mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शनिवार दि.१ नोव्हेंबर २०२५

 

एकाची आत्महत्या…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गजरगाव ता. आजरा येथील धोंडीबा शंकर चव्हाण ( वय ४५ वर्षे) यांनी तणनाशक घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना काल उघडकीस आली आहे.

याबाबतची वर्दी ज्योतिबा बाबु लांडे रा. गजरगाव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. तणनाशक प्राशन केलेल्या अवस्थेत गजरगाव येथील खडक नावाच्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली ते शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आढळून आले. पोलिसांमध्ये सदर घटनेची आकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हाजगोळी येथून ऊसतोड मजूर बेपत्ता

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा : हाजगोळी बु ॥ येथून ऊसतोड मजूर पुरुषोत्तम बोड (वय ३५ , तरेगांव, ता . कवर्धा , छत्तीसगड ) हा बेपत्ता झाला आहे .

याबाबतची वर्दी सुनील मारुती जाधव हाजगोळी यांनी पोलीसात दिली आहे . पुढील तपास हवालदार व्ही . डी . कांबळे करीत आहेत .

चार चाकी अपघातात एक ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – आंबोली मार्गावर देवर्डे फाट्यावरील ओढ्यावर चारचाकी वरील ताबा सुटून चारचाकी भरधाव वेगाने संरक्षक कठड्यास ठोकरल्याने झालेल्या अपघातात अथर्व दीपक चौधरी (वय २२ रा. सह्याद्री नगर,शेवटचा बस स्टॉप, धनकवडी, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

अथर्व व त्याचे अन्य सहकारी पुण्याहून गोव्याच्या दिशेने चालले होते. देवर्डे येथील वळणावर भरधाव चार चाकी वरील ताबा सुटल्याने चार चाकी थेट संरक्षक कठड्याला जाऊन धडकली. यामध्ये अथर्व गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद सिद्धार्थ आणि कोंढाळकर ( वय २२ वर्षे रा. तारांकित अपार्टमेंट, पहिला मजला,प्लॉट नंबर १६, महाराष्ट्र बँके समोर सदाशिव पेठ, पुणे) यांनी आजारा पोलिसात दिली आहे.

पुढील तपास हवालदार अनिल सरंबळे करीत आहेत.

निधन वार्ता
सुशीला कुरुणकर

आजरा येथील श्रीमती सुशीला काशिनाथ कुरुणकर यांचे अल्पश: आजाराने वयाच्या ८२ व्या वर्षी आजरा येथे  निधन झाले.

लिंगायत समाज,आजरा चे अध्यक्ष महेश कुरुणकर यांच्या त्या मातोश्री  होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई,सूना व नातवंडे असा परिवार आहे.

आजरा नगरपंचायतीकरता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीची अंतीम मतदार यादी आज सायंकाळी नगरपंचायतीच्या कार्यालयात निवडणुक विभागाच्यातीने प्रसिध्द करण्यात आली. १४ हजार ६८६ मतदार आहेत. प्रारुप मतदार यादीमधील बाहेरगावचे ९ मतदार वगळण्यात आले आहेत. ८९७ मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात आला असून त्यांना मुळ प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहे.

याच महीन्यात (ता. ८) प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. प्रारुप मतदार यादीवर सुमारे २३५० हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानुसार निवडणुक विभागाने स्थळ पहाणी करण्यात आली. त्यानुसार सादर करण्यात झालेल्या अहवालानुसार प्रारुप मतदार यादीतील ८९७ मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात आला असून त्यांना मूळ प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रारुप मतदार यादीतील ९ बाहेरगावचे मतदार बादीतून वगळण्यात आले आहेत. १४ हजार ६८६ मतदार अंतीम करण्यात आले आहेत. नोव्हेबर (ता.७) र्यंत मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदारांची विभागणी केली जाणार नसल्याचे निवडणुक विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

एक दृष्टीक्षेप

प्रभागनिहाय मतदारांची संख्या अशी :-

प्रभाग १ – ६१२, प्रभाग २- १०५९, प्रभाग ३- ८६४, प्रभाग ४-६०२, प्रभाग ५- ४२४, प्रभाग ६- ४४५ प्रभाग ७- ८८६,  प्रभाग ८- १५३५ ,     प्रभाग ९ – १३९८, प्रभाग १०- १०१०,             प्रभाग ११- ७५५, प्रभाग १२-१०८६,      ‌‌.        प्रभाग १३- ११०८,  प्रभाग १४- ४४२, प्रभाग १५- ८२०  प्रभाग १६- ९१५,  प्रभाग १७- ७१५.

अद्यापही या अंतिम मतदार यादीमध्ये बाहेरगावचे बरेच मतदार कायम असल्याचे दिसते.

बेलेवाडी हु Ii श्री. भावेश्वरी मंदिरास निधी कमी पडू देणार नाही – मंत्री मुश्रीफ यांची ग्वाही

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बेलेवाडी हुll ता. आजरा येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरी मातेचे मंदिर हे ग्रामस्थांसह पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आहे. मंदिर बांधकाम पूर्ण होईपर्यत निधीची कमतरता कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पावणे दोन कोटींच्या खर्चातून साकारत असलेल्या मंदिराच्या रूपाने पंचक्रोशीसह जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एक चांगले तीर्थस्थळ निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बेलेवाडी हुबळगी ता. आजरा येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवीच्या मंदिराच्या कळस बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री. मुश्रीफ म्हणाले, गावाच्या एकोप्यातून सुंदर असे मंदिर पूर्ण करायचे आहे. मंदिर परिसरात संरक्षक भिंत, पेव्हिंग ब्लॉक, मंदिरासमोर दीपमाळ असे मंदिराचे सुशोभिकरण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर मंदिरासाठी देणगी दिलेल्या देणगीदारांचे आणि माहेरवाशीणींचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी माजी सभापती शिरीष देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, दिपकराव देसाई, मारूतराव घोरपडे, संजय येजरे, महादेवराव पाटील, गणपतराव सांगले, तहसीलदार समीर माने, सरपंच पांडुरंग कांबळे, कुंडलिक शिंत्रे, कुंडलिक केसरकर, नारायण देसाई, रामचंद्र तांबेकर, रघुनाथ शिंदे, पांडुरंग भाकरे, कुंडलिक नादवडेकर, विजय तोरस्कर, जगदीश पाटील, शंकर पावले, विजय वांगणेकर, सुधीर सावंत,अंकुश हातकर, संजय पोवार, ईश्वर शिंत्रे, सौ. मनीषा केसरकर, सौ. मेघा तोरस्कर, सौ. वर्षाराणी चव्हाण, सौ. मीनाक्षी सुतार, सौ. अनिता गायकवाड, सर्जेराव शिंदे, चंद्रकांत तोरस्कर, अप्पासाहेब तोरस्कर, राजाराम बिल्ले, कृष्णा मिसाळ, नंदकुमार मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत सरपंच पांडुरंग कांबळे यांनी केले. प्रास्ताविक उत्तम पोवार यांनी केले. आभार संजय पोवार यांनी मानले.

महाविकास आघाडी, वन हक्क संघर्ष समिती व विविध संघटनांच्या वतीने गुरुवारी आजऱ्यात ठिय्या आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेली कित्येक वर्षे आजरा तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरू आहे. याकडे वेगवेगळ्या चळवळी, आंदोलने केली जात आहेत. वन हक्क संघर्ष समितीच्या वतीने ७ एप्रिल रोजी वनविभागाच्या कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन केले होते. परंतु कोणत्याही आंदोलनाला न जुमानता वनविभाग या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडी, वन हक्क संघर्ष समिती व विविध संघटनांच्या वतीने गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी येथील संभाजी चौकामध्ये जोपर्यंत मुख्य वन संरक्षक उपस्थित राहून चर्चा करत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा पत्रकार बैठकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

याबाबत बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, वन्य प्राण्यांच्या उपगद्रवाबाबत वेळोवेळी विविध संघटना संघर्ष करत आहेत. शेतकरी- वन्यप्राणी संघर्ष संपवण्यासाठी अभ्यास गट तयार करावा लागेल. ठोस कार्यक्रम समोर ठेवून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. असे असताना विशिष्ट पक्षाच्या काही मोजक्या मंडळींसोबत वन विभागाकडून बैठक घेतली जात आहे. पालकमंत्र्यांनी यापूर्वी सर्वपक्षीय व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप अशी बैठक झाली नाही. या प्रश्नाबाबत पालकमंत्री सापत्नभावाची वागणूक देत असल्याचाही आरोप त्यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर सदर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, कॉ. शांताराम पाटील, प्रकाश मोरूसकर, दशरथ घुरे, नारायण भडांगे, राजू होलम, संजय तर्डेकर, काशिनाथ मोरे, संजयभाऊ सावंत, संजय घाडगे आदींनी भाग घेतला.

यावेळी अमित गुरव, चंदर पाटील, सुनील डोंगरे, रवींद्र भाटले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

छायावृत्त…

आठवडा बाजार… जोरदार पाऊस आणि वाहतुकीची प्रचंड कोंडी…

आज शहरात…

राजाभाऊ शिरगुप्पे लिखित कर्मयोगी बसवाण्णा या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. शिवशंकर उपासे यांच्या अध्यक्षतेखाली, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ व लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृती दालनामध्ये दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

प्रतिभाताई कांबळे यांचे निधन

mrityunjay mahanews

चोरीच्या सात मोटरसायकलसह आज-यात एकाला घेतले ताब्यात… उत्तूर येथे देशी दारू विक्री करताना एकास अटक

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यात सरासरी ७९.५७ टक्के मतदान

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!