

पेद्रेवाडी येथे महिलेचा विनयभंग…

आजरा:मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा
पेद्रेवाडी ता आजरा येथे महिलेचा विनयभंग करण्यात आला.याबाबत स्थानिक दोघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पिडीत महिला घरी असताना दोघांपैकी एकाने तुझे कोणासोबत अफेअर चालु आहे याची चर्चा मुंबईमध्ये चालू असल्याचे सांगितले. त्यावेळी पिडीत महिलेने माझी कोण चर्चा करते त्यांची नावे सांग असे विचारत असताना त्याने पिडीतेचा डावा हात पकडुन आपले जवळ खेचले.
पिडीतेच्या अंगाशी झोंबा झोंबी करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्याला घाबरुन ढकलून दिले तेव्हा तो तेथुन निघुन गेला. पती घरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा पिडीतेसह पतीने जाब विचारला आसता दुसऱ्या संशयिताने तु काय लायकीची आहेस मला माहित आहे तु तुझ्या घरी जा असे म्हणून बदनामी केलेबाबतची फिर्याद पिडीतीने दिली आहे.
सहाय्यक फौजदार बंदी अधिक तपास करीत आहेत.
मुंगूसवाडी मारामारी प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुंगूसवाडी ता. आजरा येथे होळी दिवशी झालेल्या मारामारी प्रकरणी पोलिसांनी बबन नारायण कोंडुसकर व आकाश बबन कोंडुसकर यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.

वाहतुकीस अडथळा होणारी वाहने हलवा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर-बांदा या महामार्गातील आंबोली रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होणारी वाहने हलवणेबाबतची मागणी अन्याय निवारण समितीने निवेदनाद्वारे आजरा पोलीस स्टेशनचे सपोनि नागेश यमगर यांच्याकडे केली आहे.
सध्या संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. बहुतांशी ठिकाणचे काम पूर्णही झाले आहे. मयुर पेट्रोल पंप ते आजरा न्यायालय नवीन इमारतीपर्यंत मनमानी पध्दतीने अवजड वाहने, चार चाकी व दुचाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात आहेत. मुळातच महामार्गाचे काम सुरु असताना ही वाहने इतर वाहनांचे वाहतुकीच्यादृष्टीने अडथळा ठरत आहेत.
पोलिसांनी तातडीने याकडे लक्ष देऊन या भागातील अवजड वाहने, चार चाकी व दुचाकी वाहते रस्त्यावर उभी करण्यास प्रतिबंध करावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावरसमितीचे अध्यक्ष परशुराम बामणे , सुधीर कुंभार, उपाध्यक्ष, पांडुरंग सावरतकर, सेक्रेटरी, विजय थोरवत ,गौरव देशपांडे,वाय.बी.चव्हाण, जावेद पठाण,राजू विभूते यांच्या सह्या आहेत.

टोल नाक्याची जागा बदला…
शिवसेनेचे मागणी

मृत्युंजय : महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना संकेश्वर बांदा मार्गावरील टोल नाक्याची जागा बदलण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की, संकेश्वर- बांदा चा राष्ट्रीय महामार्ग व आजरा ते आंबोली या दरम्यान आजरा तालुक्यातील आजरा शहरापासून जवळच असणाऱ्या एम. आय. डी.सी. जवळ टोलचा नाका होणार आहे असे समजते पण या ठीकाणी टोलनाका झाल्यानंतर आजरा तालूक्यातील आजरा ते किटवडे या भागातील स्थानिक नागरीकांना या टोल नाक्याचा नाहक त्रास होणार आहे. कारण आजरा तालूक्यामध्ये आजरा शहर हे एकमेव बाजारपेठ असलेले शहर आहे. त्यामूळे मसोलीपासून किटवडे पर्यंत जवळजवळ १५ गावातील नागरीक आजरा शहरामध्ये बाजारासाठी व शासकिय कामासाठी दररोज ये जा करत असतात. तर एम. आय. डी.सी. येथे टोल नाका झाला तर या सर्व गावातील नागरिकांना या टोलनाक्यावर थांबून त्यांचा वेळ वाया जाणार त्याच बरोबर इतरही त्रास होणार जाहे. त्यामुळे या टोलनाक्याची जागा बदलून ज्या ठिकाणी कोल्हापूर ची हद्द संपते ते किटवडे व सिंधूदूर्ग च्या हद्दीवर हा टोल व्हावा. स्थानिक नागरिकांची मागणी आहे तरी या बाबत संबंधित अधिकारी व आजरा तालुक्यातील नागरीकांची बैठक आजरा तहसिलदार यांच्या दालनात व्हावी.
या निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे , युवराज पोवार शिवसेना तालुका प्रमुख आजरा, राजु रेडेकर शिवसेना चंदगड विधान सभा परिक्षेत्रप्रमुख यांच्या सह्या आहेत.

निधन वार्ता
विजया देशपांडे

मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडे तालुका आजरा येथील श्रीमती विजया बाबुराव देशपांडे (वय ७७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन विवाहित मुली नातवंडे असा परिवार आहे.
खेडे येथील सरपंच व आजरा सूतगिरणीचे संचालक डॉ.संदीप देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत.
अंत्यविधी वडाचा गोंड, आजरा येथे सकाळी ९ वाजता होणार आहेत.
दयानंद कडोली

मृत्युंजय: महान्यूज वृत्तसेवा
आजरा शिवाजीनगर येथील गोवास्थित दयानंद उर्फ धनंजय श्रीकांत कडोली (वय ५१ वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान गोवा येथे रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, वडील असा परिवार आहे. ते गोवा पोलीस दलात कामाला होते.



