mrityunjaymahanews
अन्य

तालुका खरेदी  विक्री संघावर सत्ताधाऱ्यांचा झेंडा

तालुका खरेदी  विक्री संघावर सत्ताधाऱ्यांचा झेंडा

आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस आणि घटक पक्षांच्या श्री रवळनाथ विकास आघाडीने शिंपी – चराटी मित्र पक्ष यांच्या परिवर्तन विकास आघाडीवर पंधराशेहेपेक्षा जास्त मतांनी (व्यक्ती सभासद गट व राखीव जागांवर) एकतर्फी विजय मिळवला. खरेदी विक्री संघावरील आपले वर्चस्व सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे…

विकास सेवा संस्था गट :-
अल्बर्ट डिसोझा (४८)                                 विठ्ठलराव देसाई  (५५)                                   दौलती पाटील    (५४)                            महादेवराव पाटील- धामणेकर (५३)           सुनील खोराटे ( ५४  )                         राजाराम पाटील (५३)                          महादेव हेब्बाळकर (५२)

इतर संस्था गटातून उदय पवार हे ८७ मतांसह विजयी झाले आहेत.

व्यक्ती सभासद गट:-
सुधीर देसाई ४७८२
एम. के. देसाई. ४६०८
ज्ञानदेव पोवार. ४३८२
मधुकर यल्गार   ४४२५                                 णपती सांगले   ४४२४                            .      वींद्र होडगे ४३७३

महिला राखीव गट :-

सौ.राजलक्ष्मी देसाई. ५०७२
सौ. मायादेवी पाटील. ४७८८

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी:-

संभाजी तांबेकर. ४८९८

भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी :-

महेश पाटील. ५२२४

अनुसूचित जाती- जमाती प्रतिनिधी:-

गणपती कांबळे  ५०४७

एकूण वैध मते ७६७५

मतमोजणी सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट होत गेले. अपवादात्मक केंद्र वगळता सर्वत्र सत्ताधारी मंडळींचे मतदान वाढून दिसत होते. विशेषतः उत्तूर भागामध्ये सत्ताधाऱ्यांना मतदारांनी चांगली साथ दिली असल्याचेही निकालानंतर स्पष्ट झाले.

प्रमुख पराभूत उमेदवार

या निवडणुकीत अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी, नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी, अनिरुद्ध केसरकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता रेडेकर, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. मनीषा गुरव, आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक बयाजी मिसाळ, आजरा सूतगिरणीचे संचालक डॉ. इंद्रजीत देसाई, जनता बँकेचे माजी संचालक विजय देसाई, उद्योजक उत्तम रेडेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

सत्ताधाऱ्यांचे नेटके नियोजन

सत्ताधारी गटाचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी आघाडीचे सुरुवातीपासूनच नेटके नियोजन केले होते. या उलट निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या शिंपी- चराटी यांना अनपेक्षित रित्या निवडणुकीला सामोरे जावे लागल्याने त्यांना प्रचार यंत्रणा राबवताना चांगलीच कसरत करावी लागली. व याचा फटका निश्चितच मतदानावावर जाणवत होता. आमदार

 हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील निवडणुकीपासून अलिप्त

या निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांनी प्रत्यक्ष प्रचार यंत्रणेत न येता निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केले.

(सविस्तर मतदान आकडेवारी पुढील बुलेटिन मध्ये देत आहोत.)

संबंधित पोस्ट

आज-याचे माजी सरपंच करीम मुल्ला यांचे निधन

mrityunjay mahanews

निंगुडगे येथील श्री. बसवेश्वर विकास सेवा संस्थेत सरपंच कृष्णा कुंभार यांची आघाडी विजयी…अजिंक्य देसाई यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ. दीपक सातोसकर यांचा वाढदिवस उत्साहात

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याकडून चालू हंगामातील संपूर्ण ऊस बिले अदा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!