सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५

‘मृत्युंजय’कारांचे चरित्र लिहिण्याची गरज : डॉ.सुनिलकुमार लवटे
‘मृत्युंजय’कारांची जयंती उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एखाद्या साहित्यकृतीची पाने अश्रूंचा अभिषेक घालून उलटून जावीत असे साहित्य लेखन ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या लेखणीतून झाले. वंचित शोषित अशा कर्णासह सहकाररत्न विठ्ठलराव पाटील, महाभारताचा प्रमुख नायक श्रीकृष्ण, संभाजी राजे यांच्यावर त्यांनी लिखाण केले. वेगवेगळ्या नायकांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचकांसमोर उभे केले. अशा या प्रचंड प्रतिभाशक्ती असणाऱ्या लेखकाचे चरित्र लिहिणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व थोर विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत जयंती निमित्त संवेदना फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ‘मराठी साहित्यातील मृत्युंजयकारांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. शिवशंकर उपासे होते.
जयंतीच्या पार्श्वभूमीवर व्यंकटराव हायस्कूल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान साहित्य दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये विविध भजनी मंडळांसह लेझीम पथक, पारंपारिक पोशाखातील शाळकरी मुले सहभागी झाली होती.
शिवाजीराव सावंत साहित्य दालनामध्ये साहित्य भिंतीचे दर्शन, मृत्युंजय कादंबरीचे अधिवाचन, एकपात्री सादरीकरण, स्पर्धा पुरस्कार वितरण यासह विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी विलास माळी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिकांचा मेळावा – मुक्त संवाद पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी शेखर बटकडली, ए.के. पावले, संतराम केसरकर ,आण्णाप्पा पाटील, पांडुरंग पाटील, पी. एस. मोहिते, संजय भोसले, दिनकर खवरे, दशरथ पाटील, सौ.वृषाली वाळके, एम.के. गोंधळी, आत्माराम पाटील, सदानंद पुंडपाळ, आनंदा अस्वले, दि.बा. पाटील, लक्ष्मण हेंबाडे, शरद आजरेकर, सौ. आरती लाटणे, यांच्यासह संवेदनाचे सर्व पदाधिकारी, विविध भागातून आलेले साहित्यिक, स्थानिक विविध संस्थांचे पदाधिकारी व साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.

आजरा तालुक्यात ११४ ठिकाणी सार्वजनिक गणपती तर एक ६३ गावात एक गाव एक गणपती

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये ११४ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मुद्द्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून ६३ गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने तालुक्यात गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. यावर्षी पुन्हा एकदा गणराया अवॉर्ड्स् ने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाना गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये प्राधान्याने पर्यावरण पूरक उत्सव, विना डॉल्बी व प्रदूषण मुक्त उत्सव, सामाजिक सलोखा राखणारे विधायक कार्यक्रम, पारंपारिक वाद्यांचा उपयोग इत्यादी निकषांचा वापर करण्यात येणार आहे.
मंडळांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

आजऱ्यात गौरी पूजन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व परिसरात गौरी पूजन उत्साहात करण्यात आले.
माहेर वाशीय गौरीचा मानपान आणि पूजा करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली होती गौरीच्या पूजेसाठी लागणारे मुखवट्यासह इतर साहित्य, भाज्या इत्यादीची मोठी उलाढाल बाजारपेठेत झाली.
गौरी पूजनासाठी रंगीबेरंगी कागद, इमिटेशन ज्वेलरी, फुलांच्या माळा, लायटिंग याची व्यवस्था करण्यात आली होती.
शाळकरी, महाविद्यालयीन मुलींसह महिलावर्ग गौरीपूजनामध्ये गुंतलेला दिसत होता. ठीक ठिकाणी झिम्मा- फुगडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तूर येथे मराठा गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तूर येथील मराठा मंडळाने नागरिकांसाठी विशेष आणि आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वर्षीच्या उत्सवात मंडळाने सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होण्यासाठी विविध स्पर्धांचा समावेश केला आहे.कार्यक्रमात महिलांसाठी “होम मिनिस्टर” स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यासाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर युवकांसाठी भव्य रस्सी खेच (Rope Pull) आणि विविध कला गुण दर्शवण्यासाठी रेकॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांसाठीही भव्य बक्षिसांची सोय करण्यात आली असून, यामुळे सहभागी होण्याचे आवाहन मंडळांनी केले आहे.उत्सवाचे आणखी ठळक वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसाद, तसेच गणेश भक्तांसाठी ५ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकुंद दादा आपटे फाउंडेशन, भूषण नांदवडेकर, तेजस धुरे, महेश करंबळी, शुभम धुरे, दीपक देसाई, विकास चोथे आणि मिलिंद कोळेकर यांचे सहकार्य लाभले.
गणेश दर्शन…
शिवसेना प्रणित जय शिवराय गणेशोत्सव मंडळ आजरा

अध्यक्ष: प्रसाद कांबळे
उपाध्यक्ष: वैभव कुंभार
सचिव: शरद कोरगांवकर
खजिनदार: मुरलीधर दावणे
इंदिरानगर गणेशोत्सव मंडळ उत्तूर
कै.मुकुंदराव आपटे कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, उत्तूर

अध्यक्ष : श्री.विजय जाधव
उपाध्यक्ष : श्री.संतोष शिवणे
खजिनदार : श्री.सुजित कुराडे
सचिव : श्री.सचिन फाळके
नवयुग तरुण मंडळ, मसोली

अध्यक्ष : श्री.तानाजी तेजम
उपाध्यक्ष : श्री.सागर कसलकर
सचिव : श्री.संजय तेजम
खजिनदार : श्री.प्रवीण गुरव
अवधूत कला क्रीडा मंडळ, उत्तूर

अध्यक्ष : दिग्विजय कुंभार
उपाध्यक्ष : हृषीकेश कुंभोजकर
कार्याध्यक्ष : दत्तात्रय केसरकर
खजिनदार : देवदत्त काळगे
सचिव : विशाल बरडे

आज आजऱ्यात…
मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आजरा तहसील कार्यालयासमोरील जागेमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण…

छाया वृत्त…

साळगाव फाट्यावरील वाहतुकीला शिस्त लागणार तरी कधी व येथे दुतर्फा उभा केलेली वाहने हाटणार तरी कधी ? असा सवाल शहरवासीय उपस्थित करत आहेत.




