mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यादेशभारतमहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

रविवार  दि. ३१ ऑगस्ट २०२५   

मंडळांच्या कार्यक्रमात पावसाचे ‘विघ्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यामध्ये पावसाची रिपरीप सुरूच असून पावसामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.

गणेशोत्सव कालावधीमध्ये महाप्रसाद,झिम्मा फुगडी, सोंगी भजन, विविध स्पर्धा, यासह विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी ऐन गणेशोत्सव कालावधीत पाऊस सुरूच असल्याने व मंडपा व्यतिरिक्त अनेक मंडळांकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने कार्यक्रम राबवताना अडचणी येऊ लागल्या आहेत.

यामुळे मोठे खर्चिक कार्यक्रम ठेवताना विचार करण्याची वेळ आली आहे.

लाटगांवातील समाज मंदिरांची कोसळली भिंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

लाटगांव (ता. आजरा) येथील समाज मंदिरांची भिंत कोसळली आहे.

समाजमंदिराचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी येथील समाज बांधवांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.

समाज मंदिरांचे बांधकाम सन १९९६/९७ मधे झाले. याला २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. अती पावसाने तसेच बांधकाम जीर्ण झाल्याने मंदिराच्या समोरील भिंत पडली असून समाज मंदिरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण अधिक असल्याने शिल्लक बांधकाम देखील कोसळू शकते त्यामुळे समाज मंदिरात नव्याने बांधण्याची गरज आहे. ते बांधून मिळावे अशी मागणी विष्णू कांबळे, धोंडीबा कांबळे, विश्राम कांबळे, महादेव कांबळे, संजय जाधव, आप्पा सदू कांबळे, विष्णु कांबळे, आप्पा कृष्णा कांबळे यांच्यासह समाज बांधवांनी मागणी केली आहे.

मृत्युंजय’कारांच्या जयंती निमित्त आजऱ्यात आज विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संवेदना फाउंडेशन च्या वतीने ‘साहित्य संवेदना’ हा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

एकूण तीन सत्रामध्ये विविध कार्यक्रम होणार असून सकाळी आठ वाजता सरस्वती पूजन त्यानंतर पालखी पूजा, व्यंकटराव हायस्कूल येथून साहित्य दिंडी व साहित्य दिंडीची कार्यक्रम होणार आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या सत्रामध्ये ‘मृत्युंजय’ कारांचा वारसा… विचारांचा खजिना… या उपक्रमांतर्गत साहित्य भिंतीचे दर्शन प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन डॉ. सुनीलकुमार लवटे व डॉ. शिवशंकर उपासे यांच्या उपस्थितीत होणार आहे. मृत्युंजय कादंबरीचे अभिवाचन, एकपात्री सादरीकरण, कलेचा वारसा सादरीकरण, मराठी साहित्यातील मृत्युंजयकारांचे योगदान या विषयावर डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे विचार, ‘मृत्युंजय’ कार आजऱ्याची प्रेरणा या विषयावर डॉ. शिवशंकर उपासे यांचे व्याख्यान, स्पर्धा पुरस्कार वितरण, यासह साहित्यिकांचा मुक्त संवाद व मेळावा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्तूरमध्ये पार्किंगची दयनीय अवस्था, नागरिकांना प्रचंड त्रास


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)

उत्तूर परिसरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गावात कुठेही नियोजित पार्किंगची सोय नसल्यामुळे गाड्या भर रस्त्यावर लावल्या जात आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासन मात्र या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

गावात कोणतेही पार्किंगचे नियम लावले गेलेले नाहीत तसेच नागरिकांना वाहन कुठे लावायचे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. परिणामी गाड्या रस्त्यावरच उभ्या रहात असल्याने एसटी बससुद्धा गावात आतपर्यंत येणे थांबले आहे. विशेषत: मेन रोडवरून वाहतूक करणे कठीण झाले असून व्यापारी व ग्राहक या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.सणासुदीच्या काळात ही समस्या आणखी गंभीर होते. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना वाहन कुठे पार्क करायचे हा प्रश्न कायम भेडसावतो.

भरीस भर म्हणून बाहेरगावाहून आलेले नागरिक देखील बेजबाबदारपणे गाड्या उभ्या करताना दिसतात. यामुळे प्रशासनाला समस्येचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी परिस्थिती पाहून पार्किंग करणे आवश्यक असताना, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे आधीच गंभीर असलेली पार्किंगची समस्या आणखीनच वाढत चालली आहे.

किमान मुख्य मार्गासह अडचणीच्या जागी तरी नो पार्किंग झोन करावा अशी सूचना वारंवार गाव सभेत देण्यात आलेली असतानाही ग्रामपंचायतीने यावर ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन नियोजित पार्किंगची सोय करावी व मेन रोडवरील पार्किंग हटवावे, अशी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

शिवसेनेच्या वतीने तबला, मृदंग वादन स्पर्धा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिवसेना ( उबाठा गट) व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज यांच्यावतीने आजरा तालुका मर्यादित तबला, मृदंग वादन स्पर्धा गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृतिदालन येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी दिली.

दोन गटांमध्ये सदर स्पर्धा होणार असून दोन्ही गटातील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी युवराज पोवार, अमित गुरव, दयानंद भोपळे, संदेश कुंभार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पार्वती – शंकर शिक्षण संकुलात हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात श्री. गणेशोत्सवानिमित्ताने उत्तूर व पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदीकुंकू, झिम्मा-फुगडी व वाण वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमातून महिलांमध्ये परस्पर स्नेहबंध वृद्धिंगत झाले.

बालमंदिर मुख्याध्यापिका गौरीनी चाळके यांनी स्वागत केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. माता प्रतिनिधी गीता उत्तुरकर, ऋतुजा चव्हाण, प्रियांका भेंडवळकर, सुप्रिया पन्हाळे, अंकिता लोकरे आदींची उपस्थिती लाभली.

गाण्याच्या नादमधुर ठेक्यावर सासू-सून संवाद, आई-लेक संवाद, मैत्रिणींचे बोलणे, तसेच साधी फुगडी, काटवटकणा, निसरफुगडी, बैठी फुगडी अशा विविध पारंपरिक खेळांचा महिलांनी आनंद लुटला. झिम्मा-फुगडी, उखाणे, महिला लोकगीते असेही रंगतदार सादरीकरण झाले. सुनीता येलकर व वंदना घेवडे यांनी स्वच्छंदी गायनाने कार्यक्रमाला रंगत आणली.

अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी, उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी सुरेश मुरगुडे, डॉ. व्ही. एम. पाकले, प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, विनायक करंबळी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिवणे व माधुरी कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.

जरांगे यांच्या समर्थनार्थ उद्या लाक्षणिक उपोषण


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आजरा तहसील कार्यालयासमोरील जागेमध्ये उद्या सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी दिली.

गणेश दर्शन
भाजी मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आजरा


अध्यक्ष :- आनंदाफडके
उपाध्यक्ष :- उमेश पारपोलकर
सचिव :- रमेश बुरूड
खजिनदार :- रामचंद्र पाचवडेकर

मराठा गणेशोत्सव मंडळ, उत्तूर


अध्यक्ष : विशाल उत्तूरकर
उपाध्यक्ष : अंकुश देसाई
खजिनदार : संतोष कुराडे
सचिव : विनायक उत्तुरकर

श्री.हनुमान तरुण मंडळ उत्तूर


अध्यक्ष : भारत लोखंडे

उपाध्यक्ष : दीपक रावण

खजिनदार : संतोष अमनगी

सचिव : सुहास पोतदार

बाजारपेठ मित्र मंडळ उत्तूर

अध्यक्ष : श्री.प्रविण आमणगी
उपाध्यक्ष : श्री. राहुल धुरे
खजिनदार : श्री.मंदार कोळेकर
सचिव : श्री.शुभम देवरू

 

संबंधित पोस्ट

हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचारी ठार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कै. केदारी रेडेकर यांचा आज स्मृतिदिन… विविध कार्यक्रमांचे आयोजन… निपाणी येथील अपघातात आजऱ्यातील तरुण जखमी… रामा शिंदे यांना मातृशोक… कुमार भवन प्रकरणावरून अधिकारी धारेवर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शाळा बचाव आंदोलन समितीची आजरा तहसीलवर धडक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!