शूक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४

मनोमीलनावर आज होणार शिक्कामोर्तब…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले काही दिवस राधानगरी सह कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळाचे अशोकअण्णांच्या विधानसभा निवडणुकीमधील भूमिकेकडे लक्ष लागून होते. अखेर अशोकअण्णा चराटी यांनी कागल मतदार संघात मंत्री हसन मुश्रीफ व राधानगरी मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असून आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये हा निर्णय अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार आहे.
अशोकअण्णा चराटी यांच्या संस्था समूहाला आजारा तालुक्यामध्ये मानणारा मोठा गट आहे. या गटाच्या भूमिका वेळोवेळी निर्णायक ठरत आल्या आहेत. यामुळेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या गटाची भूमिका काय राहणार याकडे तालुक्यासह दोन्ही मतदारसंघाचे लक्ष लागून होते. चराटी यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ही त्यांनी यापूर्वीच मेळाव्यातून स्पष्ट केला आहे.यामुळे अशोक अण्णांच्या निवडणुकीतील भूमिकेविषयी चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
‘मृत्युंजय महान्यूज’चे वृत्त खरे ठरले…

१७ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘मृत्युंजय महान्यूज ‘ ने मंत्री मुश्रीफ व अशोकअण्णा यांचे मनोमिलन होणार याबरोबरच चराटी गट आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते. इतर राजकीय अंदाजाप्रमाणे यावेळीही हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. यामुळे या वृत्ताची जोरदार चर्चा अद्यापही सुरू आहे.
समाज एकत्र येऊनच निर्णय घेणार…
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बैठकांच सत्र सुरूच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
समाज म्हणून सर्व मुस्लिम बांधव एकसंघ आहेत. समाजाने काय करावे हे कोणी नेत्यांनी सांगण्याची गरज नाही. निवडणुकीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारी यंत्रणा सक्रिय झालेली दिसते. आज मुस्लिम समाज हा एकसंघ असून त्यामध्ये हे तेढ निर्माण करू नयेत अशी आमची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व समाज एकत्र येऊनच निर्णय घेईल. अशी माहिती नुकत्याच झालेल्या पत्रकार बैठकीमध्ये समीर चॉंद, बशीर दरवाजकर, सलिम लतीफ, फिरोज पटेल, नौशाद माणगावकर आदींनी दिली.
गेल्या आठवडाभरात झालेल्या पत्रकार बैठकांच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एक वेळ काही कार्यकर्त्यांची पत्रकार बैठक पार पडली.
बैठकीमध्ये समाजाला बदनाम करणाऱ्यांना या निवडणुकीत निश्चितच त्यांची जागा दाखवू. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी मुस्लिम समाजालाही समजू लागल्या आहेत. लोक जागृत झाले आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संविधानाच्या विरोधात कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. समाज म्हणून सर्वजण एकत्र येऊनच विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस रमीज लमतुरे, इमरान तकीलदार, रियाज मुजावर, करीम बागवान यांच्यासह मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.

वयाच्या ५९ व्या वर्षी केले माउंट एवरेस्ट सर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हांदेवाडी तालुका आजरा येथील प्रकाश बाबुराव जाधव यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले.
सहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोंबर या कालावधीत त्यांनी सदर पराक्रम केला.यापूर्वी चीनमधील कैलास मानसरोवर, उत्तराखंड मधील आदी कैलास, हिमालय मधील महादेव, किन्नर कैलास, मणी महेश, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, अमरनाथ अशा कठीण यात्रा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील वैष्णोमाता दर्शनाला सलग १७ वर्षे जाण्याचं विक्रम ही त्यांनी केला आहे. त्यांच्या या उपक्रमाबाबत त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

मसोलीत पुन्हा हत्तींचा धुमाकूळ सुरू…
शेती पिकांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मसोली येथे हत्तीचे आगमन झाले असून हत्तीने गेल्या चार दिवसांमध्ये मोठा धुमाकूळ घालत भात व ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
गेले काही दिवस मसोलीपासून बाजूला असणाऱ्या हत्तीचे पुन्हा एक वेळ मसोली परिसरात आगमन झाले आहे. संजय होडगे, जयसिंग होडगे, मारुती गुरव, सुरेश होडगे, जयसिंग कांबळे,आदींच्या शेती पिकामध्ये धमाकूळ घालत हत्तीने भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
एकीकडे अवकाळी पावसाला वैतागलेल्या शेतकऱ्यासमोरील संकटामध्ये सापडला आहे.

निधन वार्ता
ईश्वर जाधव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील आजरा कारखान्याचे माजी संचालक व दौलत कारखान्याचे कर्मचारी ईश्वर रामू जाधव यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तीन मुली आहेत.

अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठात शिक्षण ! फलटणच्या कारखान्याची जबाबदारी !! विद्या प्रतिष्ठाणचे खजिनदार !!!
कोण आहेत युगेंद्र पवार?

बारामती कोणाची ? घरातील सर्वात ज्येष्ठ शरद पवारांची? की वेगळी चूल मांडणाऱ्या अजित पवारांची? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बारामतीकरांनी या आधी लोकसभेला ईव्हीएमचं बटण दाबलं होतं. आणि आता पुन्हा एकदा बारामतीकरांना त्यांचा राजकीय कैवारी म्हणून कोणत्या पवारांना विधानसभेत पाठवायचं? हे ठरवायचंय.
होय…चर्चा आता चर्चा राहिलेली नाही. ती खरी ठरलीय. बारामतीत अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार उभे राहिलेत. बारामतीतून अजित पवारांऐवजी त्यांचे पुत्र जय यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत अजितदादांनीच तशी वक्तव्य केली. मात्र त्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आता अजित पवार बारामतीतून विधानसभा लढताहेत. अजितदादांच्या नावाची घोषणा होईपर्यंत शरद पवारांनी देखील पत्ता उघड केला नव्हता.
लोकसभेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी जरी उमेदवार असल्या, तरी खरी लढाई ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात होती. आणि ही लढाई शरद पवारांनी जिंकली. आता तर स्वतः अजित पवार मैदानात आहेत. आजवरचा विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला, तर नावाप्रमाणे दादा बारामतीत अजितच राहिले आहेत.
युगेंद्र पवार कोण आहेत?
युगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. जन्म तारीख – 22 एप्रिल 1991 रोजी झालाय. अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचं शिक्षण घेतलंय. ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार आहेत.
अजितदादांची कारकिर्द –
अजित पवार 1991 पासून सलग सातवेळा बारामतीची आमदार आहेत. पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी अजित पवारांची 30 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. अजित पवारांचा हा बायोडाटा वाचल्यानंतर कोणता? नवखा उमेदवार बारामतीच्या आखाड्यात उतरेल. पण हे धाडस करणार आहे युगेंद्र पवार..कारण त्यांचा गॉडफादर शरद पवार आहेत. शरद पवार काय चीज आहे हे अजितदादांनाही माहिती आहे… आणि अजितदादा किती बडी आसामी आहे हे शरद पवार देखील चांगलेच ओळखून आहेत..म्हणूनच यंदाच्या बिग फाईटमधली सर्वात टॉपवर बारामती असणार आहे. आता शरद पवारांनी अजितदादांविरोधात ज्या नातवाला उतरवलंय, त्या युगेंद्र पवारांविरोधात जाणून घेऊयात
शरद पवार असो किंवा अजित पवार या दोघांसाठी यंदाची बारामतीची निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे? हे शब्दात सांगणं कठीणच नव्हे तर अशक्य आहे. आता लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजितदादांनी कोणती रणनीती आखली आहे. आणि अजितदादांना पराभवाचा चेहरा दाखवण्यासाठीशरद पवार कोणता डाव टाकणार? याकडे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या राजकीय पंडिताचं लक्ष असेल.
(viral news…online news)
लवकरच आपल्या सेवेत... आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



