सोमवार दि.९ जून २०२५

धनगर वाड्यावरील पहिल्या सैनिकाचे जल्लोषात स्वागत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आवंडी धनगरवाडा क्रमांक १ या धनगरवाड्यावरील विठ्ठल बयाजी येडगे या जवानाचे सात महीन्याचे सेना वायु रक्षा प्रशिक्षण पूर्ण करून गावी आल्यानंतर जंगी स्वागत . वाड्यावरील पहिलाच युवक सैन्यात दाखल झाल्याने प्रत्येकाच्या डोळ्यात कौतुक दाटले होते. त्याच्या आगमनानंतर धनगरवाड्यावर आनंदोत्सव साजरा झाला.
पारंपारिक वाद्यांच्या निनादात, महीलांच्या लेझीम पथकाच्या तालावर विठ्ठलची सजवलेल्या जीप मधून मिरवणुक काढण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते बाबु ठकू येडगे व साहूबाई बाबू येडगे यांचा विठ्ठल नातू तर बयाजी येडगे व धोंडुबाई येडगे यांचा मुलगा. येडगे कुटुंबीय सामाजिक कार्यात कायम अग्रेसर आहे. या कुटुंबाने चित्री धरणग्रस्तांच्या लढ्यात योगदान दिले आहे. या कुटुंबातील व धनगरवाड्यावरील पहिला युवक सैनिकी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करुन आल्याबद्दल ग्रामस्थांना विशेष आंनद होता. त्याचे स्वागत ग्रामस्थांनी उत्साहात केले.
या वेळी झालेल्या कार्यक्रमात गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, कॉ. संपत देसाई, राजू होलम, बी. एम. दरी यांनी त्याला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
हदेशसेवेसाठी युवकांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन केले. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राजाराम पोतनीस, संजय सावंत, युवराज पोवार, आप्पासो पाटील, उद्योजक सुरेश होडगे, वनपाल श्री. लटके, चंद्रकात पाटील, जोतीबा खामकर, सरपंच बयाजी मिसाळ, उपसरपंच कोकरे, ग्रामसेवक सागर केरुळकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. पोतदार यांनी स्वागत, प्रास्ताविक व आभार मानले.

आजऱ्यात आज शिवराज्यभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज सोमवार दि. ९ जून रोजी तिथीनुसार आजरा येथे शिवप्रतिष्ठान व सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी ७.०० वाजता शिवमूर्ती अभिषेक व नित्व पुजन शिवतीर्थ आजरा येथे होईल. सकाळी ८.३० वाजता साखर पेढे वाटप, सकाळी ९.०० वाजता देवदर्शन पदयात्रा प्रारंभ होईल .
शिवतीर्थ येथे देवदर्शन पदयात्रेची सांगता ध्येयमंत्र शिवसुर्यहदय श्लोकाचे सामुहिक पठण करून होईल.

आजरा येथे आज शेतकरी व दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना व युवासेना आजरा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके शेतकरी बांधवांना दुग्ध व्यवसायातील संधी, समस्या व उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
ज्ञसकाळी साडेअकरा वाजता सदर कार्यक्रम सुरू होणार असून या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

निधन वार्ता
ईश्वर सावरतकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चांदेवाडी ता. आजराचे माजी संरपंच व जनता बँकेचे माजी वरीष्ठ अधिकारी यांचे ईश्वर कृष्णा सावरतकर (वय ७० वर्षे ) यांचे शनिवार दिनांक ७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ९ रोजी सकाळी ९.३० वाजता आहे्

छाया वृत्त

डॉ. सुरजीत सुधाकर पांडव यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आजरा तालुका प्रमुख पदी नियुक्तीचे पत्र श्री मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांच्या हस्ते देण्यात आले.

पाऊस पाणी

आजरा व शहर परिसरात सोमवारी पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. गेले आठ दिवस पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी वर्गाने पेरणीपूर्व कामे संपवली आहेत तर कांही ठिकाणी पेरण्याही करण्यात आलेल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

कोरोना अलर्ट…
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे २४ रुग्ण…१३ सक्रिय…९ उपचारानंतर परत घरी… दोघांचा मृत्यू

फोटो क्लिक..




