mrityunjaymahanews
अन्य

मुलाच्या हल्ल्यात वडिलांच्या निधनानंतर जखमी आईचेही निधन…

 

मुलाच्या हल्ल्यात वडिलांच्या निधनानंतर जखमी आईचेही निधन…

बहिरेवाडी (ता. आजरा ) येथे मनोरुग्ण मुलाकडून आई वडिलांसोबत झालेल्या वादाचे पर्यवसान आई वडिलांना खुरप्याने मारहाण करण्यात होऊन यामध्ये वडिलांचा मृत्यू तर आई पारुबाई कृष्णा गोरुले (वय ५५)या गंभीर जखमी झाल्या होत्या. काल उपचार सुरू असतानाच तब्बल अडीच महिन्यांनी(शनिवारी रात्री) त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…

कृष्णा बाबू गोरुले(वय ७३) व मुलगा सचिन (वय ४५) यांच्यामध्ये १० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात सचिन याने कृष्णा यांना खुरप्याने केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.तर त्याला अडविण्यासाठी गेलेल्या आई पारुबाई कृष्णा गोरूले या गंभीर जखमी झाल्या होत्या. कृष्णा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात सचिन यांनी स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले होते. पोलिसांनी त्याला घटनेनंतर तातडीने ताब्यात घेतले होते. जखमी आई पारुबाई यांच्यावर गेले दोन महिने उपचार सुरू होते.रात्री त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

ऐन बहिरेवाडी गावच्या लक्ष्मी यात्रेदरम्यान सदर प्रकार घडला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे पुढील तपास करीत आहेत.



शिरसंगी येथे शेततळ्यात पडून शाळकरी मुलाचा मृत्यू

शिरसंगी येथे शेततळ्यात पडून साकेत पाटील या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुखद घटना शुक्रवारी घडली.

साकेत विलास पाटील(७) इयत्ता पहिली मध्ये शिकत होता. ( मुळगाव कुसमळी ता. जि. बेळगाव) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण कृष्णा देसाई यांच्या नर्सरी जवळील शेतातील शेततळ्यात पाय घसरून पडला. त्याच्यासोबत असणाऱ्या मुलाने आरडाओरडा केल्यामुळे जवळ असलेल्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले.

त्याला तातडीने नेसरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पालकांनी सावधता बाळगावी

सध्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे लहान मुले शेततळे, नद्या, बंधारे, विहिरी यामध्ये पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेt. परंतु पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. पाण्याचे आकर्षण असणारी छोटी मुले पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

संबंधित पोस्ट

शासकीय योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वावलंबी बनावे : आमदार प्रकाश आबिटकर…वेळवट्टी येथे हत्तींचा धुमाकूळ.. मेसकाठ्यांसह झाडांचे मोठे नुकसान…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बहिरेवाडी येथील दोन बैलांना ‘लम्पी’

mrityunjay mahanews
error: Content is protected !!