mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


शेतीच्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने वार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      मेंढोली तालुका आजरा येथे शेताच्या हद्दीच्या वादाच्या कारणावरून दशरथ आप्पा चौगुले यांच्यावर म्हंकाळी आप्पा चौगुले या सख्या भावाने कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दशरथ चौगुले व म्हंकाळी चौगुले यांच्यामध्ये शेत जमिनीच्या हद्दीचा वाद असून हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. दशरथ हे लाकडे तोडण्यासाठी शेतामध्ये गेले असता शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास म्हंकाळी हे तेथे गेले त्यांनी दशरथ यांच्या हातातील कोयता काढून घेऊन त्याच कोयत्याने दशरथ यांच्यावर वार केले. यामध्ये दशरथ हे जखमी झाले आहेत .दशरथ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हंकाळी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अंबुलकर करीत आहेत.

आजरा तालु‌क्यातून ९८३ जणांचे गृहमतदान वयोवृध्द, दिव्यांगाचा सहभाग समिश्र प्रतिसाद

 

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा तालुक्यात मतदान केंद्रापर्यंत येऊ न शकणाऱ्या ८५ वर्षावरील वयोवृध्द व दिव्यांग मतदारांनी गृहमतदाना‌द्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. १८३ जणांनी मतदान केले. यामध्ये ८५ वर्षावरील १४९ जणांनी तर ३४ दिव्यांगानी मतदान केले. मतदान नोंद करून घेणारी पथके गत दोन दिवस संबंधीत मतदारापर्यंत पोहचली होती. निवडणु‌कीच्या इतिहासात हा पहिल्यांदाच प्रयोग होत आहे.

      आजरा तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला आहे. मतदारसंघ पुर्नरचनेत तालुक्याचे तीन तुकडे पडले आहेत. पूवींचा कोळींद्रे व सध्या नव्याने अस्तित्वात आलेला वाटंगी जिल्हा परिषद मतदार संघ हा २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघाला जोडला आहे. पूर्वीचा आजरा व सध्याच नव्याने अस्तित्वात आलेला पेरणोली जिल्हा परिषद हा २७२ राधानगरी विधानसभा मतदारसंघाला जोडला आहे. उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघ हा २७३ कागल विधानसभा मतदारसंघाला जोडला आहे. यामध्ये आजऱ्यातील चंदगड विधानसभा मतदार संघात जोडलेल्या गावातून ८५ वर्षावरील ६० वयोवृध्दांनी तर ९ दिव्यांग (अपंगानी) मतदान केले. येथे ६९ जणांनी मतदान केले. राधानगरी विधानसभा मतदार संघात जोडलेल्या गावातून ८५ वर्षांवरील ४८ वयोवृध्दांनी तर ७ दिव्यांगांनी मतदान केले. येथे ५५ जणांनी मतदान केले. कागल विधानसभा मतदार संघात जोडलेल्या गावातून ८५ वर्षांवरील ८९ वयोवृध्दांनी तर १८ दिव्यांगांनी मतदान केले. येथे १०७ जणांनी मतदान केले.

हाळोली येथील शंकरलिंगदेव मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहणाचा सांगता समारंभ

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हाळोली ता. आजरा येथील श्री. शंकरलिंगदेव मंदिराचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला. शुक्रवारी झालेल्या महाप्रसाद कार्यक्रमास हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.

     शुक्रवारी सकाळी देवता पूजन मुख्य देवता हवन, नंदी स्थापना, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, नैवेद्य, पूर्णाहुती इत्यादी कार्यक्रम प्.पू. किशन महाराज यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर सकाळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी दीड वाजल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी हाळोली पंचक्रोशीसह तालुक्यातील भाविकांनी भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

      यावेळी देवस्थान व्यवस्थापन कमिटी उपसमिती हाळोलीचे अध्यक्ष दशरथ अमृते, उपाध्यक्ष गोविंद केरकर, सचिव बंडोपंत बांदेकर, दयानंद गोवेकर, सखाराम बांदेकर,भिकाजी गुरव, सुरेश तावडे, हरिबा सुतार, राजाराम केरकर ,दिगंबर धुरी, संदेश सुतार, रामदास गुरव, जानबा तावडे, सुरेश पाटकर, पांडुरंग धुरी, डॉ गोविंदराव पोवार, महादेव गुरव, गोविंद कापडुस्कर, ते सहदेव गुरव, आनंदा कांबळे, जितेंद्र सुतार यांच्यासह ग्रामस्थ मंडळ हाळोली/ मुंबई, ग्रामस्थ मंडळ दर्डेवाडी/ मुंबई चे सदस्य उपस्थित होते.

मोदी सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची काही देणे घेणे नाही… कॉ. शांताराम पाटील


        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पंतप्रधान मोदी यांचे केंद्रातील सरकार हे सर्वसामान्यांची सरकार नसून आदानी, अंबानी यांच्यासारख्या बड्या मंडळींच्या हितासाठी तयार झालेले सरकार आहे. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष सुरू असून गिरणी कामगार, ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांचे प्रश्न आजही कायम आहेत. सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरवून ठरले असून आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन काँ. शांताराम पाटील यांनी केले. तालुक्याच्या पश्चिम भागातील गिरणी कामगारांच्या वतीने इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या संपर्क सभांमध्ये ते बोलत होते.

      यावेळी गावा-गावातील गिरणी कामगारांशी संपर्क साधून त्यांना शाहू छत्रपतींना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

      पाटील यांच्यासोबत कॉ. शांताराम हरेर नारायण राणे, दशरथ भडांगे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही, मोदींनाच निवडून द्या : महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मतदारांना आवाहन

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करा असे आवाहन महायुतीच्या प्रचारसभा मधून करण्यात आले.

      महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गावोगावी भेट देऊन मतदारांशी थेट संपर्क साधला. यावेळी विजय थोरवत,इंद्रजीत देसाई, संजय पाटील, संतोष भाटले, दयानंद पाटील, मारुती डोंगरे, जितेंद्र भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका विवाहित तरुणाचा आकस्मिक मृत्यू.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!