mrityunjaymahanews
अन्य

मडिलगे यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ

 

मडिलगे यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ..

पावणे चार लाखांचे सोने लंपास

मडिलगे (ता.आजरा) येथील महालक्ष्मी यात्रेत चोरट्यांनी गर्दीचा फायदा उठवत सुमारे पावणे चार लाखांच्या सोन्यावर डल्ला मारला. वेगवेगळ्या ठिकाणी या चोऱ्या झाल्या असून सर्व एसटीतील गर्दीचा फायदा उठवत झाल्या आहेत.

भाविकांच्या तुडुंब गर्दीत पार पडलेल्या मडिलगेच्या यात्रेसाठी आलेल्या रेखा शिवाजी देसाई (रा.सरोळी, ता. आजरा) यांची एसटी प्रवासात पावणे चार तोळ्यांची सोन्याची माळ अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे.

देसाई यांनी यात्रा आटोपून आजरा-गडहिंग्लज बस मधून मडिलगे ते ऐनापूर प्रवास केला.ऐनापूर तिट्यावर आल्या नंतर रेखा देसाई यांना आपल्या गळ्यातील पावणे चार तोळ्याची (सुमारे २ लाख १६ हजार ३२२ रूपये किंमतीची ) सोन्याची लहान मोहन माळ गळ्यात नसल्याचे आढळून आले. अंजना कृष्णा सावंत (रा.वडरगे, ता. गडहिंग्लज) ह्या यात्रा आटोपून गावी जात होत्या. आजरा-गडहिंग्लज एसटीत चढत असताना मडिलगे स्टँडवरच गाडीत चढताना ६१ हजार किंमतीच्या सोन्याच्या माळेची चोरी झाली.

प्रियांका आप्पा पाटील (मुळ गाव एरंडोळ, ता. आजरा, सद्या रा. पनवेल) ह्या यात्रा आटोपून आपल्या एरंडोळ गावी जात असताना ९५ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास केल्या आहेत.

एकूण सुमारे पावणे चार लाख किंमतीचे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.याबाबत आजरा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


बारसू रिफायनरी प्रकल्पविरोधी आंदोलकांच्या अटकेचा श्रमिक मुक्ती दलाकडून निषेध

बारसु रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना व नेत्यांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकार आणि प्रशासनाचा श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने  तीव्र निषेध करण्यात आला आहे.

कोणताही प्रकल्प होतं असताना त्याच्या बऱ्यावाईट परिणामची चर्चा करणे आवश्यक असते. पण तसे न करता रिफायनरीचा प्रकल्प बारसु येथील शेतकऱ्यांच्यावर लादण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न चालू आहे. कोकणाला उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाचा इतका आग्रह का असा सवालही उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला केवळ स्थानिक जनता नव्हे तर महाराष्टरातील कष्टकरी जनता तीव्र विरोध करेल. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधिशी चर्चा करून या प्रकल्पच्या बऱ्यावाईट परिणामांची शास्त्रीय पायावर तपासणी झाल्यानंतर जनतेशी चर्चा करूनच या प्रकल्पचा निर्णय झाला पाहिजे. तत्पूर्वी चालू असलेले सर्व्हेक्षण तातडीने थांबवून आंदोलकांची सुटका झाली पाहिजे. याबाबत निर्णय न झाल्यास श्रमिक मुक्ती दल बारसु रिफायनरी विरोधी लढ्यात सक्रिय सहभाग घेईल याची नोंद घ्यावी असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

संबंधित पोस्ट

रमेश राठोडला लाच घेताना रंगेहात पकडले:महसुलमध्ये खळबळ

mrityunjay mahanews

डॉ. दीपक सातोसकर यांचा वाढदिवस उत्साहात

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेच्या गारगोटी शाखेचे नूतनीकरण व उद्घाटन..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!