद्दीन उर्फ मामु महंमदसाब सोनेखान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन विवाहित मुली,नातवंडे असा परिवार आहे.




