शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४


गवत कापण्यावरून मारहाण
पेरणोली येथील एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता.आजरा येथे गट नंबर ३३६ मध्ये गवत कापण्याच्या कारणावरून सासुलकर बंधूंमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये शिवाजी दौलू सासुलकर जखमी झाले आहेत .शिवाजी सासुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानोबा भागोजी सासुलकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवाजी व ज्ञानोबा हे दोघेही नात्याने चुलत भाऊ असून गेल्या चार ते पाच वर्षापासून त्यांच्यामध्ये शेत जमिनीचा वाद सुरू आहे. यापैकी शिवाजी सासुलकर हे गवत कापत असताना माझ्या हद्दीतील गवत का कापले ? असा सवाल उपस्थित करत ज्ञानोबा सासुलकर यांनी त्यांना जमिनीवर पाडून काठीने मारहाण करून शिवीगाळ केली अशा आशयाची फिर्याद शिवाजी सासुलकर यांनी दिली आहे.
पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

मुलगी झाली हो …
वझरेत मुलीसह आईची रथातून मिरवणूक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वझरे ता. आजरा येथे शिंदे कुटुंबीयांमध्ये नव्या मुलीचे आगमन झाल्याबद्दल मुलीसह मुलीच्या आईची जंगी मिरवणूक काढून तिचे स्वागत करण्यात आले.
प्रतिभा शिंत्रे (रा. बहिरेवाडी) यांचे वझरे येथील मारुती शिंदे यांच्यात माहेर आहे. त्यांना कन्यारत्न झाले. दवाखान्यातून घरी आणल्यावर शिंदे परिवाराने मुलीचे जोरदार स्वागत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रथ मागवला. तो सजवून गावातून दोघींची सवाद्य मिरवणूक काढली. नागरिकांना साखर-पेढे वाटले. घरापर्यंत मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
मुलीच्या जन्मानंतर बऱ्याच वेळा अनेक कुटुंबीय दु:खी होताना दिसत. परंतु अलीकडे मुलींनीही प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्यास सुरुवात केली असल्याने मुली देखील सासर व माहेरचे नाव उज्वल करताना दिसतात. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.

विधानसभा निवडणूकीत जनतेशी संवाद करूनच भूमिका निश्चित करणार …
महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा उद्या मेळावा…

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघात एकसंघपणे सामोरे जाण्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे चंदगड विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी रविवार दि २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता अनिकेत मंगल कार्यालय येथे मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यात कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद करूनच पुढील निवडणुकीबाबतची भूमिका निश्चित करण्यात येईल.
या मेळाव्याला जयवंतराव शिंपी, प्रभाकर खांडेकर, अशोकराव जाधव, एम.जे.पाटील,फिरोज मुल्ला,संभाजीराव पाटील,अशोकराव तर्डेकर,मल्लिकार्जुन मुगेरी,जुबेर काझी,श्रीमती. अंजनाताई रेडेकर, नितिन पाटील, कल्लापाण्णा भोगण, सोमगोंड आरबोळे, संजय तर्डेकर, दिग्विजय कुराडे, रामदास पाटील,मसणू सुतार उपस्थित राहणार असल्याचे गोपाळराव पाटील, प्रा. सुनिल शिंत्रे, संपतराव देसाई,विनायक उर्फ अप्पी पाटील,अमरसिंह चव्हाण, विद्याधर गुरबे आदींनी स्पष्ट केले आहे

दारूची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर ता. आजरा येथे घोडके मेसच्या शेजारी बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करणाऱ्या उत्तम बंडोपंत घोडके (वय ४२ वर्षे, रा. उत्तूर ता. आजरा) याला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्याकडून दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या व गुन्हा नोंद केला आहे.
याबाबतची फिर्याद गणेश विठ्ठल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी दिली आहे पुढील तपास हवालदार बाजीराव कांबळे करीत आहेत.

जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत रोजरी हायस्कूलचे यश…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर येथे झालेल्या सतरा वर्षे वयोगटाच्या रायफल सेटिंग स्पर्धेत रोजरी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी शेरल अल्बर्ट फर्नांडिस हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तिची या खेळ प्रकारांमध्ये विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
शेरल हिला मॅनेजर फादर मेलविन पायस , प्राचार्य फा. अँथोनी डिसोजा,मुख्याध्यापक श्री मनवेल बारदेस्कर यांचे प्रोत्साहन व क्रीडा प्रमुख श्री संतोष कदम ,पर्यवेक्षक विजय केसरकर व सौ. लक्ष्मी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

रस्त्यावर झाड आडवे…
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्याशेजारील धोकादायक झाडे रस्त्यावर कोसळत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
चित्रा नगर येथे कोसळलेले झाड अखेर या मार्गावरील वाहन चालकांनी पुढाकार घेत बाजूला केले.शिरसंगीचे अनंत सुतार, बुरुडेचे बचाराम व्हन्याळकर यांनी रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
गुरुवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसात सदर झाड कोसळले होते यामुळे वाहतूकदारांना वाहने चालवताना कसरत करावी लागत होती.सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार यामुळे दिसून येत आहे. असून सध्या परतीच्या पावसामुळे ठीक-ठिकाणी झाडे पडली असून यामुळे वाहतूकदारांना त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आज-यात आज मराठी भाषा गौरव समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चैतन्य सृजन व सेवा संस्था, आजरा आणि शिक्षण तपस्वी डॉ.जे.पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था, मर्या,आजरा यांच्यावतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी भाषा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शनिवार दि.१९ ऑक्टोबर २०२४ दुपारी ३.३० वाजता डॉ. दत्ता पाटील प्राचार्य, डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्था सभागृहात सदर कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त...
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



