mrityunjaymahanews
अन्य

सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका विवाहित तरुणाचा आकस्मिक मृत्यू.

सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका विवाहित तरुणाचा आकस्मिक मृत्यू…

कुपवाड ता. मिरज येथील ३५ वर्षीय परशुराम शिंदे यांचा गुरुवारी मृत्यू झाल्यानंतर आज पुन्हा एक वेळ आजरा तालुक्यातील गणेशवाडी येथील नितीन कृष्णा धुमाळे या ३२ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जनावरांच्या खरेदी – विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या नितीन यांना शुक्रवार दिनांक १७ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटून ते गणेशवाडी येथील माळावा तलावाजवळ चक्कर येऊन पडले. त्यांना उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

नितीन यांच्या पक्षात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड करून बदनामीचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा तालुक्यातील शेळप येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करणे व तिची छेडछाड करून बदनामी करण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कारणास्तव शेळप येथील भिकाजी सिताराम पाटील यांच्या विरोधात संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महागोंड येथील एका विरोधात गुन्हा नोंद

महागोंड ता.आजरा येथील नामदेव कोंडीबा देसाई यांना  नायलॉनच्या दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विजय प्रकाश देसाई रा. महागोंड ता. आजरा याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अभियंता अक्षयचा आकस्मिक मृत्यू

mrityunjay mahanews

शनिवार सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!