

बेपत्ता तरुणाचा मृतदेह हिरण्यकेशी नदीपात्रात आढळला

अनिकेत सोमनाथ तेजम या (रा. देवर्डे ता. आजरा) येथील २२ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह आज हिरण्यकेशी नदीपात्रात आढळला.
अनिकेत हा दि. १६ रोजी सकाळी जनावरांचे गोठ्याकडे जावून येतो असे सांगून घरातून निघून गेला होता तो मिळून आला नाही म्हणून त्याचे वडील सोमनाथ धोडींबा तेजम यांनी आजरा पोलीस ठाणे येथे वर्दी दिली होती.
आज दि.२० रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हिरण्यकेशी नदीच्या पात्रात सोहाळे येथील बंधा-याच्या पाण्यात अनिकेत मृत स्थितीत मिळूनआला .
शेतकरी कुटुंबातील अनिकेत याच्या निधनाने देवर्डे येथे हळहळ व्यक्त होत आहे.



आजरा जनता बँकेच्या उत्तूर शाखेचे आज (रविवारी) उद्घाटन…
‘
‘सर्वसामान्यांची बँक’ अशी ओळख असणार्या आजरा तालुक्यातील जनता सहकारी बँकेच्या उत्तूर शाखेचे उद्घाटन आज रविवारी (दि.२१) रोजी दुपारी ११.१५ वाजता माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
यावेळी बोलताना अध्यक्ष देसाई म्हणाले, तालुक्यातील बहुजन समाजाच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या या बँकेच्या सतरा शाखा ठिकठिकाणी कार्यरत आहेत. सुमारे २९ हजार सभासद असणा -या या बँकेचे ११ कोटी ३१ लाख रुपये इतके भागभांडवल असून राखीव निधी २३ कोटी ७० लाख इतका आहे. ३१ मार्च २०२२ अखेर बँकेजवळ २७७ कोटी ६९ लाखांच्या ठेवी तर १२२ कोटी ९१ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. बँकेने सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी यांच्यासह गरजू मंडळींना १८० कोटी रुपये इतके कर्जवाटप केले आहे. ३१ मार्च २०२२ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ४५७ कोटी ९९ लाख रुपये इतका झाला असून नेट एनपीए शून्य टक्के इतका आहे. बँकेचे स्वतःचे डाटा सेंटर व डी.आर.साइट असून तंत्रज्ञानयुक्त सेवा देण्याकरिता सुसज्ज असा आय.टी. विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागाद्वारे विविध प्रकारच्या बँकिंग सेवा एकाच छताखाली सभासद व ठेवीदारांना पुरवल्या जातात.

बँकेकडे ई पेमेंट सुविधाही उपलब्ध आहे. या त् मोबाइल बँकिंग, आर.टी.जी.एस. एन.ई.एफ.टी. आय.एम.पी.एस. ही रिसायकल एटीएम मशीन, पॉज, फास्टॅग, सी.टी.एस. चेक सुविधा मायक्रो एटीएम ,एस. एम. एस. बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घरबांधणी, घर दुरुस्ती, घर खरेदी, प्लॉट खरेदी याकरिता अल्प दरात कर्जपुरवठा करण्याबरोबरच नोकरदार वर्गास पगार तारणावर बँक सुलभ कर्ज उपलब्ध करून देते. कार लोन, टू व्हीलर, वाहन तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोने तारण कर्ज, मालतारण कर्ज, सरकारी कर्जरोखे, एलआयसी व ठेव तारण कर्ज इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सभासदांचा विश्वास व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे बँकेचा लौकिक दिवसेंदिवस वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील शाखाधिकारी एम.डी. पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.




