



गवसेजवळ १० कोटी ७४ लाखांचा व्हेल माशाची उलटीसदृश्य पदार्थ जप्त

गवसे (ता. आजरा) येथे आजरा पोलीसांनी सापळा रचून ५ संशयितांकडून १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीचा व्हेल माशाची उलटीसदृश्य पदार्थ जप्त केला आहे. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. या पदार्थाचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे.
याप्रकरणी कुडाळच्या पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कुडाळ येथून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यात येणार असल्याची माहीती आजरा पोलीसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी सापळा रुसून सदर पदार्थ ताब्यात घेतला आहे. सदर पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्यास त्याची अंदाजे किंमत दहा कोटी ७४ लाख रुपये इतकी होऊ शकते.
१० कोटी ७४ लाख रुपयांची ही तस्करी मोटरसायकलवरून केली जात होती तर आलिशान चारचाकी मधून पुढील टेहळणी सुरू होती.साध्या सॅकमध्ये हा १० कोटी ७४ लाखांचा मुद्देमाल आढळला. हा पदार्थ उलटी सदृश्य असल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. याची शहानिशा झाल्यानंतरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
पोलिसांनी अकबर याकूब शेख (वय ५१,रा.पिंगोळी, मुस्लिमवाडी ता. कुडाळ,जि.सिंधुदुर्ग),
शिवम किरण शिंदे (वय२३,रा.अभिनवनगर कुडाळ), गौरव गिरीधर केरवडेकर(वय ३३,रा.केरवडे तर्फ माणगांव, ता. कुडाळ),
इरफान इसाक मणियार (वय ३६,रा.गणेशनगर कुडाळ) व फिरोज भाऊद्दीन ख्याजा (वय ५३,रा.कोलगांव, ता. सावंतवाडी) यांना ताब्यात घेतले आहे
सहा.पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस कर्मचारी दत्तात्रय शिंदे, प्रशांत पाटील, विशाल कांबळे, विकास कांबळे, प्रदीप देवार्डे, वनपाल बाळेश न्हावी, जी. एम. नावगेकर यांनी भाग घेतला.






