

मनोज पाटणकर (इनामदार) यांचे निधन
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरदाळ ता.आजरा येथील मनोज पाटणकर – इनामदार (वय ४७ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुली पत्नी विवाहित बहीण असा परिवार आहे. ते उत्तूर, आरदाळसह १२ गावचे इनामदार म्हणून परिचित आहेत.

श्री रवळनाथ पतसंस्थेचा १५ कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण : अध्यक्ष शिंपी

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री. रवळनाथ पतसंस्थेने चालु आर्थिक वर्षात १५ कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. यानिमित्न संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते ठेवीदारांना ठेव पावतींचे वितरण करण्यात आले. सभासद, ठेवीदार, कर्जदारांचा विश्वास वाढला असल्यानेच संस्थेची घोडदौड सुरू असल्याचे मत संस्थापक शिंपी यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थापक जयवंतराव शिंपी यांना वाढदिवसानिमित्त संस्थेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अभिषेक शिंपी म्हणाले, चालू आर्थिक वर्षात १५ कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण केला आहे. संस्थेच्या विविध ठेव योजनांसह कर्ज मागणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वच ठेवीदारांकरिता अधिकाधिक व्याजदराची योजना सुरू केली असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संस्थेची स्वमालकीची सुसज्ज अशी इमारत असून संस्थेचे स्वतःचे लॉकर्स उपलव्ध आहेत.विनम्र व कार्यतत्पर सेवा असून संस्थेची घोडदौड पाहता कार्यक्षेत्र वाढवण्याचे नियोजन असल्याचेही अध्यक्ष शिंपी यांनी स्पष्ट केले. याशिवाय ठेवींमध्ये वाढ होण्याकरिता आपण प्रयत्नशिल असून लवकरच ५० कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष समीर गुंजाटी, विक्रम पटेकर, विलास कुंभार, किरण कांबळे, इब्राहिम इंचनाळकर, सौ. माधुरी पाचवडेकर, सुधीर नार्वेकर, मजीद मुराद, युसुफ गवसेकर, विश्वास जाधव, सौ. अर्चना मराठे, मॅनेजर विश्वास हरेर यासह मान्यवर उपस्थित होते.

अन्यथा मतदानावर बहिष्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे ता. आजरा येथील रासाईदेवी मंदिर हे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्याकडे देखभाल दुरुस्ती साठी आहे. त्यांच्याकडून गावातील स्थानिक व्यवस्थापन कमिटीकडे देखभालीसाठी दिले जाते. स्थानिक देवस्थान समिती हरपवडे व पुजाऱ्यांच्या मध्ये वाद होऊन मंदिराला टाळे ठोकण्यात आले.
हा विषय घेऊन पुज्यार्यांनी १३/१०/२०२३ पासून बेमुदत आंदोलन केले. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर चे पदाधिकारी आंदोलन स्थळी येऊन (ग्रामपंचायत हरपवडे निवडणूक) आचार संहितेचे कारण पुढे करून आचार संहिता संपल्या नंतर आम्ही हरपवडे या गावी येऊन आपल्याला निर्णय देऊ असे तहसिलदार कार्यालय आजरा या ठिकाणाच्या बैठकीत सांगून गेले.ते आज तागायत हरपवडे या गावी फिरकलेच नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गेली ४ महिने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांनी काहीही कार्यवाही केलेली नाही. हा हरपवडे गावातील ग्रामस्थांचा घोर अवमान करीत आहेत.
जोपर्यंत मंदिर खुले जात नाही तोपर्यंत मतदान करणार नाही. पाच तारखेपर्यंत निर्णय न आल्यास मतादानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देवदास गुरव, बाळासो संकपाळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

घंटा गाडीची बोंब…
कचरा रस्त्यावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घंटागाडीतील अनियमितपणा आजरा शहरामध्ये कच-राचे साम्राज्य व दुर्गंधी पसरवण्यास कारणीभूत लागले आहे.
घंटागाडी वेळेवर येत नसल्याने स्थानिक नागरिक कचरा टाकण्यासाठी गल्ल्यांचे कोपरे, गटर्स यांचा वापर करू लागले आहेत. विविध कारणे सांगून शहरातील कचरा उचलण्यास घंटागाडी ठेकेदाराकडून टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे.
टाकलेल्या कचऱ्यांचा भटक्या कुत्र्यांचा वावर सुरू झाला असून यामुळे ही नागरिकांना त्रास होतो आहे.
रिकामी गाडी पळवण्यासाठी धडपड…
घंटागाडीला यापूर्वी स्पीकर असल्याने शहरातील गल्लीबोळामध्ये घंटागाडी आल्याचे समजत होते. गेले कित्येक दिवस हा स्पीकर बंद असल्याने गाडी आली कधी व गेली कधी हे कळत नसल्याने बऱ्याच वेळा गाडी रिकामीच फिरताना दिसते.

आज दोन्ही आघाड्यांच्या शहरातून प्रचार फेऱ्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आजारा शहरातून दोन्ही आघाड्यांच्या प्रचार फेऱ्यांचे सकाळी साडेनऊ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने या प्रचार फेऱ्यानंतर जाहीर प्रचार थांबला जाणार आहे.

छाया वृत्त…
शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संपर्क साधताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते…
प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना महायुतीचे कार्यकर्ते…



