mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

एक सापडला…
इतरांचा शोध...

                     आजरा : प्रतिनिधी

       आजरा तालुक्यामध्ये जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण वाढले असून वनविभागाने अशा मंडळींचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी विविध प्रकारच्या क्लुप्त्या वन विभागाने राबवण्यास सुरुवात केली आहे. याचे फळ म्हणून वनाला आग लावणाऱ्या आरोपी समिर मानकु पन्हाळकर( वय ३७, रा. हालेवाडी, ता. आजरा) याला आगपेटी (माचिस), मोबाईल, TVS Radeon कंपनीची मोटर सायकल (क्र.MH०९ FX ५२१३) सह रंगेहात पकडून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

         शुक्रवार दि.०श८ रोजी आजरा वनपरिक्षेत्रातील वनपाल उत्तर आजरा, वनरक्षक साळगांव, वनमजूर साळगांव हे हत्ती हाकारा टीम समवेत वनक्षेत्रात गस्त घालत असताना नियतक्षेत्र साळगांव येथील मौ. पेरणोली जं.क.क्र.१६०, १६१ वनक्षेत्रात आग लावणेचा प्रकार आरोपी समिर मानकु पन्हाळकर,व.व. ३७, रा. हालेवाडी, ता. आजरा यांनी केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

        सदरची कारवाई ही मा.उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर, मा. सहाय्यक वनसंरक्षक (खा.कु.तो. व वन्यजीव) कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे मार्गदशनाखाली केली असून पूढील तपास श्रीम. स्मिता.रा.डाके वनक्षेत्रपाल आजरा, श्री.बाळेश बा. न्हावी वनपाल उत्तर आजरा व श्रीम. अस्मिता शं. घोरपडे वनरक्षक साळगांव हे करत आहे. सोबत वनमजूर श्री. मारूती शंकर शिंदे, श्री. सुरेश राजाराम पताडे व हत्ती हाकारा टीममधील श्री. प्रविण सटू कांबळे, श्री. साहिल मधुकर डेळेकर, श्री. शिवाजी मधूकर मटकर, श्री. विष्णु काशिनाथ कांबळे, श्री. विनायक सुरेश पताडे करीत आहेत.

असे प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा परिक्षेत्र वन अधिकारी सुनीता डाके यांनी दिला असून इतर मंडळींचा तपास वन खात्याकडून सुरू आहे.

एसटी फेऱ्यांची बोंब… अधिकारी धारेवर…

                      आजरा: प्रतिनिधी

        आजरा येथील रामतीर्थ यात्रा व आठवडा बाजार असताना आजरा डेपो ने २० बसेस मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला इचलकरंजी येथे पाठवल्यामुळे तालुक्यातील एसटी फेऱ्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याने तालुका वासीयांचे व रामतीर्थ यात्रेकरूंचे प्रचंड हाल झाले. त्याप्रकरणी शिवसेना, युवा सेनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात येऊन आगार प्रमुखांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

      आजऱ्यातील खेडयापाड्यातील गोर गरीब जनतेला यात्रेला यायला त्रास होत आहे तसेच आजऱ्याचा आठवडी बाजाराला येता आले नाही. त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या निंदनिय प्रकारचा आजरा डेपोला जाब विचारून या गोष्टीचा निषेध करण्यात आला.

      यावेळी शिवसेना तालुकप्रमुख युवराज पोवार,शिवसेना शहर प्रमुख,ओंकार माद्याळकर, युवासेना उपजील्हाप्रमुख महेश पाटील, भिकाजी विभुते, गणपत मिसाळ,शरद कोरगावकर, संजय मोहिते, स्वप्निल शिवने, राजू बंडगर , रवी यादव, महादेव पोवार, व इतर सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

रामतीर्थ यात्रा सुरू
आज मुख्य दिवस

                      आजरा: प्रतिनिधी

       आज-याजवळील रामतीर्थ यात्रेला काल शुक्रवारपासून सुरुवात झाली असून आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रा ठिकाणी जाण्याकरता एसटीची सुविधा काल दिवसभर नव्हती. त्याचबरोबर खाजगी वाहनांना यात्रा ठिकाणी प्रवेश करण्यास बंदी घातल्याने वयोवृद्ध नागरिकांसह, महिला व बालकांचे प्रचंड हाल झाले.

     काल अनेक भाविकांनी आज होणारी गर्दी लक्षात घेऊन रामतीर्थ परिसराला भेट देऊन देवदर्शन घेतले. नगरपंचायत व अन्याय निवारण समितीने यात्रेचे नेटके नियोजन केले आहे.

आजरा महाविद्यालयात
‘वणवा निर्मुलन मोहीम’ कार्यशाळा

                     आजरा : प्रतिनिधी

           सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र), वन विभाग आजरा व आजरा महविद्यालय आजरा यांच्या वतीने ‘वणवा निर्मुलन मोहीम ‘या विषयावर कार्यशाळा आजरा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेसाठी वन विभाग आजराच्या परिक्षेत्र वनअधिकारी  सौ. स्मिता डाके यांनी तालुक्यातील सर्व सरपंचांना व निसर्गप्रेमीच्या समस्या समजून घेऊन मार्गदर्शन केले .

      या कार्यशाळेसाठी सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) चे प्रदेश सरचिटणीस राजु पोतनीस, जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील, तालुका अध्यक्ष संदिप चौगले, तालुका महिला अध्यक्षा सौ. शारदा गुरव उपस्थित होत्या.

      यावेळी जी.एम.पाटील म्हणाले, जैवविविधतेने नटलेला हा जंगलभाग आगीच्या भक्षस्थानी पडतो आहे. आणि यामुळेच, पृथ्वीवरील जीवसृष्टीतील २०० प्रजाती दररोज नष्ट होत आहेत,त्यामुळे आजअखेर १० लाख प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचे गंभीर परिणाम मानव जातीस भोगावे लागतील.जंगलाला आग लागल्याची सर्व कारणे ही मानवनिर्मित असल्याने जंगलाना आग लागू नये यासाठी नियोजनाचा भाग म्हणुन जाळ रेषा काढणे, प्रतिवर्षी आग लागणारी ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) यांच्यावर लक्ष ठेऊन राहणे, प्रत्येक गावातील रानात जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्यांची यादी तयार करणे व त्यांना सुचना देणे, गावोगावी शाळांच्या मुलांकडून जागृती रॅली काढून ‘जनजागृती करणे, चित्ररथ (LED VAN) च्या माध्यमातून, ऑडिओ क्लीपच्या व व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती करणेवर सर्वांनी भर देणे गरजेचे असलेचे त्यांनी सांगितले.

       परिक्षेत्र वन अधिकारी सौ. स्मिता डाके यांनी जंगलांचे महत्व पटवून सांगताना अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या मानवाच्या मुलभूत गरजा जंगलामुळेच भागवल्या जातात. नैसर्गिक प्रक्रियेमुळेच अगेक झाडांची निर्मिती होत असते. पण आग लावल्यामुळे होणारी जंगलाची हानी न भरुन येणारी असते. त्यामुळे आग लागणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आग लागण्याचे मानवनिर्मित विविध प्रकार व त्यावरील उपाययोजना बाबतही त्यांनी मार्गदर्शन केली.

      अध्यक्षीय भाषणामध्ये, प्राचार्य डॉ .अशोक साद‌ळे म्हणाले वन विभाग व सरपंच परिषद मुंब‌ई (महाराष्ट्र) यां दोहोंनी ‘वणवा निर्मुलन मोहीम,’ यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठीच्या जनजागृतीच्या कामामध्ये आजरा महाविद्यालयही आपल्या बरोबरीने असेल. यावेळी डॉ. रणजीत पवार  यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनटेच्या माध्यमातून जंगलांची निर्मिती व महत्व, कोल्हापुर जिल्यातील असलेले एकू‌ण जंगल क्षेत्र व वणव्याने यांचे होत चाललेले क्षेत्र या बाबत सविस्तर माहीती दिली. सदरची कार्यशाळा यशस्वी करणेसाठीचे कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अशोक बाचुळकर व डॉ.आप्पासाहेब बुडके यांनी केले.

    या कार्यशाळेसाठी तालुक्यातील बहुतांश गांवाचे सरपंच ,उपसरपंच/निसर्गप्रेमी त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित ‌होते.

देवर्डे येथे महिला दिन उत्साहात

                        आजरा : प्रतिनिधी 

         देवर्डे ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवर्डे गावच्या सरपंच कल्पना चाळके होत्या.

       कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गीता पोतदार यांनी, मुलांना ‘ आत्मभान जागृती व महिला सक्षमीकरण ‘ या विषयावर प्रबोधन केले, सत्तेत व संपत्तीत समान अधिकार मिळवण्यासाठी महिलांनी सुशिक्षित तर झालेच पाहिजे पण विवेक जागृत ठेवून निर्णय घेतले पाहिजेत. प्रत्येक आईने आपल्या मुलीची मैत्रीण झालं पाहिजे व मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी संवाद ठेवला पाहिजे. सध्याच्या बदलत्या समाज रचनेत मुलींप्रमाणे मुलांकडेही लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

       या कार्यक्रमप्रसंगी सरपंच संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जी.एम.पाटील, सोहाळेच्या सरपंच डेळेकर , वनरक्षक सुनिता मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील महिला व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कै. राजाराम गुरव विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी धोडिंबा तेंडूलकर

                      आजरा : प्रतिनिधी

       खानापूर येथील कै. राजाराम गुरव विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी धोंडिंबा तेंडूलकर यांची तर व्हा. चेअरमनपदी शिवाजी गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली, निवडणूक निर्णय अधिकारी ज्योतीराम बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या.

      स्वागत सचिव संतोष ढोणुक्ष यांनी केले, चेअरमनपदासाठी तेंडूलकर यांचे नाव संचालक मारुती धनवडे यांनी सुचविले. व्हा. चेअरमनपदासाठी जाधव यांचे नाव संचालक अर्जुन जाधव यांनी सुचविले.

     यावेळी संचालक अशोक चराटी, सतीश गुरव, कृष्णा तेंडूलकर, लक्ष्मण राणे, रुक्मिीनी तेंडूलकर, रुक्मिणी राणे यांच्यासह संदीप जाधव, सुरज गुरव, धनाजी डोंगरे, नामदेव धनवडे, आप्पा जाचव, लक्ष्मण जाधव, राजाराम देसाई, श्रीपती जोगळेकर, राजाराम तेंडूलकर, एकनाथ राणे, दत्तात्रय डोंगरे, विश्वास तेंडूलकर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रवाशाचे बेचाळीस हजार रुपये हातोहात लंपास…

mrityunjay mahanews

चालत्या चारचाकी वर गव्याची उडी

mrityunjay mahanews

आजऱ्यात मनसेचे खळ्ळ -खट्याक : नगरपंचायतीचे गाळे अखेर मूळ मालकांना देण्याचा निर्णय…… पोलिसांकडून साडेपाच लाखांची दारू नष्ट….. चारचाकी ने धडक दिल्याने जाधेवाडीतील महिला जखमी

mrityunjay mahanews

राष्ट्रवादीचा प्रचाराचा नारळ फुटला…

mrityunjay mahanews

आजऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा विराट जन आक्रोश मोर्चा 

mrityunjay mahanews
error: Content is protected !!