mrityunjaymahanews
अन्य

बेपत्ता शेतकऱ्याचे प्रेत विहिरीत आढळले

कानोली येथे विहिरीत आढळला बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह

कानोली (ता. आजरा) येथे दोन दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या संभाजी गणपती पाटील या ५६ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आज सकाळी विहिरीत आढळून आला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी… संभाजी पाटील हे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होते. नातेवाईक व ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान आज सकाळी त्यांच्या मृतदेह गावाजवळील जाधव यांच्या शेताशेजारील विहिरीत आढळून आला. पाटील यांच्या पश्चात विवाहित मुलगी, आई, जावई,नातवंडे असा परिवार आहे.

पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

………,…………………………………………

लोप पावत असलेल्या कलेचा जागर करणारे डॉ पोवार फौंडेशन –  राकेश चौगुले

(आज ऱ्यात लोककला महोत्सव)

ग्रामीण व शहरी भागात सोशल मीडियाचा सुळसुळाट सुरू असून, टीव्ही मोबाईलच्या युगात जुन्या लोककला जपण्याचे आव्हान उभे ठाकले असताना लोपपावत असलेल्या कलेचा जागर करणारे व तळागाळातील लोक कलाकारांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे डॉ पोवार फौंडेशन,असे मत प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले यांनी काढले. ते आजरा येथील लोककला महोत्सव उदघाटनाच्या प्रसंगी बोलत होते.

शाहीर राजाराम कोपटकर व डॉ पोवार फौंडेशन च्या संचालिका सुमिता देवेकर, विध्यार्थी विकास परिषद तालुकाध्यक्ष विठलकदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष मारुती मोरे हे अध्यक्षस्थानी होते. शाहीर मारुती केसरकर यांनी स्वागत गीताने सुरवात केली.

प्रास्ताविक विध्यार्थी विकास परिषदचे अध्यक्ष व डॉ पोवार फौंडेशनचे सस्थापक डॉ सचिन पोवार यांनी करून कलाकाराणा सूचना व माहिती सांगितली.शाहीर गुडू राजाराम, शिवाजी पाटील, पांडुरंग येजरे यांनी विविध पोवाडे व रेणुका देवी ची गाणी सोनाबाई कदम, मालुबाई सुतार यांनी सादर केले.तबला वादक,सुरपेटी वादक आधी सर्व प्रकारच्या लोक कलाकारांनी आपपल्या कला सादर करून परिसरात एक उत्साहाची लाट निर्माण केली. सुमिता देवेकर, विठल कदम यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मारुतीराव मोरे म्हणाले, ‘लोककला टिकविन्याचे काम डॉ पोवार फौंडेशन व विध्यार्थी विकास परिषदे ने केले आहे हे काम नेहमीच असचं सुरु ठेऊन लोक कला ही चळवळ व्हावी.’ असे मत मांडले.

कार्यक्रमाची सांगता गजानन पोवार यांच्या भजनाने झाली. यावेळी नितीन पाटील, श्रीपाल कांबळे,ऊत्तम तोरगले, गणपती नागरपोळे, धोंडीराम कांबळे,बळवंत कातोरे, दत्तात्र्य पाटील,पंनतोजी भाटले, साताप्पा गुरव, दिलीप पाटील, आनंदा कांबळे,आदी आजरा राधानगरी, भुदरगड येथील विविध कलाकारांनी हजेरी लावून आपली कला सादर केली. सूत्रसंचालन लोककला मोहसत्व समिती चे कार्याधक्ष गणपती नागरपोळे यांनी तर शाहिर गुडू राजाराम यांनी आभार मानले.

श्रीहरीकाका गोसावी मठात गोकुळ अष्टमी उत्सव उत्साहात

आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत पेठवडगावचा माऊली संघ विजेता

हत्तरगी येथील पुरातन श्रीहरी काका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाच्या वतीने गोकुळ अष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत माऊली भजनी मंडळ, पेठ वडगाव (ता. हातकणंगले )या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. रुपये ११,००१/— व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मिळविले. द्वितीय क्रमांक सातेरी देवी भजनी मंडळ, बेटगिरी (ता. खानापूर) जिल्हा बेळगाव या संघाने रुपये ७००१/—- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळवले. तर तृतीय क्रमांक रुपये ५००१/—- श्रीहरी भजनी मंडळ हिरलगे, ता. गडहिंग्लज व मुक्त महिला भजनी मंडळ बेळगाव या संघांनी पटकाविला. विजेत्या संघांना सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्या हस्ते व कार्यकारी विश्वस्त वेणूगोपाल आनंद गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीसांचे वितरण करण्यात आले.

गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त विविध संगीत कार्यक्रम संपन्न झाले. गोपाळकाला कार्यक्रम उत्साहात झाला.

स्पर्धेचा शुभारंभ पीठाधीश डॉ. आनंद उर्फ नृसिंह एकनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रमेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला होता .

या भजन स्पर्धेचे परीक्षण सुरेश सरदेसाई, गुरुराज कुलकर्णी, अजित तोडकर यांनी केले.
कार्यक्रमास आम. राजेश पाटील, शाहू ग्रुपचे राजे समरजितसिंह घाटगे, माजी आम. बजरंग अण्णा देसाई, धैर्यशील देसाई, आजरा साखर चे प्रा. सुनील शिंत्रे, एसजीएम चे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण , डॉ. अतुल धाडे, सोमगोंडा आरबोळे, युजीसीचे सहसचिव डॉ. मधुकर वावरे, भुदरगड संघाचे प्रा. बाळासो देसाई, एस. एम. कुलकर्णी, डॉ. सतीश घाळी, मकरंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रा. सुनील देसाई यांनी केले.आभार प्रा. विश्वभर कुलकर्णी यांनी मानले.

स्पर्धेचा इतर निकाल असा –

उत्तेजनार्थ गुणानुक्रमे :

(४)श्री बिरदेव भजनी मंडळ पट्टणकोडोली, ता. हातकणंगले.

(५)सुशीला सांस्कृतिक भजनी मंडळ ,कोल्हापूर.

(६) देव चव्हाटा भजनी मंडळ, केंचेवाडी ,ता. चंदगड .

(७)शिवभक्त भजनी मंडळ, शिपूरतर्फ आजरा ,ता. गडहिंग्लज.

(८) समर्थ भजनी मंडळ , गडहिंग्लज

(९) माऊली भजनी मंडळ महारुळ ता. करवीर

(१०)काळभैरी भजनी मंडळ गडहिंग्लज

(११)जिव्हेश्वर भजनी मंडळ, वडगाव ,जिल्हा बेळगाव .

वैयक्तिक बक्षिसे—- (रुपये १००१ व मानचिन्ह)

उत्कृष्ट गायक – सन्मती धोंडीराम अवघडे .बिरदेव भजनी मंडळ, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले.

उत्कृष्ट वादक— अंकुश जाधव ,श्रीहरी भजनी मंडळ, हिरलगे

श्रोत्यांची आवड— उत्कृष्ट गायिका—- कु. सिद्धी प्रसाद पवार माऊली भजनी मंडळ, महारुळ ,ता. करवीर.

 

संबंधित पोस्ट

पोळगाव येथील तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रामतीर्थ यात्रा अखेर रद्द

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!